' तासंतास बसून काम करणाऱ्यांसाठी रुजुता दिवेकरनी सांगितले हे सोपे व्यायाम नक्की ट्राय करा! – InMarathi

तासंतास बसून काम करणाऱ्यांसाठी रुजुता दिवेकरनी सांगितले हे सोपे व्यायाम नक्की ट्राय करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोनाने आपलं आयुष्य सर्वार्थाने बदलून टाकलं. आता आपण एकेमकांशी बोलतानादेखील कोरोनापूर्वीचं आयुष्य आणि कोरोनानंतरचं आयुष्य अशा संदर्भात बोलतो. या काळात शाळा-कॉलेजात शिकणारी मुलं व्हर्च्युअल वर्गांना आणि नोकरी करणारी माणसं ‘वर्क फ्रॉम होम’ ला सरसावली.

घरूनच लेक्चर अटेंड करणं आणि काम करणं फायद्याचं वाटू लागलं पण त्याबरोबरीने आपलं बाहेर पडणं आधीपेक्षा बरंच कमी झालं. अजूनही कोरोनाचा कुठला नवा व्हेरियंट अचानक येईल सांगता येत नाही.

 

covid-immunity IM

 

कोरोनाचे रुग्ण अजूनही आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना जरी गेल्या दोन वर्षात हे सगळं सवयीचं झालं असलं तरी अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही.

आता बरेच जण ऑफिसमध्येही जायला लागलेत. तरी अजूनही घरून काम करणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. तासनतास एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रक्तातली साखर वाढणे, पचनासंबंधीचे विकार, वजन वाढणे, तणाव, नैराश्य अशा वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना लोक सामोरे जात आहेत.

आपली एकूणच हालचाल कमी झाल्यामुळे आणि फार विचार न करता हवं ते हवं तसं खाल्यामुळे पॅन्डॅमिकनंतर खरंतर व्यायाम करण्याची गरज आधीपेक्षाही अधिक वाढली आहे पण ते जरी जमलं नाही तरी आपल्याला काही सोपे व्यायाम निश्चितच करता येतील.

सेलिब्रिटी आहार तज्ञ ऋजुता दिवेकर यांनी तासनतास बसून काम केल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी अवघ्या १०-१५ मिनिटांचे सोपे व्यायाम सांगितले आहेत. ऋजुता दिवेकर नेहमीच सोशल मीडियाद्वारे आपल्याला आहारासंदर्भांतल्या , आरोग्यासंदर्भातल्या टिप्स देत असतात. तर जाणून घेऊया या व्यायामांविषयी.

 

rujuta divekar IM

 

ऋजुता दिवेकर यांनी २०२२ सालाकरता १२ आठवड्यांचा ‘डेली फिटनेस प्रोजेक्ट’ सुरू केला आहे. त्याच प्रोजेक्टचा भाग म्हणून त्यांनी तासनतास एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे होणाऱ्या नुकसानावर मात करायला मदत करतील असे अगदी सोपे व्यायाम इन्स्टाग्रामच्या आपल्या व्हिडियोमधून इतक्यातच शेअर केले आहेत.

दिवसभरात कधीही आपल्याला हे व्यायाम करता येतील. सतत बसून काम केल्यामुळे आपलं शरीर कुठल्याकुठल्या बदलांमधून जातं हे त्यांनी व्हिडियोच्या सुरुवातीला सांगितलंय.

त्यात त्या म्हणतात, “आपण सध्या सतत बसून काम करतोय त्यामुळे आपल्या शरीराचं खूप नुकसान होतंय. आपण सतत फोनवर गोष्टी बघत असतो. आपलं ऑनलाईन शाळा-कॉलेज सुरू असतं त्याचा वाईट परिणाम आपल्या डोक्यावर आणि मानेवर होतो. आपण नकळत पोक काढून बसतोय. सतत बसल्यामुळे पाठही अवघडल्यासारखी होते, दुखते. बसून बसून पोट, मांड्या वाढत आहेत. त्यामुळे हे व्यायाम तासनतास बसल्यामुळे शरीराचं जे नुकसान होतं ते कमी करायला मदत करतील.”

 

seating work IM

 

ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले हे बसून आणि तिथल्या तिथे उभं राहून करता येतील असे व्यायाम :

१. ५ वेळा पाय वर उचलणे
२. ५ वेळा पाय सरळ करून वर उचलणे
३. मागच्या बाजूला ५ वेळा खांदे ताणणे
४. ‘काफ स्ट्रेच’ म्हणजेच दोन्ही हात खुर्चीला पकडून एकदा एक पाय खुर्चीवर ठेवणे आणि दुसरा मागे ताणणे. असं दोन्ही पायांनी आलटून पालटून प्रत्येकी ५ वेळा करणे.
५. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच म्हणजेच गुडघ्याच्या मागच्या बाजूला असलेले स्नायू एकेक करून खुर्चीवर ताणणे आणि दोन्ही हात भिंतीकडे सरळ करून ठेवणे. हा व्यायामही ५ वेळा करणे.

hamstring IM

 

६. ५ वेळा शरीराची वरची बाजू म्हणजे अप्पर बॉडी ट्विस्ट करणे
७. ५ वेळा बाहू वर ताणणे
८. प्रत्येकी ५ वेळा पाठ आणि मान ताणणे.

स्ट्रेचिंग केल्यामुळे बरेच फायदे होतात. आपली लवचिकता वाढते, स्नायूंच्या हालचाली सुधारतात, शरीरात सगळीकडे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं ज्यामुळे जखमा बऱ्या होतात आणि जखमा होण्याचा धोका कमी होतो. स्ट्रेचिंगमुळे आपला व्यायामही एरव्हीपेक्षा अधिक चांगला होतो.

अवघ्या काही मिनिटांचे हे स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस करणं आपल्या प्रत्येकाला अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे “हे करून काय होणार” असा विचार करून याकडे दुर्लक्ष न करता काही मिनिटं बाजूला काढून नियमितपणे हे व्यायाम करून बघूया.

 

stretching IM

 

अगदी आमूलाग्र बदल निश्चितच होणार नाहीत. पण ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे काही छोटे फायदे तरी नक्कीच जाणवतील.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?