' एअरइंडियाच्या प्रमुखाचं अल कायदा कनेक्शन आणि त्यामागचं सत्य जाणून घ्या! – InMarathi

एअरइंडियाच्या प्रमुखाचं अल कायदा कनेक्शन आणि त्यामागचं सत्य जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एअर इंडिया ही विमानसेवा पुरवणारी आपली भारतीय कंपनी नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी त्यांच्या वाढत्या सेवादरांमुळे तर कधी वयस्कर हवाई सुंदरींमुळे तर काही वेळेस उशिराने उड्डाण घेणाऱ्या विमानांमुळे ही कंपनी तोट्यात गेली.

टाटा उद्योग समूहाने एअर इंडियाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे तेव्हापासून त्यांना सेवा सुविधांमध्ये सुधारणा करणे, नफा कमावणे यासोबतच जनमानसात प्रतिमा बदलण्याची सुद्धा मोठी जबाबदारी आहे.

 

air india IM

 

सध्या एअर इंडिया परत एकदा चर्चेत आली आहे ती ‘चीफ’ या पदावर रुजू होणाऱ्या एलकर एसी यांच्या जगातील सर्वात मोठ्या अतिरेकी संघटना ‘अल कैदा’ यांच्यासोबत संबंध असल्याचा आरोप होत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

टाटा उद्योग समूहाने या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवलं आहे. कोण आहे एलकर आयसी? आणि त्यांच्यावर असे आरोप का होत आहेत? जाणून घेऊयात.

एलकर एसी हे जन्माने इस्तांबूलचे आहेत. आपलं शालेय आणि पदवी शिक्षण त्यांनी इंग्लंडमध्ये पूर्ण केलं होतं. १९९४ मध्ये बिलकेंट विद्यापीठातून त्यांनी ‘समाजशास्त्र’ या विषयात पदवी शिक्षण घेतलं होतं.

 

ilker ayci IM

 

५१ वर्षीय एलकर एसी हे एक व्यावसायिकसुद्धा आहेत. २०१५ मध्ये त्यांनी टर्किश एअरलाईन्सच्या चेअरमन पदाची सूत्र हातात घेतली होती. टर्किश एअरलाईन्समधील त्यांच्या कामाच्या अनुभवामुळे त्यांची एअर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ या पदासाठी निवड झाली आहे.

१ एप्रिल २०२२ पासून ते या पदावर रुजू होणं अपेक्षित आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी टर्किश एअरलाईन्सच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. एखाद्या विदेशातील व्यक्तीची भारतातील एखाद्या उच्च पदासाठी निवड होण्याची ही पहिली वेळ नाहीये.

याआधी कित्येक विदेशातील अनुभवी लोकांनी भारतात येऊन काम केलं आहे. इतर देशातील कोणतीही व्यक्ती जेव्हा महत्वाच्या पदावर रुजू होण्यासाठी भारतात बोलावली जाते तेव्हा ‘मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स’ हे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेत असते.

 

ministry of home affairs IM

 

ज्या देशातून व्यक्ती भारतात येणार आहे त्या देशातील गुप्तचर संस्थांवर ही जबाबदारी सोपवली जाते की त्यांनी हे काम केंद्रीय गृहमंत्रालयासाठी करून संबंधित व्यक्तीची माहिती देणारा एक अहवाल सादर करावा.

एलकर आयसी यांच्यासोबत सुद्धा हे झालं होतं. पण, तेव्हा ‘मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स’ला त्या चौकशीत काहीच संशयास्पद आढळलं नव्हतं.

एलकर आयसी यांचे ‘अल-कायदा’ या अतिरेकी संघटनेसोबत संबंध असल्याची अफवा मध्यंतरी भारतात येऊन धडकली आणि तेव्हापासून एअर इंडिया या निवडीबद्दल संभ्रमित झाली आहे.

एअर इंडियाची जबाबदारी जेव्हापासून टाटा उद्योग समूहाकडे आली आहे तेव्हापासून जगातील इतर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनी या ‘एअर इंडिया’कडे खूप सन्मानाने बघत आहेत.

