' मेडिकलच्या शिक्षणासाठी भारतीय रशियालाच का पसंती देतात? – InMarathi

मेडिकलच्या शिक्षणासाठी भारतीय रशियालाच का पसंती देतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात सगळीकडे भयाचं सावट पसरलंय. केवळ रशिया-युक्रेनच नाही तर जगातली बाकीची राष्ट्रंही सगळ्या परिस्थितीने हादरून गेली आहेत. सातत्याने समोर येणाऱ्या नवनव्या घटनांमुळे ही परिस्थिती इतक्यात थंड होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर रशिया,युक्रेनमध्ये शिकायला गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिथेच अडकले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अचानक ओढावलेल्या या संकटाशी त्यांना झुंज द्यावी लागतेय. रशियात शिकायला गेलेल्या आणि सध्या रशियात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १४,०००च्या वर आहे. युक्रेनमध्ये आता साधारण १८,००० ते २०,००० भारतीय विद्यार्थी आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे मेडिकलशी संबंधित एमबीबीएस, डेन्टल, नर्सिंग अशा शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत.

 

mba students inmarathi
iibs

 

असं समजतंय की युक्रेनमधले जवळपास २-३ हजार भारतीय विद्यार्थी अशा भागात आहेत ज्याच्या सीमा रूसशी लागून आहेत. या सीमाक्षेत्रांमध्ये रशियाने सुमारे १.३० लाख सैनिकांना सगळ्या सामानानिशी तयार ठेवून युद्धासाठी सज्ज केलंय. शिवाय, रुसपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर युक्रेनमधली ‘खारकीव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी’ आहे. त्यामुळे या आणि आणखी काही भागातले विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.

 

ukraine russia IM

 

विद्यार्थी सांगतात की या सगळ्या परिस्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशात परतायला सांगितलं गेलं तेव्हा विमानाच्या भाड्यात अडीच पटींनी वाढ झाली. युक्रेनमधल्या भारतीय विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेतच. पण नेमक्या कुठल्या कारणांमुळे भारतीय विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी रशिया-युक्रेनला पसंती देतात? जाणून घेऊया.

१. MCI आणि WHO ची मान्यता असलेली विद्यापीठं –

रशियातल्या बऱ्याचश्या युनिव्हर्सिटीज या MCI, WHO तसेच GMC, IMED, USMLE अशा अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांची मान्यता मिळालेल्या आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारतातल्या आणि बाकी देशांतल्या अव्वल दर्जाच्या रुग्णालयांमध्ये इंटर्नच्या जागेवर काम मिळणं किंवा एमबीबीएस डॉक्टर म्हणून भरती होता येणं सोपं जातं.

 

russian medical im 1

 

एमबीबीएसच्या अभ्यासासाठी युनिव्हर्सिटी निवडताना विद्यार्थ्यांनी MCI मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीच्या अव्वल दर्जाच्या युनिव्हर्सिटीजना प्राधान्य द्यावं असा सल्ला देण्यात येतो. बाकी देशांतील युनिव्हर्सिटीजच्या मानाने रशियातील मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये MCI प्रशिक्षणाची असलेली उपलब्धता भारतीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

२. ‘जगात भारी’ पायाभूत सुविधा –

रशियातलया मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये जगातली सर्वोत्तम साधनसामुग्री आणि सुविधा आहेत. सगळे वर्ग व्यवस्थित, स्वच्छ, हवेशीर आणि पूर्ण एसी असलेले आहेत.

३. परवडण्याजोग्या खर्चात शिक्षण –

रशियात आणि युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण घेण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे यूएसए, युके, जर्मनीसारख्या पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत तिथे राहण्यासाठी आणि एकूण शिक्षणासाठी येणारा खूप कमी खर्च.

रशियात प्रत्येक विद्यार्थ्यागणिक महिन्याचा खर्च सरासरी १०० ते २०० डॉलर्स येतो. पण शहराशहरानुसार आणि व्यक्तीच्या जीवनशैलीनुसार खर्चाची रक्कम बदलत राहते.

