नोकरी शोधताना cv आणि resume मध्ये गल्लत करू नका!! जाणून घ्या यातील फरक…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कित्येक गोष्टी बदलल्या पण एक गोष्ट मात्र आजही तशीच आहे, ती म्हणजे नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना लागणारी तयारी! आणि या तयारीत पाहिला नंबर लागतो तो बायोडेटाचा!
ते CV किंवा Resume हे शब्द आत्ता जास्त प्रचलित झाले, पूर्वीच्या काळात यालाच बायोडेटा म्हणायचे!
पण एक आहे ही गोष्ट जरी बदलली नसली तरी तिचे स्वरूप मात्र नक्कीच बदलले आहे! पूर्वीच्या काळी हार्ड कॉपी बाळगावी लागायची!
आजच्या टेक्नॉसॅव्ही युगात तुमचा बायोडेटा किंवा सिव्ही ची तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी म्हणजेच पीडिएफ फाइल असून सुद्धा चालते!
सध्या इंटेरनेटच्या माध्यमातून बऱ्याच पोर्टल वरून प्रॉपर आकर्षक सिव्ही बनवून घेता येतो, ज्याची तुम्हाला किंमत मोजावी लागते!
पण सध्याच्या दीखाव्याच्या दुनियेत ती गरज आहे! नौकरी.कॉम सारख्या कित्येक पोर्टल वर एकदम आकर्षक सिव्ही बनवून मिळतो ज्यामुळे तुम्हाला आणखीन चांगल्या संधी उपलब्ध होतात!
आधीच्या काळात हे सगळं जरी नसला तरी लोकांना नोकऱ्या मिळतच होत्या की, आता फक्त त्या प्रक्रियेत चांगला बदल झाला आहे इतकंच!
पण हा बायोडेटा किंवा CV किंवा Resume म्हणजे नक्की काय ते तर बघूया! आपण कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी खूप तयारी करतो.
नवीन नोकरीला लागलेल्या लोकांकडून काही ना काही सल्ले घेतो की, मुलाखतीला कोणते कपडे घालावेत? मुलाखतीला गेल्यावर कसे वागावे? इत्यादी इत्यादी!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तर या मुलाखतीला जाताना आपण आपल्या शैक्षणिक आणि कामकाजविषयक कारकीर्दीचा आढावा म्हणून १ ते २ पानाची माहिती बरोबर घेऊन जातो,
ज्याला काही लोक सीव्ही म्हणतात तर काही रेझ्युमे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
काय म्हणता असं कसं? चला तर जाणून घेऊया CV आणि Resume मधील फरक!
–
- नोकरीत खुश, मात्र वेळेवर पगार नाही? मग या पद्धतीने करा कायदेशीर कारवाई
- Resume मधील या ९ चुका टाळा, मग भरघोस पगाराच्या नोकरीची दारं खुली होतील…
–
ब्रिटीश नागरिक नेहमी सीव्ही बरोबरच नोकरीसाठी अप्लाय करतात, तर अमेरिकेतील नागरिक रिज्यूमेने अप्लाय करतात.ऑस्ट्रेलिया मध्ये दोन्ही वापरले जातात.
सीव्ही :
सीवी (Curriculum Vitae याचा अर्थ जीवनात पुढे जाण्यासाठीचा लेखाजोखा) एक तपशीलवार कागद असतो ज्यामध्ये दोन किंवा तीन पानांमध्ये माहिती दिली जाते.
यामध्ये आपल्या करियर मध्ये आतापर्यंत झालेली प्रत्येक गोष्ट जिला तुम्ही सांगण्या लायक समजता, यात सांगितली जाते.
सीव्ही मध्ये शिक्षण आणि इतर वैशिष्ट्ये, तसेच तुम्हाला मिळालेले अवार्ड, हॉनर्स, प्राइजेस यांचा समावेश केला जातो.
सीव्ही तयार करताना क्रम लक्षात ठेवणे गरजेचे असते. ज्या क्रमाने तुमच्या कारकिर्दीत घटना घडल्या आहेत त्याच क्रमाने त्या मांडणे गरजेचे असते.
सीव्ही प्रत्येकवेळी एकसारखाच असतो. तुम्ही कोणत्याही पोझिशनसाठी अप्लाय करा, यामध्ये काहीच बदल होणार नाही.
जर तुम्ही काही बदल करू इच्छित असाल किंवा त्यात तुम्हाला विशेष काही सांगायचे असेल तर एका कवर लेटर मध्ये तुम्ही त्याबद्दल माहिती देऊ शकता.
रेझ्युमे :
रेझ्युमे (Resume) मध्ये आपली निवडक माहिती दिली जाते. रेझ्युमे एका पानापेक्षा जास्त मोठा नसावा. असे म्हणतात की, मुलाखतकार रेझ्युमे वाचण्यावर जास्त वेळ खर्च करत नाहीत.
रेझ्युमे मध्ये कमी परंतु गरजेची असलेली माहिती भरली जाते. स्वत:ला खास ठरवण्यासाठी रेझ्युमे वापर केला जातो.
एकीकडे सीव्ही कोणत्याही पोझिशनसाठी वापरला जातो, तर दुसरीकडे रेझ्युमेमध्ये मात्र पोझिशननुसार बदल करावा लागतो.
तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्याच्याशी निगडीत माहिती त्यात भरणे गरजेचे आहे. रेझ्युमे मध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना क्रमाने मांडणे आवश्यक नसते.
पण रेझ्युमेमध्ये तुमच्या करियर मधील प्रत्येक गोष्ट लिहिणे गरजेचे नाही.
–
- अचानक नोकरी गेली तर? त्या कठीण दिवसांतून बाहेर पडण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
- नोकरी सोडताना घ्या ही खबरदारी; या चुका चुकूनही करू नका!
–
रेझ्युमे आणि सीव्ही यामधील फरक
रेझ्युमे आणि सीव्ही यामध्ये लांबी, लेआउट आणि ऑब्जेक्टीव्ह यांचा फरक असतो. रिज्यूमे मध्ये तुमची क्षमता, अनुभव याचे कमी वर्णन होते, तर सीव्ही मध्ये ही माहिती विस्ताराने दिली जाते.
तर हा आहे यातला फरक, आपल्याइथे बहुतांश लोकं या दोन्ही गोष्टींमध्ये गल्लत करून या दोन्ही गोष्टी एकच समजतात, पण या लेखावरून समजून येतं की यामध्ये नेमका काय फरक आहे!
दोघांची कामं सारखीच असली तरी दोन्हीमध्ये दिल्या जाणाऱ्या माहितीत सुद्धा बराच फरक आहे!
तुम्हालाही ही माहिती आत्ताच समजली असेल तर तुमच्या मित्रांना घरातल्या लोकांना ही माहिती अवश्य सांगा!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.