Site icon InMarathi

शाहरुखचा ‘पठाण’ जुन्या वादांवर पांघरूण घालणार की नवा वाद जन्माला घालणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

“दिन तो कुत्तों के होते है, शेरों का जमाना होता है” असं म्हणत बॉक्स ऑफिसवर डरकाळी फोडणारा किंग खान तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुखच्या ज्या announcement  कडे त्याचे करोडो फॅन्स डोळे लावून बसले होते तो क्षण अखेरीस आला आहे!

शाहरुखच्या आगामी पठाण या सिनेमाची घोषणा त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली असून सध्या सोशल मीडियावर फक्त त्याच्याच चर्चा आपल्याला बघायला मिळत आहेत!

 

 

लोकांना आपण जे करतोय ते आवडत नाहीये हे समजल्यावर तब्बल ३ वर्षं रुपेरी पडद्यापासून पूर्णपणे फारकत घेणारा शाहरुख या सिनेमातून नक्कीच सगळी कमी भरून काढणार आहे असं तरी या सिनेमाच्या टीजरवरून जाणवतय!

सिनेमात जॉन अब्राहम, दीपिका पदूकोणसारखे स्टार्ससुद्धा आहेतच, पण सर्वात जास्त चर्चा होतिये ती शाहरुखच्या कमबॅकची!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरंतर गेली काही वर्षं ही शाहरुखसाठी अत्यंत खडतर होती ते आपण पाहिलंच आहे. सलग एकामागोमाग एक सिनेमे आपटत होते, वेगळे प्रयोग करूनसुद्धा लोकांनी शाहरुखच्या सिनेमांकडे पाठ फिरवली!

२०१८ सालचा झीरो सिनेमा सपशेल आपटल्यानंतर मात्र शाहरुखने ब्रेक घ्यायचं ठरवलं, त्यानंतर मात्र शाहरुखची कुठेच काहीच हवा नव्हती, गेल्यावर्षी मात्र आपण सगळ्यांनीच शाहरुखमधला हताश बाप बघितला, जेव्हा त्याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणी अटक झाली!

 

 

त्यानंतर मात्र शाहरुखची झोप उडाली, आत्ता कुठे ते प्रकरण शांत होत असलं तरी गेल्या वर्षाच्या शेवटपर्यंत शाहरुख विषयी बरंच काही लिहिलं गेलं, बोललं गेलं, त्याच्या सुपरस्टार प्रतिमेला धक्का लावायचासुद्धा प्रयत्न झाला!

त्या सगळ्यातून बाहेर पडतोय ना पडतोय तर लतादीदी यांच्या पार्थिवाजवळ प्रार्थना करत असताना तो कॅमेरात कैद झाला आणि नंतर त्याच्या ‘फुंकण्यावरून’ जो काही गहजब झाला त्यामुळे तर त्याच्यावर कित्येक लोकांनी तोंडसुख घेतलं!

एवढं सगळं होऊनसुद्धा त्याने कुठेही याविषयी वाच्यता केली नाही, कुठेही स्वतःचा तोल ढळू दिला नाही, फक्त येणाऱ्या गोष्टीला तो सामोरं गेला आणि या सगळ्या कॉंट्रोवर्सीकडे त्याने अक्षरशः दुर्लक्ष केलं!

 

आता त्याचा सिनेमा येऊ घातलाय, खरं बघायला गेलं तर गेल्या ३ वर्षात बरंच काही बदल झाले आहेत. प्रेक्षकांची टेस्ट तर बदलली आहेच पण याशिवाय सिनेमामधली स्टारपॉवरदेखील आता कमी होऊ लागली आहे.

कोविड काळात तर ओटीटी माध्यमांचा सुळसुळाट इतका वाढलाय की अजूनही मोठमोठ्या सिनेमांसाठी प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात फिल्ममेकर्सची तारांबळ उडतीये!

अंतिम, ८३ किंवा गंगूबाईसारखे बिग बजेट स्टार पॉवर असणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आदळतायत तर पुष्पा, पावनखिंडसारख्या सिनेमांना लोकं डोक्यावर घेऊन नाचतायत.

 

 

शिवाय शाहरुखचा पठाण हा पुढच्या वर्षी येणार आहे त्यामुळे यावर्षात आणखीनही बरेच बदल आपल्याला बघायला मिळू शकतात, त्यामुळे या सगळ्या स्पर्धेत शाहरुखचा ‘पठाण’ नेमकी काय जादू करणार आहे ते येणार काळच ठरवेल!

शाहरुखच्या या सिनेमाला लोकं डोक्यावर घेणार की त्याच्या ‘पठाण’ या नावावरून कॉंट्रोवर्सी होणार का शाहरुखचा नवा एरा आपल्याला बघायला मिळणार हे काही दिवसात आपल्याला कळेलच!

सध्याची एकंदर परिस्थिति बघता आणि लोकांच्या मनात बॉलिवूडबद्दलचा आकस बघता शाहरुखच्या या सिनेमाच्या बाबतीत काहीतरी कॉंट्रोवर्सी ही नक्कीच होऊ शकते यात काहीच वाद नाही!

 

 

बघायला गेलं तर शाहरुख हा एवढा मोठा स्टार आहे की त्याने अर्थाजनासाठी सिनेमाकडे पाहणं कधीच सोडलं आहे. पैसे कामवायला त्याच्याकडे खूप मार्ग आहेत हे त्यानेच एका मुलाखतीत प्रांजळपणे कबूल केले आहे, तो सिनेमात काम फक्त सिनेमाच्या प्रेमापोटी करतो, असंही त्याने मान्य केलं होतं!

कदाचित यामुळेच त्याने स्वतः सिनेमापासून दूर राहायचं हा निर्णय घेतला आणि तो तितक्याच तत्परतेने निभावलादेखील. अमिताभ बच्चन यांचेसुद्धा सिनेमे जेव्हा आपटत होते तेव्हा त्यांनी काही काळ ब्रेक घेतला होता, आणि नंतर मात्र त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही!

 

 

शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यात काय करतो? त्याची मुलं काय करतात? या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण तो एक उत्तम अभिनेता आहे, त्याहूनही तो एक उत्तम बिझनेसमॅन आहे, त्यामुळे रईसमधल्या त्याच्या डायलॉगप्रमाणे त्याचे दिवस कधीच नव्हते, त्याचा एक जमाना होता, आहे आणि त्याचा जमाना तसाच राहील हे त्याच्या आगामी पठाणच्या टीजर म्हणून आपल्याला जाणवतंय!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version