उच्चभ्रु कुटुंबात जन्म घेऊन देखील कधीकाळी अश्निर रस्त्यावर झोपला होता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज कधी आपण निराश झालो, काही करायची इच्छा नसली तर कुठेतरी एकांतात बसतो अन्यथा मोटिव्हेशनल लोकांचे व्हिडिओ बघतो जेणेकरून आपल्याला आलेली मरगळ निघून जाते. आज भारतातच नव्हे तर परदेशात देखील अनेक असे यशस्वी लोक आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर जीवनात फार मोठे यश मिळवले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जॅक मा सारख्या अवलियाने अनेक नोकऱ्यांसाठी अर्ज केले होते अगदी मॅकडोनाल्डसारख्या फूड चेनवाल्यांनी त्याला नोकरी नाकारली मात्र त्याचा स्वतःवर प्रचंड विश्वास होता म्हणूनच अलीबाबा सारखी कंपनी सुरु करून अब्जाधीश होण्याचा मान मिळवला. भारतात देखील ज्यांचं नाव आदराने घेतले जाते असे धीरुभाई अंबानी एकेकाळी पेट्रोल पंपावर काम करायचे, आज त्यांचाच मुलाने स्वतःच्या मालकीचे पेट्रोल पंप सुरु केले आहेत.
आज धीरूभाईंसारखे अनेकजण आपल्या देशात आहेत ज्यांनी आपली सुरवात अगदी छोट्या कामापासून केली मात्र जिद्दीने आणि मेहनतीने ते यशस्वी झाले. आज अनेक स्टार्टप्स सुरु करणारी तरुण मंडळी अवघ्या काही वर्षात करोडपती झाले आहेत. यातीलच एक नाव सध्या खूप चर्चेत आले आहे ते म्हणजे अश्र्निर ग्रोव्हर…
आपल्या सोशल अकाउंटवरून कायमच चर्चेत आलेला अश्र्निर, शार्क टॅंक या शोमुळे आणखीनच प्रसिद्ध झाला. त्याच्या फटकळ स्वभावामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या शोमध्ये वाद सुरु असतानाच दुसरीकडे ज्या कंपनीचा तो सहभागीदार आहे त्या कंपनीला त्याने रामराम ठोकला आहे.
ज्या प्रमाणे अँपलसारखा दिग्गज ब्रँड बनवणाऱ्या स्टीव्ह जॉबला देखील अँपल मधून काढण्यात आले होते. त्याचपद्धतीने अश्र्निरला देखील एका घोटाळ्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला आहे. आज जरी त्याच्यावर प्रचंड टीका होत असली तरी एकेकाळी त्याने देखील संघर्ष केला आहे.
लिंकडीन या आपल्या सोशल अकाऊंटवरून त्याने आपल्या संघर्षाची माहिती दिली आहे तो असं म्हणतो की, आज जरी माझी जीवनशैली सुखद असली तरी माझ्या मित्रांनी मला त्यांच्या घरी बोलवले तरी मी त्यांच्याघरी बिनधास्तपणे जमिनीवर झोपायला तयार आहे.
कारण मी जेव्हा युके यूएसएमध्ये राहत होतो तेव्हा रस्त्यावर झोपून कंपनीसाठी पैसा उभा करत होतो. त्यामुळे आज जर मी सुख सोयी असलेली जीवनशैली कंपनीच्या पैशावर जगतो त्यात काय चुकीचे आहे. ज्यांनी अगदी शून्यातून सुरवात केली नाही त्यांना संस्थापकांची मानसिकता समजणार नाही.
वास्तविक अश्र्निर हा सुखवस्तू कुटुंबातून आलेला आहे, दिल्लीकर असलेल्या अश्र्निरचे वडील CA तर आई शिक्षिका होती. त्यामुळे घरात त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. दिल्लीमधून त्याने सिव्हिल इंजियरिंगमध्ये पदवी मिळवली असून सुरवातीला काही काळ नोकरी देखील केली आहे.
–
- मोठ्ठं घर, सुपरकार्स आणि महागड्या फॉरेन टूर्स, अश्नीर ग्रोव्हरची शानशौकी…
- KBC Vs शार्क टँक; स्पर्धकांची अब्रू वेशीवर टांगण्याचा नवा प्रकार…
–
आज शार्क टॅंकमुळे अश्र्निर चांगलाच चर्चेत आला आहे त्याच्यावर मिम्स देखील येत आहेत. एखाद्या संस्थेसाठी आपण मेहनत घेतो आणि त्याच संस्थतून आपली हाकलपट्टी झाली तर साहजिकच माणूस निराश होतो, आणि आपण घेतलेल्या कष्टांची मेहनतीची अशा पद्धतीने उजळणी करतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.