 

money women inmarathi

 

२०१९ च्या फी स्ट्रक्चर नुसार रशियातल्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठीच्या फीज सुमारे १८ लाख ते २७ लाख आहेत. युक्रेनमध्ये मेडिकलच्या शिक्षणाचा खर्च साधारण २५ लाख आहे. भारतात मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असेल तर जवळपास १ कोटी खर्च येतो.

४. अद्ययावत तंत्रज्ञान आणि शिक्षणपद्धतींचा वापर –

रशियाने सगळीकडे, विशेषतः मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये कायमच अद्ययावर शिक्षणपद्धतींचा वापर केला आहे. ‘भारतीय वैद्यकीय परिषद’, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ सारख्या आघाडीच्या नियामक संस्थांकडून विद्यापीठांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम अपडेट आणि मान्य केला जातो.

 

russian medical im

 

बाकी पाश्चिमात्य देशांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या दर्जाचं वैद्यकीय शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं वैद्यकीय शिक्षण रशियात फार कमी किमतीत विद्यार्थ्यांना मिळतं. भारतीय विद्यार्थ्यांचा मेडिकलच्या शिक्षणासाठी रशियाकडे ओढा असण्यामागे हे निश्चितच महत्त्वाचं कारण ठरतं.

५. उच्च शैक्षणिक दर्जा आणि उच्चशिक्षित शिक्षकवर्ग –

रशियातल्या मेडिकल युनिव्हर्सिटीज जगातल्या सर्वोत्तम सुविधांनी सुसज्ज आहेत. या युनिव्हर्सिटीज सैद्धांतिक ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर देतात. विद्यार्थ्यांना समजायला सोपा जाईल अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार केला आहे. या युनिव्हर्सिटीजमधले शिक्षक उच्चशिक्षित आणि अनुभवी आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ते पूर्णतः सहकार्य करतात.

 

russian mbbs im

 

६. सोयीची प्रवेश प्रक्रिया –

बाकी देशांच्या मनाने रशियन आणि युक्रेनच्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी आहे. या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही किंवा डोनेशन फी भरावी लागत नाही. इथून शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एग्झामिनेशन’ ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. त्यानंतर रोजगाराची हमी निश्चित. रशियातल्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये तर मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिष्यवृत्तीही दिली जाते.

 

examination students girls discussing inmarathi
ummid.com

 

८. इंग्रजीत शिक्षण –

रशियात इंग्रजी माध्यमातच सगळं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना रशियात जाऊन मेडिकलच्या अभ्यासाचं शिक्षण घेणं सोपं जातं. पण इंग्रजी भाषा बऱ्याच ठिकाणी बोलली जात नसल्यामुळे एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना रशियन भाषेचं प्रशिक्षणही रशियात दिलं जातं. रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत याचाही तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होतो. रशियन समुदायात भारतीय विद्यार्थ्यांना मान दिला जातो.

 

english-language-inmarathi

 

९. रॅगिंग मुक्त वातावरण आणि भारतीय अन्नाची आणि हॉस्टेल्सची उपलब्धता –

रशियातल्या विद्यापीठांमध्ये १००% रॅगिंग मुक्त वातावरण आहे. तिथे भारतीय अन्न आणि हॉस्टेल्स अगदी सहज उपलब्द्ध आहेत. मुलांची आणि मुलींची हॉस्टेल्स पूर्णतः सुरक्षित असतात आणि या हॉस्टेल्सची व्यवस्था पाहायला दोन्हीकडे वेगवेगळे अधिकारी असतात.

 

russian im medical

 

इतके मुबलक फायदे मिळतात म्हटल्यावर भारतीय विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने रशिया, युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घ्यायला गेले नसते तरच नवल होतं. पण सध्याची परिस्थिती पाहता “काय विचार करून आलो होतो आणि हे काय घडतंय” असं म्हणण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आली आहे. आधीच घाबरून गेलेले हे विद्यार्थी या अवघड काळात आणखी भरडले जायला नकोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?