आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
डिझेल गाडी म्हणजे जबरदस्त पॉवर आणि पेट्रोल गाडीपेक्षा इंधनाचा खर्च कमी, अशी परिस्थिती असण्याचा एक काळ होता. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फार तफावत राहिलेली नाही, त्यातच एलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या नव्या युगाला सुरुवात होऊ लागली आहे. त्यामुळे डिझेल गाड्यांचा वापर तसा कमी होऊ लागला आहे.
वापर आणि खप कमी होऊ लागणार म्हटल्यावर या गाड्यांचं उत्पादन सुद्धा कमी होणार यात शंकाच नाही. मात्र ही परिस्थिती सध्याची आहे असं म्हणायला हवं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
हे नवं युग सुरु होण्याआधीच, रॉयल एन्फिल्डने एका शानदार डिझेल गाडीचं उत्पादन बंद करण्याचा निणय घेतला होता. ही गाडी म्हणजे डिझेलवर चालणारी बुलेट!
मायलेजच्या बाबतीत थेट स्प्लेंडरलाही टक्कर देऊ शकणारी ‘ही बुलेट नेमकी बंद का करण्यात आली?’, ‘याची कारणं काय होती?’ हे आज जाणून घेऊयात.
एक एकच एकमेव…
ऐंशीच्या दशकापासून जवळपास २००० सालापर्यंत रॉयल एन्फिल्ड टॉरस नावाची एक खास बाईक विकत असे. ही भारतातील एक अशी भक्कम दुचाकी होती जी खेड्यांमध्ये आणि निमशहरी भागांमध्ये अगदी सहज पाहायला मिळत असे.
आजही यातील काही गाड्या प्रगतीशील शहरांच्या किंवा रस्त्यांचे नुकतेच डांबरीकरण होऊ लागलेल्या खेड्यापाड्यांच्या परिसरात पाहायला मिळतात.
मात्र आज रस्त्यावर धावत असलेल्या या गाड्या जुन्या आहेत. कारण या एकमेवाद्वितीय अशा गाडीचं उत्पादन कंपनीने कधीच बंद केलं आहे. ही गाडी मायलेजच्या बाबतीत स्प्लेंडरला सुद्धा टक्कर देणारी होती.
आज तंत्रज्ञान इतकं प्रगत आणि उत्कृष्ट झालेलं असूनही, हल्लीच्या दुचाकी सुद्धा ८५ किमी प्रतिलीटर या मायलेजपर्यंत पोचण्यापासून कोसो दूर आहेत. ही बाईक लोकांच्या आवडीची असण्याची आणि कालांतराने नावडती होत जाण्याची सुद्धा काही कारणं आहेत. ती तुम्हाला माहित आहेत का?
सर्वात लहान फोर-स्ट्रोक इंजिन
बाईकच्या यादीवर नजर टाकली, तर डिझेल बुलेटला असलेलं इंजिन हे भारतात बनणारं सगळ्यात लहान फोर-स्ट्रोक इंजिन ठरतं. सध्याची बुलेट ३४६ सीसी इंजिन क्षमतेची असून ती पेट्रोलवर चालते.
डिझेलवर चालणाऱ्या टॉरसचं इंजिन फोर-स्ट्रोक होतं आणि ते ३२५ सीसी या क्षमतेचं होतं. टॉरस हे खरं नाव असणाऱ्या या गाडीची ओळख मात्र डिझेल बुलेट अशीच राहिली.
गमतीचा भाग असा, की रॉयल एन्फिल्डने या बाइकचं उत्पादन बंद केल्यानंतरही ही बाईक बनवली जात होती. पंजाबमधील सूरज ट्रॅक्टर्स या खाजगी कंपनीने काहीसा स्टयलिश लुक देऊन डिझेल बुलेट पुन्हा एकदा रस्त्यावर आणली होती. लोकांना असलेली या बाईकची आवड यातूनच स्पष्ट होते.
अशी ही टॉरस म्हणजेच डिझेल बुलेट बंद पडण्याची काही महत्त्वाची कारणं सांगायची झाली, तर ती अशी सांगता येतील;
१. वजनात खाल्ला मार
३२५ सीसीचं इंजिन असणाऱ्या डिझेल बुलेटचं वजन जवळपास २०० किलोच्या घरात होतं. १९६ किलो वजनाची असलेली बुलेट तुलनेने हलक्या पेट्रोल बुलेटशी स्पर्धा करण्यात अपयशी ठरली. ३५० सीसी इंजिन क्षमता असलेली बुलेट १६८ किलो वजनाची होती आणि तीच लोकांच्या पसंतीस उतरू लागली.
—
- रॉयल इनफिल्ड बुलेट घ्यायचा विचार करताय? थांबा त्याआधी या ९ टिप्स वाचा!!
- काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या रॉयल एनफील्ड च्या ‘ह्या’ बाईक्स एकेकाळी खूप लोकप्रिय होत्या!
—
२. पॉवरसुद्धा कमी पडली :
मायलेजच्या बाबतीत डिझेल बुलेटचा हात कुणीही धरू शकत नव्हतं, हे खरं असलं तरी पॉवर आणि टॉर्कच्या बाबतीत ती काहीशी मागे होती. अवघ्या ६.५ बीएचपीची पॉवर आणि १५ एनएमचा टॉर्क या इंजिनमुळे मिळणं शक्य होतं.
३. वेगाने पळता आलं नाही :
चार गियर असणारी डिझेल बुलेट, वेगाच्या बाबतीत सुद्धा इतर बाईक्सची बरोबरी करू शकणार नव्हती. अधिकतम वेग पाहिला, तर ही गोष्ट अगदी सहज लक्षात येईल.
६५ किमी प्रति तास याहून अधिक वेगाने जाऊ न शकणारी डिझेल बुलेट, जगाचा वेग वाढू लागल्यावर नकोशी वाटू लागणं साहजिक होतं.
४. प्रदूषणाला आळा नाही :
डिझेल हे तुलनेनं स्वस्त इंधन आहे. अर्थातच तेवढं उत्तम दर्जाचं नसल्यामुळे डिझेल प्रदूषणाला सुद्धा कारणीभूत ठरतं. टॉरसमधून बाहेर पडणारा काळाकुट्ट धूर हे वाढत्या प्रदूषणाचं एक फार मोठं कारण होतं.
त्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या सरकारच्या नियमावलीत अधिक प्रदूषण करणाऱ्या डिझेल बुलेटला पास होता आलं नाही.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.