Site icon InMarathi

महागाई बघून डोळे फिरलेत? पण एकेकाळी या १० गोष्टी मिळायच्या एवढ्या कमी भावात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधीकाळी चार आण्याची, आठ आण्याची नाणी होती ही गोष्ट आता २० रुपयांचं नाणं पाहणाऱ्या नव्या पिढीला सांगितली तर एखादी इतिहासजमा नोंद सांगितल्याचा फील येईल. काय करणार!

हल्ली अगदी काही दिवसांतच एखाद्या साध्या गोष्टीच्या किंमतीचा आकडाही अचानक वाढतो आणि “अहो, मागच्या महिन्यापर्यंत अमक्या किंमतीला मिळत होतं ना हे? मग इतके भाव कसे वाढले?” अशी आपली सहज प्रतिक्रिया असते.

मोठमोठ्या उपकरणांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. ‘महागाई’ हा शब्द कुठल्याच पिढीला नवा नव्हता. पण आताच्या काळातली श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय यांच्यातली प्रचंड वाढती दरी पाहता ‘महागाई’ या शब्दाची व्याख्यादेखील आता सगळ्यांसाठी सारखी राहिलेली नाही.

 

 

जुन्या पिढ्या पैशांची व्यवस्थित बचत करू शकायच्या. पण आता बचत करायची म्हटली तर आधीच कमी असलेल्या पगारातून आपले प्राथमिक खर्च भागवल्यानंतरही अत्यावश्यक खर्चांची यादी कितीही काटछाट केली तरी संपत नाही.

गोष्टींच्या किंमती वाढतात तसं त्यांचं मूल्य कमी होतं हे आपण वाचलं आहे. पण आजच्या काळात अगदी दररोज आपल्याला त्याचा प्रत्यय येतोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यापुढच्या काळातही, विशेषत: पँडेमिकनंतर, आपली इच्छा असो किंवा नसो जितका पैसा मिळेल तितका कमीच पडणार आहे हे एव्हाना आपल्याला पुरतं कळून चुकलंय. पण एक काळ असा होता जेव्हा लोक सतत या ताणाखाली नसायचे.

आपल्या रोजच्या वापरातल्या काही गोष्टींच्या त्या काळातल्या किंमती पाहिल्या तर आता आपल्याला विश्वासही बसणार नाही. या १० दैनंदिन वापरातल्या गोष्टी २० वर्षांपूर्वी आताच्या मानाने फारच कमी भावात मिळायच्या.

१. दूध –

 

 

आपल्या दैनंदिन आयुष्यातला दूध हा अविभाज्य भाग. दिवसाची सुरुवातच मुळात आपण ज्या चहाने करतो तोही दुधाशिवाय होत नाही.

२० वर्षांपूर्वी १ लिटर दुधाची किंमत १२ रुपये होती. पण २०२२ मध्ये मात्र एक लिटर दूध साधारण ६० रुपयांपर्यंत मिळतं. दुधाच्या दर्जानुसार ही किंमत वेगवेगळी असते.

२. स्वयंपाकघरातला गॅस –

 

 

२००२ साली एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत जवळपास २४० रुपये होती. पण आज एका सिलेंडरमागे आपल्याला जवळपास ९०० रुपये खर्च करावे लागतात.

३. डिझेल –

 

 

भारतात २००२ साली १ लिटर डिझेलचा भाव १७ रुपये होता. पण २० वर्षांनंतर आता १ लिटर डिझेल सुमारे ९९ रुपयांपर्यंत मिळतं.

४. रॉकेल –

 

 

२० वर्षांपूर्वी भारतात १ लिटर रॉकेल अवघ्या ९ रुपयांत मिळायचं. मात्र सध्या एक लिटर रॉकेलची किंमत जवळपास ४० रुपये झाली आहे.

५. साखर –

 

२००२ साली भारतात १ किलो साखरेची किंमत ८ ते १५ रुपयांच्या दरम्यान असायची. मात्र २०२२ मध्ये १ किलो साखर ४० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत मिळते. साखरेच्या दर्जानुसार ही किंमत वेगवेगळी असते.

६. मोहरीचं तेल –

 

 

भारतात २००२ साली एक लिटर मोहरीचं तेल साधारण ३५ रुपयांत मिळायचं. मात्र २० वर्षांनंतर या तेलाची किंमत प्रति लिटर प्रमाणे २२० रुपयांच्याही पलीकडे गेलीये.

७. पेट्रोल –

 

 

भारतात २० वर्षांपूर्वी १ लिटर पेट्रोल २७ रुपयांच्या आसपास मिळायचं. मात्र २०२२ सालात १ लिटर पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पलीकडे गेलीये. मुंबईत सगळ्यात महाग पेट्रोलचा आकडा १०९ रुपयांपर्यंत गेलाय.

८. कांदा –

 

 

‘कांदा’ हा रोजच्या स्वयंपाकातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ. कांद्याच्या किंमतीवरून तर सरकारंही पडली आहेत. २० वर्षांपूर्वी १ किलो कांद्याची किंमत १० रुपये होती.

मात्र आजच्या घडीला १ किलो कांदे ६० रुपयांपर्यंत मिळतात. कांद्याचे भाव वरखाली होत असतात.

९. चहापत्ती –

 

२००२ मध्ये एक किलो चहापत्ती साधारण ७० रुपयांपर्यंत मिळायची. मात्र २०२२ मध्ये एक किलो चहापत्तीचे भाव तब्बल ४७२ रुपयांच्या आसपास पोहोचलेत. चहापत्तीच्या दर्जानुसार चहापत्तीची किंमतही वेगवेगळी असते.

१० मीठ –

 

 

मीठ बिचारं या यादीत सगळ्यात शेवटीच घ्यावं लागेल. मिठाची किंमत २० वर्षांपूर्वीपेक्षा आज निश्चितच जास्त असली तरी मीठ काही महागबिहाग झालंय असं म्हणता येणार नाही.

२० वर्षांपूर्वी जे एक किलो मीठ १ ते ५ रुपयांपर्यंत मिळायचं ते १ किलो मीठ आता २० रुपयांपर्यंत मिळतं.

महागाई कधीतरी कमी होईल असं स्वप्न पाहणं आता दुरापास्त झालंय. त्यामुळे आहे ती वस्तुस्थिती स्वीकारून, खात्रीलायक आणि योग्य ठिकाणी गुंतवणुकी करून पुढे जात राहण्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर नाही. पैसा वाचवणं शक्य नसलं तरी तो हुशारीने वापरणं आणि गुंतवणं शक्य आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version