Site icon InMarathi

बाहुबली आणि पुष्पाप्रमाणे या सिनेमाचे येणारे भाग बॉक्स ऑफिसर धुमाकूळ घालतील

big budget im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदी सिनेमा गेली अनेक वर्ष भारतीय लोकांचं मनोरंजन करत आहे. भारतीय सिनेमाचा दर्जा आता एवढा उंचावला आहे की ते विदेशातही आपली ओळख निर्माण करत आहेत. नुसतं सिनेमाचं चित्रीकरणच नाही तर आता विषय देखील हटके आहेत. पूर्वी एका चित्रपटात पूर्ण गोष्ट मांडली जात होती, मात्र आता हिंदी दिग्दर्शकांनी एक वेगळा फॉर्म्युला काढला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हॉलिवूडमध्ये आपण अनेक सिनेमे हे दोन भागात पहिले आहेत त्याच धर्तीवर आता  ‘बाहुबली’, ‘साहेब बिबी और गैंगस्टर’, ‘तनु वेड्स मनु’, असे अनेक चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित झाले होते . बाहुबलीच्या पहिल्या भागाच्या शेवटी “कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा?” या प्रश्नावर चित्रपट संपवून प्रेक्षकांच्या मनात अशी उत्कंठा निर्माण केली की त्यांनी उत्तर जाणून घेण्यासाठी दुसरा भाग बघायला गेलच पाहिजे.

 

Indiewire

“झुंड मराठीतून का नाही बनवला?” वाचा नागराज काय म्हणतोय…

भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव अभिनेता ज्याला उत्कृष्ट “अभिनेत्रीचा” पुरस्कार मिळाला!

 

 

येत्या काळात असे अनेक चित्रपट येतायत जे एक – दोन नाही तर अनेक भागांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

१. नागिन

चित्रपट निर्माता विशाल फुरिया ‘नागिन’ नावाचा चित्रपट बनवणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणार आहे. अनेक प्रकारचे VFX ya चित्रपटात पहायला मिळणार आहेत. नागीण या विषयावर आजपर्यंत अनेक सिनेमे आणि सिरियल आल्या आहेत. दिवंगत अभिनेत्री रीना रॉय आणि श्रीदेवीने सुद्धा मोठ्या पडद्यावर नागीण साकारली आहे.

 

२. शक्तिमान

९० च्या दशकात ‘शक्तिमान’ या टीव्ही सिरियलने धुमाकूळ केला होता. भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ याची कहाणी होती. ही सिरियल सप्टेंबर १९९७ ते मार्च २००५ पर्यंत खूप गाजली. ही सिरियल बघण्यासाठी लोक शेजारी जाऊन बसायचे आणि मुलं शाळा बुडवून हा शो बघत बसायचे.

 

 

नुकतीच बातमी अशी आली की Sony Pictures आणि मुकेश खन्ना मिळून ‘शिक्तीमान’ वर चित्रपट काढणार आहेत, ही भूमिका कोण करणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तरीही B-town मधून अश्या खबरा येत आहेत की रणवीर सिंह ही भूमिका उत्कृष्ठरित्या करू शकेल. हा चित्रपट देखील Bollywood Trilogies मध्ये सामील होणार आहे

३. ब्रह्मास्त्र

प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात आलिया भट, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी सारखे स्टार्स बघायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या VFX वर खूप पैसा खर्च केला आहे. या फिल्मचे बजेट तब्बल ३०० करोड रुपये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूर हा शंकराची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक हा सिनेमा बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

 

 

४. रामायण ( Bollywood Trilogies )

नावावरून आपल्याला कळतंय की रामायण वर आधारित चित्रपट असणार आहे. हा सिनेमा 3D असून यात महेश बाबू, ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण सारखे स्टार्स बघायला मिळतील. ‘दंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत. साऊथचे प्रसिद्ध फिल्म मेकर्स अल्लु अरविंद, मधु मंटेना आणि नमित मल्होत्रा हे या चित्रपटाचे प्रोड्युसर असणार आहेत.

 

 

५. छत्रपती शिवाजी महाराज

सुपरहिट मराठी चित्रपट ‘सैराट’ चे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाचे अनेक भाग असणार आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Mumbai Film Company हे रितेशचे प्रोडक्शन हाऊस या चित्रपटात पैसे लावणार आहेत. रितेशला हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची इच्छा आहे.

 

 

६. आदिपुरूष

‘आदिपुरुष’ हा देखील एक 3D चित्रपट असून रामायाणावर आधारित असणार आहे. ‘तानाजी’ या चित्रपटाचे डायरेक्टर ओम राऊत हा चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि कृती सैनन दिसणार आहेत. या चित्रपटाचे VFX कमाल असून विदेशी टेक्निशियन यावर काम करत आहेत. ‘आदिपुरुष’ चे बजेट ४०० करोड रुपये आहे.

 

 

निश्चितच हे सगळे चित्रपट भारतात तर गाजणारच आहेत परंतु विदेशातही हे चित्रपट नक्कीच आपलं वेगळं स्थान निर्माण करतील! यातील कुठल्या ( Bollywood Trilogies ) साठी तुम्ही उत्सुक आहात?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version