Site icon InMarathi

सिनेमात आंबेडकरांच्या एका फ्रेममुळे नागराज मंजुळेला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे!

jhund im 5

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नागराज मंजुळे हे नाव मराठी सिनेसृष्टीतील एक मानाचं नाव आहे. दिग्दर्शन क्षेत्रात हे नाव आता अनेक मुखांमध्ये अगदी मान-सन्मानाने घेतलं जातं. सैराट सिनेमा सुपरडुपर हिट झाला आणि तेव्हापासूनच नागराज मंजुळे हे नाव घराघरात पोचलं. आज ते अनेकांचे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांची नवी कलाकृती कधी येईल, त्यांच्या उत्तम कामाचा नमुना कधी अनुभवता येईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मराठी सिनेसृष्टीत एक नावाजलेलं व्यक्तिमत्व ठरलेले नागराज मंजुळे ‘झुंड’ या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ही जोडी सुद्धा पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असल्यामुळे या सिनेमाची फारच चर्चा आहे.

 

 

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू या नावांच्या चर्चेसह आणखीही एका गोष्टीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. चर्चेत असलेली ही बाब म्हणजे, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असलेली एक फ्रेम! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ट्रेलरमधील एका फ्रेममध्ये स्पष्ट दिसत आहे.

तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दुसरं मिनिट संपल्यानंतर जवळपास १० सेकंदांनी दिसणारी फ्रेम, ही नाक्यापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच चर्चेचा विषय ठरली आहे. हा ट्रेलर, ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या या फ्रेमचा फोटो, नागराज मंजुळे हे नाव या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत असल्याचं यामुळे पाहायला मिळतंय.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत असल्यामुळे नागराज मंजुळे यांची वाहवा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले अशी इतिहासातील इतरही काही मंडळी या फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत.

हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करताना, मंजुळे यांनी महाराष्ट्राच्या पावन भूमीत जन्मलेल्या या ऐतिहासिक व्यक्तींचा गौरव करणारं पाऊल उचललं असल्याचं सुद्धा सोशल मीडियावर बोललं जात आहे. एकूणच त्यांच्या या कृतीमुळे मराठी प्रेक्षकवर्ग, चाहते आणि रसिक फारच खुशीत आहेत.बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या फ्रेममध्ये दिसत आहेत.

 

 

एक दर्जेदार संवाद यावेळी त्यांच्या पात्राच्या तोंडून ऐकायला मिळतोय. “ही मुलं एका दगडात डुक्कर आडवं करू शकतात. त्यांच्या हाती जर चेंडू मिळाला, तर ते जगातील सगळ्यात वेगवान गोलंदाज बानू शकतील.” अशा आशयाचा संवाद अमिताभ यांच्या तोंडी असतानाच ट्रेलरमधील एका फ्रेममध्ये वर उल्लेखित चारही महान व्यक्तिमत्वांचं दर्शन स्क्रीनवर होतं.

“हा बॉलिवूडमधील नवा आणि सकारात्मक बदल आहे”, “हिंदी सिनेसृष्टीत ही अशाप्रकारची फ्रेम पहिल्यांदाच पहायला मिळतेय”, “मेनस्ट्रीम सिनेमात अशा प्रकारची क्रांती फक्त नागराज अण्णाच करू शकतात.” अशा शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक सुरु केलं आहे.

 

४ मार्च रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची चर्चा ट्रेलरमधील एका फ्रेममधूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असेल, तर या चित्रपटाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता नक्कीच मोठी आहे. सामाजिक विषय हाताळण्याचा नागराज मंजुळे यांचा हातखंडा पाहता, ‘गोरगरीब आणि गरजूंमधून फुटबॉलची टीम उभी करणाऱ्या, समाजासाठी झटणाऱ्या एका माणसाचा प्रवास’ दाखवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा मोठी छाप सोडेल याची शंका नेटकऱ्यांना आणि नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांना तरी असल्याचं दिसून येत नाहीये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version