Site icon InMarathi

“रशियाचा यूक्रेनवर हल्ला म्हणजे सर्जिकल स्ट्राईक”- पुतीनच्या गोटातील ‘भारतीयाचा’ दावा!

abhay im final

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

युक्रेन-रशियामधली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिंताजनक होत चालली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आता एअर इंडियाच्या विमानांनी भारतात परत येणं शक्य होत असल्यामुळे कुठेतरी त्यांच्या कुटुंबियांना जरा कुठे दिलासा मिळतोय.

या सगळ्याचे एकूण जगावर किती विपरित परिणाम होतील याची आपल्याला अद्याप पुरेशी कल्पना आलेली नाही. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या कृतीचा सगळीकडून निषेध केला जातोय.

 

 

आतापर्यंत अमेरिका आणि इतर काही पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातलेत. असं असलं तरी दुसरीकडे काही देश या सगळ्यात रशियाच्या बाजूने आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नवंच वृत्त समोर आलेलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय वंशाचे रशियाचे खासदार आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या युनायटेड रशियन पार्टीचे सदस्य असलेल्या डॉ. अभय कुमार सिंह यांनी युक्रेनविरोधात रशियाने केलेल्या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. पुतिन यांना आपला पाठिंबा दर्शवताना ते युक्रेनला हल्ल्यापूर्वी बोलण्याच्या बऱ्याच संधी दिल्या गेल्या होत्या असं म्हणाले.

 

 

डॉ. अभय कुमार सिंह हे कुर्स्क या पाश्चिमात्य रशियन शहराचे ‘डेप्युटॅट’ आहेत. त्यांचा हा हुद्दा भारतातल्या MLA च्या बरोबरीचा आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना भारताशी या सगळ्याचा संबंध जोडत ते म्हणाले, “जर चीनने आपली लष्करी छावणी बांग्लादेशमध्ये बांधली तर भारत त्यावर काय प्रतिक्रिया देईल? भारताला हे सहाजिकच आवडणार नाही.

रशियाविरोधात ‘नाटो’ तयार केला गेला आणि सोवियेत युनियन तुटल्यानंतरही तो वेगळा झाला नाही आणि हळूहळू आमच्या अधिकच जवळ आला. युक्रेन जर नाटोमध्ये सामील झाला असता तर नाटो आमच्या आणखीनच जवळ आला असता कारण युक्रेन आमचा शेजारी देश आहे. अशाने कराराचं उल्लंघन झालं असतं. व्लादिमिर पुतीन आणि रशियाकडे यावर कारवाई करण्याखेरीज आणखी कुठला पर्याय नव्हता आणि त्यामुळे युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला गेला.”

 

एका हिंदी वाहिनीशी बोलताना त्यांनी रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ सारखा असल्याचं म्हटलंय. सिंह यांनी असा दावा केला आहे की रशिया केवळ युक्रेनच्या लष्करी छावण्यांवरच हल्ला करत आहे.

हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंह म्हणाले, “सैन्य जर सुपरमार्केट मध्ये शिरलं आणि त्यानंतर जर त्यांनी रशियाच्या सैनिकांवर हल्ला केला तर आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल.” सिंह यांनी रशिया युक्रेनवर अणुबॉम्ब हल्ला करण्याचा विचार करत असल्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. परंतु, ते म्हणाले की आण्विक शास्त्रांच्या अभ्यासामागचा हेतू हा रशियावर कुठल्या देशाने आक्रमण केलं तर त्याला प्रत्युत्तर देणे हा होता.

ते म्हणाले, “आण्विक शस्त्रास्त्रांबाबत चिंता करण्याची आवश्यक्ता नाही. राष्ट्रपती पुतिन यांनी घोषणा केली आहे की दुसऱ्या देशाने रशियावर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया अणूहल्ला करेल. दुसऱ्या देशाने हल्ला केल्यास रशिया सगळ्या प्रकारे प्रत्युत्तर देईल.”

डॉ. अभय कुमार सिंह यांच्याविषयी :

 

 

१. डॉ. अभय कुमार सिंह हे मूळचे बिहारमधील पाटणाचे आहेत. ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये ते मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी रशियाला गेले.

२. पाटण्याच्या ‘लोयोला हाय स्कुल’ मधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि रशियाच्या ‘कुर्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

३. त्यानंतर ते आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करण्यासाठी पाटण्यात परतले. पण त्यानंतर लवकरच त्यांनी रशियाला परत जाऊन तिथे आपला औषधांचा व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांनी रियल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रातही आपला व्यवसाय विस्तारला.

४. २०१५ साली ते व्लादिमिर पुतिन यांच्या ‘युनायटेड रशिया पार्टी’ चे सदस्य झाले. २०१८ साली त्यांनी कुर्स्ककडून प्रांतीय निवडणूक जिंकली.

५. २०१५ साली त्यांनी कुर्स्कमध्ये पहिला ‘आंतरराष्ट्रीय योगा दिन’ आयोजित केला.

६. त्यांच्या राजकीय आणि व्यावसायिक संबंधांमुळे ते डेप्युटॅट होण्यापूर्वीदेखील कुर्स्कमधील एक प्रभावशाली व्यक्ती होते.

७. पूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी म्हटलंय की, रशियामध्ये त्यांना कधीच ‘आउटसाईडर’ असल्यासारखं वाटलं नाही.

 

 

भारतीय वंशाच्या रशियातील कुर्स्क शहराचे डेप्युटॅट असलेल्या डॉ. अभय कुमार सिंह यांनी घेतलेली ही रोकठोक भूमिका कुणाला पटेल तर कुणाला पटणार नाही. वर्तमानपत्रात, टीव्हीवर केवळ बातम्या बघू शकणाऱ्या आपल्याला दोन्ही देशांमधल्या नेमक्या परिस्थितीची आणि अशी परिस्थिती निर्माण होण्यामागची जी कारणं जगासमोर आली आहेत त्या कारणांचे तपशील पूर्णपणे माहीत असू शकणार नाही. त्यामुळे कुठल्याही देशाची बाजू न घेता तटस्थ भूमिका घेणंच श्रेयस्कर ठरेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version