Site icon InMarathi

LIC च्या IPO ची वाट पाहताय, पण या कारणासाठी हा IPO लांबणीवर पडू शकतो!

LIC ipo featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशात सध्या अस्तित्वात असलेलं केंद्र सरकार, म्हणेजच मोदी सरकारने अनेक सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाची सुरुवात केली, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

मग त्यावरून ‘देश विकणारं सरकार’ अशी टीका करणारे लोकसुद्धा दिसू लागले, तर त्यांचा खाजगीकरणाचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देणारी मंडळीसुद्धा सामान्य लोकांमध्ये दिसू लागली.

 

 

सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण आहे राजकीय मुद्दादेखील बनू लागला; विरोधकांनी विरोध करायचा, सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर द्यायचं, पुन्हा शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले यांना सुरुवात होणार, अशा सगळ्याच गोष्टींना उधाण आलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या सगळ्या वातावरणात खाजगीकरण मात्र सुरूच आहे. या खाजगीकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वर्षानुवर्षे लोकांच्या जवळचा आणि आपुलकीचा विषय ठरलेली सरकारी विमा कंपनी एलआयसी!

एलआयसीच्या खाजगीकरणावरूनही फार उलटसुलट चर्चा झाली. अगदी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या खाजगीकरणाबद्दल वैयक्तिक भूमिका घेतल्या. एलआयसीचा आयपीओ येणार हे मात्र निश्चित होतं. ठरल्यानुसार एलआयसीचा आयपीओ येऊ घातलाय.

 

आयपीओ येणार म्हटल्यावर…

एलआयसीसारख्या मोठ्या, नामवंत आणि ‘विमा म्हणजे एलआयसी’ असं समीकरण तयार झालेलं आहे अशा कंपनीचा आयपीओ येणार म्हटल्यावर, त्यात गुंतवणूक करण्यासाठी सगळेच जण उत्सुक असणार यात शंकाच नाही. या गुंतवणुकीसाठी उत्सुक असणारा मोठा वर्ग याबद्दलच्या घोषणेकडे नजर लावून बसला आहे.

मात्र या सगळ्याच मंडळींसाठी एक काहीशी नकारात्मक बातमी आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचे जगभरात होणारे दूरगामी परिणाम पाहता, एलआयसीच्या आयपीओवर सुद्धा याचा प्रभाव पडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीनुसार घेतलेला होता. त्यानुसार या आयपीओची तारीख निश्चित करण्यात आली होती.

 

मात्र मागील आठवड्याभरात घडणाऱ्या घटनांचा परिणाम आणि बदलणारी परिस्थिती पाहता, या सगळ्याचा फेरविचार करण्याची गरज भासू शकते. अशी गरज वाटल्यास त्यासाठी तयार असल्याचं सीतारामन यांनी सुद्धा सांगितलं आहे.

गुंतवणुकीवर झालेला विपरीत परिणाम

रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम जगभरातील आर्थिक गुंतवणुकीवर झालेला आहे. जगातील जवळपास सर्वच देशांमधील शेअर मार्केटवर विपरीत परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबतीत भारतीय शेअर मार्केटमधील स्थितीसुद्धा फारशी वेगळी नाही.

अशा स्थितीत मोठे गुंतवणूकदार एलआयसीमधील गुंतवणुकीला कसा प्रतिसाद देतील याविषयी अंदाज बांधणं नक्कीच कठीण आहे. केवळ भारतीयच नाही, तर परदेशी गुंतवणुकीवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा आयपीओ आणि त्यातून होणारी गुंतवणूक यावर कुठलाही नकारात्मक परिणाम होऊ नये, यासाठी भारतीय अर्थखातं योग्य तो निर्णय घेण्यासाठी तयार असल्याचं पाहायला मिळतंय.

 

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत वाट पाहणार?

येत्या काही दिवसात या निर्णयासंदर्भात चर्चा होणार असून, एलआयसीचा येऊ घातलेला आयपीओ पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही तारीख पुढे गेल्यास, ती नेमकी कुठली असेल याविषयी सध्या काहीच सांगता येणार नाही, अशीच शक्यता दिसत आहे.

युद्धामुळे निर्माण झालेली स्थिती, त्याचे जगावर होणारे परिणाम, या सगळ्याचा विचार करता, सारं काही शांत आणि सुरळीत झाल्याशिवाय एलआयसीचा आयपीओ न आणण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो.

 

 

त्यामुळेच एलआयसीत गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार अशीच चिन्हं आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version