आमिरने इम्रानला दिलेल्या वचनाची पाकिस्तानी जनता आजही वाट पाहतेय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमिर खानचं नाव हे बॉलीवूडमध्ये आणि त्याच्या चाहत्यांमध्ये नेहमीच आदराने घेतलं जातं. आमिर खान जे काही करेल ते परफेक्ट असेल हा विश्वास त्याने मागच्या ३० वर्षात आपल्या कामातून कमावला आहे. ‘सत्यमेव जयते’ सारख्या शो मधून आपल्याला त्याचा संवेदनशीलपणा दिसला आणि ‘पानी फाउंडेशन’ सारखे उपक्रम राबवून त्याच्या सामाजिक जाणिवेची लोकांना प्रचिती आली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘जो जिता वही सिकंदर’ सिनेमातील सह अभिनेत्याला लक्षात ठेवून आपल्या निर्मिती ‘लगान’ मध्ये ‘कचरा’चा रोल देणारा आमिर खान हा बॉलीवूडमध्ये नातं टिकवून ठेवणारा एक व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखला जातो.
आशुतोष गोवारीकर, राजू हिरानी यांना कथा ऐकून सिनेमात काम करण्याचे शब्द त्याने नेहमीच पाळले आहेत. शिवाय, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होता तोपर्यंत त्याने नेहमीच आपल्या फॅन्सच्या प्रश्नांना जबाबदारीने उत्तरं दिली. पण, ‘बोले तैसा चाले’ अशी प्रतिमा असलेल्या आमिर खानने २०१२ मध्ये दिलेलं एक वचन आजही पूर्ण केलेलं नाहीये हे नुकतंच समोर आलं आहे.
“इम्रान खान जर पाकिस्तानचा पंतप्रधान झाला तर मी पाकिस्तानला भेट देईल” हा इम्रान खान आणि त्याच्या पाकिस्तान मधील चाहत्यांना दिलेला शब्द पूर्ण केलेला नाहीये याची आठवण पाकिस्तान मीडियाने आमिर खानला करून दिली आहे.
“शब्द पाळता येणार नसेल तर तो देऊ नये” हे माहीत असलेल्या आमिर खानने अशी चूक का केली असावी? आणि काय गरज आहे पाकिस्तानला भेट देण्याची? जाणून घेऊयात.
२०१२ मध्ये इम्रान खान हा भारतात आला होता. क्रिकेट मधील संन्यास घेतल्यानंतर त्याने त्यावेळी तो ‘तेहरीक-ए-इनसाफ’ या राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी करत होता. भारत आणि भारतातील आमिर खान सारख्या नामवंत व्यक्तींच्या भेटीने आपली पाकिस्तानच्या लोकांमध्ये प्रतिमा सुधारण्यास मदत होईल असा इम्रान खानचा मानस असावा.
–
- माधवनच्या या वाईट सवयीमुळे विश्वास नांगरे पाटीलांना त्याच्या रूममध्ये जावंसं वाटत नसे
- आमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार का? कोण असेल ती मुलगी?
–
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान खान आणि आमिर खान यांची ती पहिली भेट होती. १९९२ मध्ये पाकिस्तानला क्रिकेटचा पहिला आणि एकमेव विश्वचषक जिंकून देणाऱ्या इम्रान खानला राजकारणात सुद्धा यश मिळावं यासाठी आमिर खानने आपल्या शुभेच्छा या शब्दात दिल्या होत्या, “तुझ्या सर्व इच्छा, स्वप्न पूर्ण व्हावेत यासाठी मी प्रार्थना करेल.
पाकिस्तान मध्ये असं सरकार निवडून यावं जे की पाकिस्तान समोर असलेल्या सर्व प्रश्न सोडवेल, पाकिस्तानची भरभराट करेल. मला वाटतं की, तुझं सरकार हे काम नक्की करेल. तू जेव्हा लोकसभा निवडणूक जिंकशील तेव्हा मी तुझा विजय साजरा करण्यासाठी स्वतः पाकिस्तानमध्ये येईल. माझ्यासोबत मी काही अजून भारतीयांना सुद्धा घेऊन येईल.”
२०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्रान खानच्या ‘तेहरीक-ए-इन्साफ’ पक्षाला अपयशाचा सामना करावा लागला होता. पण, इम्रान खानने आपलं राजकीय कार्य सुरू ठेवलं आणि त्याने २०१८ मधील सार्वत्रिक निवणुकात त्याने परत भाग घेतला. त्यावर्षी इम्रान खानच्या पक्षाला बहुमत मिळालं आणि तो पाकिस्तानचा पंतप्रधान झाला.
आपल्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी इम्रान खानने जगातील प्रमुख देशातील यशस्वी लोकांना त्याने या सोहळ्यास येण्यासाठी निमंत्रित केलं होतं. भारतातून निमंत्रित केल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये आमिर खानचा सुद्धा समावेश होता. पण, त्यावेळची भारत- पाकिस्तानचे संबंध लक्षात घेता, आमिर खानने या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं होतं. काही ठिकाणी आमिर खानने हे सुद्धा सांगितलं होतं की, “मला असं कोणतंही निमंत्रण मिळालं नव्हतं.”
पाकिस्तानच्या हमीद मीर या टीव्ही पत्रकाराने ही आठवण करून देतांना आमिर खानचा विडिओ दाखवला आणि त्याला पाठवण्यात आलेली निमंत्रण पत्रिका सुद्धा दाखवली होती. आमिर खानबद्दल बोलतांना हमीद मीर बोलला होता की, “भारतीय स्टार अभिनेता आमिर खानने पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना विजय साजरा करण्यासाठी पाकिस्तानला येईल असा शब्द दिला होता. पाकिस्तानमधील त्यांचे चाहते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.”
हमीद मीर यांनी एवढ्यावर न थांबता मूळ पाकिस्तानचा आणि भारतात स्थिरावलेल्या गायक ‘अली जफर’ला ट्विट करून आमिर खानच्या या शब्दाची आठवण करून देण्याची विनंती केली होती. अली जफरने ते ट्विट आमिर खानला टॅग करून आपल्याला सांगितलेलं काम पूर्ण केलं होतं.
हे ट्विट बघून पाकिस्तान मधील कित्येक सिनेरसिकांनी आमिर खानला पाकिस्तानला येण्याची विनंती केली होती. पण, आमिर खानने कोणत्याच ट्विटला उत्तर दिलं नव्हतं. आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या आमिर खानने कुठेच याबाबतीत आजवर स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.
आतंकवादाचा नायनाट करण्याचा शब्द पाकिस्तानसुद्धा कित्येक वर्षांपासून जगाला देत आहे. पण, आजवर त्यांच्या कृतीतून तसं कुठेच दिसून आलेलं नाहीये. अशा पाकिस्तान देशाला आमिर खानने दिलेला शब्द जरी पाळला नाही तरीही त्याचे चाहते त्याच्यावर नाराज होणार नाहीत हे नक्की.
कारण, शब्द न पाळल्याने तो कदाचित ट्रोल होईल. पण, पाकिस्तानला ‘शाही दावत’चा आस्वाद घेण्यासाठी गेलाच तर तो भारतात खूप जास्त ट्रोल होईल हे हुशार आमिरच्या लक्षात आलं असेल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.