Site icon InMarathi

मदत करणं मुंबईकरांच्या DNA मध्येच आहे! मुंबईकर रॉक्स, भाऊ शॉक्स!😂😂😂

local im 11

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रेनचा प्रवास. रोज कामानिमित्त, शिक्षणानिमित्त ट्रेनने प्रवास करणाऱ्या कुठल्याही मुंबईकराला ट्रेनमधली धक्काबुक्की, तुडुंब गर्दी, कानात इअरफोन्स घालून आजूबाजूच्या कलकलाटात गाणी ऐकणं, आपलं स्टेशन येईस्तोवर सकाळ-संध्याकाळ डुलकी काढणं, अनेकांना सिनेमे, वेबसिरीज तर क्वचित कुण्या वाचनवेड्या मित्राला किंवा मैत्रिणीला पुस्तक वाचताना पाहणं हे काहीच नवं नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

धावत्या गाडीत चढायची आणि धावत्या गाडीतून उतरायची आपल्यातल्या अनेकांना सवय असते. असं करणं धोकादायक आहे हे कितीही खरं असलं तरी मुंबईकर ज्याप्रकारे प्रचंड गर्दीच्या ट्रेनमध्ये चढतात आणि उतरतात ते जगाच्या पाठीवर केवळ मुंबईकरांनाच जमू शकतं. “मुंबई तुम्हाला सामावून घेते.” हे आजवर तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल.

 

 

अगदी ट्रेनच्या प्रवासातही तुम्हाला असे मदतगार मुंबईकर भेटतातच. मग ते फोर्थ सीट देणं असो की चालत्या गाडीत पटकन आपल्याला आत ओढून घेणं. पण या अगदी सहज मदत करणाऱ्या मुंबईकरांमुळे एखाद्याची फजितीही होऊ शकते बरं! आता हेच बघा. एक माणूस फास्ट ट्रेनमध्ये चढतो. ट्रेनमधल्या त्याच्या सहप्रवाशांना विचारतो, “”मालाड कुठल्या बाजूला येईल? मला तिथे उतरायचंय.” त्याच्या बरोबरचे सहप्रवासी मन हलवत म्हणतात, “”भाऊ, ही फास्ट ट्रेन आहे. ती मालाडला थांबणार नाही.”

तो माणूस काळजीत पडलाय हे पाहून त्याला दिलासा देत सहप्रवासी म्हणतात, ” “घाबरू नका. मालाडवरून जाताना ट्रेन रोज नेहमी स्लो होते. मालाडवरून जाताना लोकल स्लो झाली की लगेचच तुम्ही धावत्या ट्रेन मधून बाहेर पडू शकता.”

 

“टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन” मधला फरक समजून घ्या…

“एकदा तुम्ही प्लॅटफॉर्मवर पाय टेकवलेत की ट्रेन ज्या दिशेने जातेय त्याच दिशेने जोरात पळायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही पडणार नाही किंवा तुम्हाला दुखापत होणार नाही.”

मालाडवरून जाताना गाडी स्लो झाली आणि त्या सहप्रवाशांनी त्या माणसाला गाडीतून बाहेर उडी मारायला सांगितली. त्यांच्या सांगण्यानुसार त्याने प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि आपण धडपडू नये किंवा आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून ट्रेन ज्या दिशेने जात होती त्या दिशेने जमेल तितक्या वेगाने पळायला त्याने सुरुवात केली.

आता खूप जणांना वाटलं असेल की, “वा! काय मस्त! जमलं बुवा यांना मालाड गाठायला.” पण त्यानंतर मुंबईकरांना आली लहर आणि भाऊंना परत गाडीत घ्यायचा त्यांनी केला कहर. मुंबईकरांची खरंतर यात काहीच चूक नाही म्हणा. त्यांनी आपली मनापासून मदत केली हो! या भाऊंनाच थेट पुढच्या डब्यापाशी पोहोचण्याइतकं सुसाट धावायला कुणी सांगितलं होतं? आपल्या मुंबईकर बंधूंना वाटलं की या स्टेशनवर धावणाऱ्या माणसाला आपण आत घेतलंच पाहिजे. नाहीतर ट्रेन चुकेल बिचाऱ्याची!

 

 

कुणीतरी त्याचा हात पकडला, दुसऱ्या कुणीतरी शर्ट पकडला आणि तिसऱ्याने त्याच्या ट्राउझर बेल्टने त्याला आत खेचलं. ट्रेनने परत वेग धरला आणि ट्रेन बोरिवलीच्या दिशेने जाऊ लागली तसं या नव्या सहप्रवाशांनी एकत्र मिळून त्याला ट्रेनमध्ये ओढलं.

सहप्रवाशांना अगदी ‘हुश्श!’ झालं. त्यांनी छान स्मितहास्य करत त्या माणसाला म्हटलं, “नशीबवान आहात भाऊ तुम्ही. आम्ही तुम्हाला वेळेत आत घेतलं. ही फास्ट ट्रेन आहे. नियोजित शेड्युलनुसार ती मालाडला थांबत नाही.”

त्या भाऊंच्या चेहऱ्यावरचे त्या क्षणीचे भाव बघण्यासारखे झाले असतील. पण काहीच आगापिछा माहीत नसलेल्या या नव्या सहप्रवाशांना काय घडलंय हे कसं कळणार!

 

 

आधीच शांतपणे कुठल्या गाडीत चढायचंय हे ठरवणं आणि त्याप्रमाणे त्या ट्रेनमध्ये चढणं हे प्रत्येकवेळी जमेलच असं नाही. पण जर यापुढे तुम्ही अशा चुकीच्या फास्ट ट्रेन मध्ये पटकन चढलात तर उतरायची उगीच घाई करू नका. नंतर उगीच मुंबईकर सहप्रवाशांना दोष द्याल. कारण, तुम्ही धावताय हे पाहिल्यावर तुम्हाला ते तप्तरतेने मदत करणार नाहीत असं होणारच नाही. अहो, मदत करणं मुंबईकरांच्या DNA मध्ये आहे!

मुंबईकर रॉक्स, भाऊ शॉक्स!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version