Site icon InMarathi

शेयर-मार्केटमध्ये आजही घसरण; इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगावकर सांगतायेत कमाईच्या संधीबद्दल!

neeraj borgaonkar featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शेयर मार्केट म्हंटलं की अजूनही कित्येक लोकांच्या मनात जुगार किंवा सट्टाबाजार असंच चित्र निर्माण होतं. पण शेयर मार्केट म्हणजे “२५ दिवसांत पैसे डबल” अशी काही स्कीम नाहीये, शेयर मार्केटमधून पैसे कामवायचे असतील तर त्यासाठी बराच अभ्यास गरजेचा असतो.

सध्याच्या काळातल्या तरुण वर्गाकडे आधीच्या पिढीसारखे रिटायरमेंट प्लॅन्स नाहीत, त्यामुळे सध्याच्या नोकरदार वर्गासमोर नोकरी करत असतानाच स्वतःच्या भविष्याची तजवीज करायचं टेंशन असतं. याचसाठी शेयर मार्केटशिवाय गत्यंतर नाही हे आपण सगळेच जाणतो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शेयर मार्केटशी निगडीत अशीच काही माहिती आपण आजच्या लेखातून इन्वेस्टमेंट गुरु नीरज बोरगावकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नीरज बोरगावकर हे गेली २० वर्षं या क्षेत्रात कार्यरत असून, सहज सोप्प्या मराठी भाषेतून ते लोकांना शेयर मार्केटविषयी मौलिक मार्गदर्शन करत असतात!

 

 

युट्यूब तसेच फेसबुक या प्लॅटफॉर्मवर ‘गुंतवणूक कट्टा’च्या माध्यमातून ते पोर्टफोलियो बिल्डिंगविषयीसुद्धा मार्गदर्शन करतात.

आज नेमक्या मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या, कोणत्या शेयरने बाजी मारली, कोणता शेयर गदगडला एकंदरच शेयर मार्केटची ही विस्तृत माहिती जाणून घेऊया नीरज बोरगावकर यांच्याकडून!

===

दिनांक – ४ मार्च २०२२

निफ्टी – १६४७५.३५ (-२५२.७०)
सेन्सेक्स – ५४३३३.८१ (-७६८.८७)
बॅंकनिफ्टी – ३४४०७.८० (-५३६.५०)
गोल्ड – ५३१५०
यु एस डॉलर – ७६.१६

आजचे निफ्टी High Low – १६१३३.८० – १६४५६.००

 

निफ्टीमधील टॉप गेनर्स – DRREDDY , ITC , TECHM , BPCL , UNLTRACEMCO

निफ्टीमधील टॉप लूझर्स – TITAN , MARUTI , ASIANPAINT , HEROMOTOCO , TATAMOTORS

आजचा दिवस हा संधीसाधू ट्रेडर्ससाठी अतिशय उत्तम असा दिवस होता. सध्या बाजारामधील एकूण वातावरण हे निगेटिव्ह झालेले आहे. रशिया युक्रेन वॉर, FII ची सातत्यपूर्वक सुरु असणारी विक्री, डॉलरसमोर घसरणारा रुपया या सर्व गोष्टींमुळे भारतीय शेअर बाजार खाली पडत आहे.

 

परंतु अश्या काळामध्ये बाजार अतिशय व्होलटाईल असतो आणि या काळामध्ये ट्रेडर्ससाठी खूप सार्‍या संधी उपलब्ध असतात. सध्याचा एकूण पॅटर्न बघितला तर सध्या गॅप-अप आणि गॅप-डाऊन ओपन सतत बघायला मिळतात. कालच्या क्लोजपेक्षा समजा बाजार थोडासा वर उघडला तर त्याला “गॅप-अप” असे म्हणले जाते आणि कालच्या क्लोजिंगपेक्षा समजा बाजार खाली उघडला तर त्याला “गॅप-डाऊन” असे म्हणले जाते.

आज बाजार (निफ्टी) सुमारे दीडशे पॉईंट्स गॅप-डाऊन उघडला. व्होलटाईल मार्केटमध्ये एक “ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट” (ORB) नावाची स्ट्रॅटेजी वापरुन काम केले जाते. ORB स्ट्रॅटेजीमध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर थोडा वेळ बाजार कोणत्या रेंजमध्ये ट्रेड करीत आहे हे बघितले जाते, आणि पुढील काही काळामध्ये जर बाजाराने ही रेंज तोडली तर ट्रेड घेतला जातो. आज सकाळी सव्वादहापर्यंत बाजार 16230 ते 16365 या रेंजमध्ये घुटमळत होता. पण नंतर त्याने खालच्या दिशेने रेंज तोडली. त्यामुळे ORB ट्रेडर्ससाठी निफ्टी शॉर्ट करुन सुमारे शंभर पॉईंट्स मिळवण्याची एक संधी निर्माण झाली.

 

 

सुमारे सव्वा अकरा वाजल्यानंतर बाजारामध्ये एक तेजी सुरु झाली. या तेजीमध्येदेखील ट्रेडर्ससाठी सुमारी तीनशे पॉईंट्स मिळवण्याची एक संधी बाजाराने दिली. शेवटच्या सत्रामध्ये बाजार पुन्हा मंदीमध्ये जाऊ लागला आणि शेवटी पुन्हा ओपनिंग प्राईजच्या जवळपास बंद झाला. अश्या प्रकारच्या मार्केटमध्ये आपण विविध प्रकारच्या स्ट्रॅटेजीज्‌ वापरुन काम करु शकतो. आजच्यासारख्या बाजारामध्ये आपण ऑप्शन्समध्ये “शॉर्ट स्ट्रॅडल” ही स्ट्रॅटेजी वापरुन काम करु शकतो. शॉर्ट स्ट्रॅडलमध्ये एकाच स्ट्राईक प्राईजचे कॉल व पुट दोन्ही विकले जातात आणि नंतर ते कव्हर केले जातात. 16250 च्या स्ट्रॅडलची किंमत आज सकाळी 557 रुपये होती. बाजार बंद होताना हेच स्ट्रॅडल सुमारे 470 रुपयांवर आले होते. डोळे उघडे ठेवून वावरले आणि सर्व विषय नीट समजून घेतला तर शेअर बाजारामध्ये प्रचंड मोठी अशी संधी आहे. परंतु यासाठी आपल्याला या सर्व संकल्पना व्यवस्थित शिकून घ्याव्या लागतील.

शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्यवसाय करणे हे एक शास्त्र आहे. आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला मिळते. या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपला वेबिनार नक्की अटेंड करा. (संधी किती काळ राहील हे सांगता येत नाही!)

तुम्हालादेखील शेयर मार्केटमध्ये रुची असेल आणि या सगळ्याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायची तयारी असेल, तर आजच नीरज बोरगावकर यांच्या या वेबिनारमध्ये भाग घ्या, आणि शेयर मार्केटमध्ये स्मार्टली गुंतवणूक करायला शिका!

 

 

वेबिनार रजिस्ट्रेशनसाठी या लिंकवर जरूर क्लिक करा – https://www.guntavnook.com/webinar

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version