' “खोट्या आशा नकोत.” मिस्टर आयपीएल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत! – InMarathi

“खोट्या आशा नकोत.” मिस्टर आयपीएल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदाच्या आयपीएल हंगामासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतके रिटेन केलेले काही मोजके खेळाडू सोडले, तर जवळपास सगळ्याच खेळाडूंचा लिलावात सहभाग होता. काहींना मोठमोठ्या रकमेचे जॅकपॉट लागले, तर काही दिग्गज खेळाडूंना सुद्धा कुठल्याही संघाने विकत घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही.

विक्री न झालेल्या या या खेळाडूंच्या यादीत एक फारच मोठं आणि धक्कादायक नाव होतं, ते सुरेश रैनाचं! मिस्टर आयपीएल नावाने ओळखला जाणारा, आयपीएलच्या प्रत्येक हंगामात धावांची टाकसाळ उघडणारा सुरेश रैना लिलावात बोलीविना राहिला आणि अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

 

suresh raina IM

 

खरंतर, चेन्नई सुपर किंग्सचा संघ रैनाला असं वाऱ्यावर सोडेल अशी अपेक्षा कुणालाही नव्हती. संघाच्या आणि रैनाच्या चाहत्यांसह सगळ्यांनाच या निर्णयाचं आश्चर्य वाटलं. चेन्नईकडून काही हंगाम खेळलेला इरफान पठाण याचं लिलावादरम्यानच्या कार्यक्रमातील एक वाक्य नंतर बराच काळ चर्चेत राहिलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

“चेन्नईचा संघ खेळाडूंना एक कुटुंब मानतो, तो रैनाला घेणार हे नक्की” असं एक खात्रीपूर्वक विधान इरफानने केलं होतं. २ कोटी मूळ किंमत असलेल्या रैनाला, त्याहून अधिक किंमत हाती असूनही न घेण्याचा चेन्नई सुपरकिंग्सचा निर्णय टीकेचा विषय ठरला होता, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

हाच सुरेश रैना आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जेसन रॉय जायबंदी होणं आणि त्याच्या बदली खेळाडूचं शोधकार्य सुरु असणं हे या चर्चेचं कारण ठरतंय.

यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या रणसंग्रामात उतरणार असलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाने रॉयचा बदली खेळाडू म्हणून ‘मिस्टर आयपीएल’ला चमूत सामील करून घेण्याची तयारी केली आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

 

gujrat titans IM

 

गल्लीगल्लीमधील कट्ट्यांपासून ते सोशल मीडियावरील सगळ्याच माध्यमांवर ही चर्चा घडत असल्याचं पाहायला मिळतंय. असं असूनही, स्वतः सुरेश रैना मात्र या चर्चांमुळे दुःखी आणि क्रोधित झालेला आहे.

सोशल मीडियावर चाहते म्हणतायत…

जेसन रॉयने आयपीएलचा यंदाचा हंगाम खेळणार नाही, अशी घोषणा केली आणि सोशल मीडियावर चाहत्यांना रैनाची आठवण झाली. दोन करोड रुपये मूळ किंमत असलेल्या रैनाला आता रॉयचा बदली खेळाडू म्हणून गुजरात टायटन्सची फ्रँचायझी संघात घेणार असल्याचं नेटकऱ्यांनी म्हणायला सुरुवात केली.

रैना किंवा टायटन्स यांच्यापैकी कुणाकडूनही अशा प्रकारच्या चर्चा होत नसतानाही रैनाच्या चाहत्यांनी मात्र या विषयावर अनेक पोस्ट्स करायला सुरुवात केली आहे.

गुजरातच्या फ्रॅन्चायझीकडे रैनाला संघात घ्यावं असं आवाहन करणाऱ्या पोस्ट्स सुद्धा पाहायला मिळत आहेत. “तुम्ही त्याला संघात घेतलंत, तर तुमच्या चाहत्यांमध्ये करोडोंच्या संख्येने वाढ होईल.”

 

suresh raina 2 IM

 

अशा आशयाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर दिसत आहेत. ‘मिस्टर आयपीएल’ नावाने ओळखला जाणारा आणि एकही हेटर नसणारा हा खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा दिसावा अशी चाहत्यांची इच्छा असल्याचं यावरून अगदी सहज समजून येतंय.

गुजरात टायटन्सकडून मात्र काहीच हालचाल नाही :

आयपीएलच्या स्पर्धांमध्ये रन मशीन बनून पाच हजारांहून अधिक धावा करणारा रैना यंदाचा हंगाम खेळणार नाही हे दुःख पचवणं क्रिकेट चाहत्यांना कठीण जातंय हे नक्की! त्यामुळे त्याच्या आयपीएलमधील पुनरागमनाकडे सगळेच नजर लावून बसले आहेत.

रॉय सारखा स्फोटक खेळाडू यंदा खेळणार नाही, त्यामुळे रैनाला संधी मिळू शकते, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र गुजरात टायटन्सच्या संघाने याविषयी अद्याप काहीही घोषणा केलेली नाही.

एवढंच नाही तर टायटन्सनी अजून तरी रॉयच्या बदली खेळाडूचा शोधही सुरु केलेला नाही. असं असतानाही रैनाच्या नावाची सुरु असणारी चर्चा कदाचित त्याचं दुःख वाढवणारी ठरू शकते.

 

ipl suresh raina IM

 

यापासून अलिप्त असलेला रैना, “मला खोट्या अपेक्षा दाखवू नका.” असंच काहीसं मनात म्हणत असेल का? हा सवाल करणारी मंडळी सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात रैना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होतोय हे मात्र खरं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?