 

maharaja of air india inmarathi

हेच कारण असावं ज्यामुळे, टर्किश एअरलाईन्स मध्ये मोठया हुद्द्यावर असलेल्या एलकर आयसी यांनी भारतातील या नोकरीसाठी अर्ज भरला आणि आपली निवड झाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला होता. “भारताच्या एअर इंडियाला जगातील सर्वात चांगली विमानसेवा पुरवणारी कंपनी करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन” अशी त्यांनी आपल्या निवडीवर प्रतिक्रिया दिली होती.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने याबाबत टाटा उद्योग समूह आणि एअर इंडियाकडे या प्रकरणाबद्दल चौकशी केली असता हे सांगितलं की, “एलकर आयसी यांची होत असलेली चौकशी ही नियमित होणारी घटना आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने जर विनंती केली तरच हे प्रकरण चौकशीसाठी ‘मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स’कडे चौकशीसाठी जाईल. तसं झालं तर रॉ सारख्या इंटेलिजन्स संस्थेच्या मदतीने एलकर यांची पूर्ण माहिती काढण्यात येईल. “

एलकर एसी यांची सखोल चौकशी होण्याचं अजून एक कारण हे आहे की, ते तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे जवळचे मित्र आहेत. एर्दोगन यांचे राजकीय सल्लागार म्हणून सुद्धा एलकर यांनी काम केलं आहे.

 

ilker ayci with erdogan IM

 

ही चिंतेची बाब आहे कारण, एर्दोगन यांनी नेहमीच पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी नेहमीच भारत विरोधी वक्तव्य केली आहेत.

तुर्कीस्तानमध्ये आजवर एकही अतिरेकी हल्ला न होण्याचं कारण त्यांची चोख सुरक्षा व्यवस्था नसून त्यांच्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून अतिरेकी संस्थांना दिली जाणारी खंडणी हे आहे असं नेहमीच बोललं जातं.

नुकतंच फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या संस्थेच्या ‘ग्रे लिस्ट’ मध्ये पाकिस्तानसोबत तुर्कीस्तानचा झालेला समावेश हा या त्यांच्या अतिरेकी संस्थांना निधी देण्याच्या बातमीला पुष्टी देणारा ठरला आहे.

 

turkey IM

 

एलकर एसी आणि एर्दोगन यांचे संबंध १९९४ पासून आहेत. तेव्हा एर्दोगन हे इस्तंबूलचे महापौर होते. त्यांच्या ‘राजकीय सल्लागार’पदी काम केल्यानेच एलकर यांची टर्किश एअरलाईन्सच्या चेअरमनपदी कमी वयात वर्णी लागल्याचं सांगितलं जातं.

एर्दोगन यांनी नेहमीच भ्रष्टाचाराचे समर्थन केल्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. २०१३ मध्ये त्यांच्या दोन्ही मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते ज्यावर त्यांनी कोणतीही कारवाई होऊ दिली नव्हती.

एलकर एसी हे टर्किश इन्व्हेस्टमेंट सपोर्ट अँड प्रमोशन एजन्सी (इस्पात)चे देखील चेअरमन होते. त्यावेळी, त्यांनी यासीन अल-कैदी या ‘अल-कायदा’च्या फायनान्सर व्यक्तीच्या काही वैयक्तिक गुंतवणूक तुर्कस्तान मधील एका व्यवसायिकाला देण्याची परवानगी दिली होती.

 

ilker aicy IM

 

टाटा उद्योगसमूहाकडे नेहमीच एक जबाबदार आणि आदर्श निर्णय घेणारा उद्योगसमूह म्हणून बघितलं जातं.

‘एलकर एसी’ यांच्या बाबतीत सुद्धा ते सखोल चौकशी करून योग्यच निर्णय घेतील असा सर्व भारतीयांना विश्वास आहे, त्यांना गुप्तचर संस्था अचूक माहिती देतील अशी आशा व्यक्त करूयात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?