Site icon InMarathi

घरात शिरताच नेटवर्क गायब? मग हा उपाय करा आणि फुल स्पीड एन्जॉय करा

mobile 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोबाईल आणि इंटरनेट हे आपल्या जगण्याचे अविभाज्य भाग आहेत आणि कायम राहतील. एरव्ही क्षणोक्षणी उपयोगाच्या ठरणाऱ्या आपल्या मोबाईलच्या बाबतीतली एक गोष्ट मात्र नेहमीच आपल्या संयमाची परीक्षा पाहते.

ती म्हणजे अधून मधून जाणारं मोबाईल नेटवर्क. तुम्हाला कुणालातरी कॉल करायचाय आणि नेमकं नेटवर्क नाहीये असं तुमच्याबाबतीत अनेकदा झालं असेलच.

 

 

गप्पा ऐन रंगात आलेल्या असताना अचानक नेटवर्क गेल्यामुळे कॉल कट झाला म्हणून तुमचीही चिडचिड होते का? आपल्या घरातली अशी एकतरी जागा असतेच जिथे आपल्याला नेटवर्क मिळत नाही.

एरव्ही तसा यामुळे काही फरक नाही पडणार. पण आता कोविडनंतरच्या काळात आपण सगळ्याच बाबतीत डिजिटल गोष्टींवर अवलंबून झालेलो असताना मोबाईलवर महत्त्वाचा कॉल करायचा असेल तर सारखं सारखं नेटवर्क जाणं त्रासाचं ठरूच शकतं.

अचानक नेटवर्क गायब होण्याच्या या समस्येवर आता एक ‘स्वस्त आणि मस्त’ तोडगा निघाला आहे. एकदा तुम्ही हे उपकरण वापरलंत की फूल सिग्नलची आणि इंटरनेटच्या फूल स्पीडची पूर्ण हमी. जाणून घेऊया या उपकरणाविषयी.

‘मोबाईल सिग्नल बूस्टर’ असं या उपकरणाचं नाव आहे. या उपकरणाच्या मदतीने आपल्याला घरात पूर्ण सिग्नल मिळू शकतो.

 

नेहमी नेटवर्क मिळतं अशा घरातल्या ठिकाणी जाऊन  उभं राहून किंवा बसून मोबाईलवर बोलायची, इंटरनेट वापरायची आपल्याला सवय असते. पण हे उपकरण मोबाईलचा सिग्नल लगेचच वाढवत असल्याने हे उपकरण तुमच्या घरात असेल तर घरातल्या कुठल्याही कोपऱ्यातून फोनवर खुशाल गप्पा मारणं किंवा इंटरनेट वापरणं आता शक्य आहे.

हे उपकरण वापरायला सुरुवात केलीत की तुम्हाला नक्की फूल सिग्नल मिळेल. सिग्नल कमी झालाय किंवा इंटरनेटचा स्पीडच स्लो झालाय या नेहमीच्या कटकटींपासून हे उपकरण आपली सुटका करेल.

बाजारात हे सहज उपलब्ध आहे. तुम्हाला हे ऑनलाईनसुद्धा खरेदी करता येऊ शकतं. ‘ऍमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’वरून तुम्ही हे विकत घेऊ शकता. हे उपकरण ऑनलाईन घेतलंत तर तुम्हाला खूप ऑफर्स पण मिळतील आणि ते स्वस्तातही मिळेल.

 

 

या उपकरणाची किंमत खिशाला परवडणारी आहे. १ हजारापासून ४ हजारापर्यंत हा ‘मोबाईल सिग्नल बूस्टर’ मिळतो. वाय – फायच्या राउटरसारखं दिसणारं हे छोटंसं उपकरण आहे.

‘मोबाईल सिग्नल बूस्टर’ विकत घेतल्यावर तुम्हाला तो फक्त तुमच्या घरी इंस्टॉल करावा लागेल. एकदा का हे उपकरण इंस्टॉल केलं की नेटवर्कची समस्या येणार नाही.

कितीही फायदेशीर असलं तरी उपकरण म्हटलं की त्याचा काहीतरी तोटा असतोच. याचा काही तोटा असेल तर तो इतकाच की लाईटशिवाय हे उपकरण चालत नाही.

त्यामुळे घरचे लाईट गेले तर वाय-फायचा राउटर जसा बंद पडतो तसं हे बूस्टर पण बंद पडतं. बूस्टर बंद पडलं की मोबाईलच्या अधूनमधून गायब होणाऱ्या नेटवर्कचा तुम्हाला पुन्हा त्रास होऊ शकतो.

 

 

वायफायचं कनेक्शन घेतलेल्या आपल्या सगळ्यांनाच वर्षाला काहीएक हजार रक्कम भरावी लागते. पण त्याबरोबरीने वायफायचा स्पीड आणि डाऊनलोडिंगची अमर्याद क्षमता हे फायदे मिळतातच की.

त्याचप्रमाणे एकदाच २-४ हजार खर्च करून जर तुमची नेटवर्क जाण्याची कटकट कायमची मिटणार असेल तर उगीच वेळ घालवू नका. फार विचार न करता हा ‘मोबाईल सिग्नल बूस्टर’ घेऊन टाका.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version