Site icon InMarathi

मिथुनदाच्या गाण्यांवर एकेकाळी भारतच नव्हे तर रशिया देखील थिरकत होता!

mithun da final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड सिनेमे जितक्या आवडीने भारतात बघितले जातात तितकेच ते परदेशात देखील बघितले जातात. सध्या जरी कोरोनामुळे बॉलीवूड सिनेमांची गर्दी कमी झाली असली तरी दोन तीन वर्षांपूर्वी सिनेमा यायची खोटी, थिएटर हाऊसफुल्ल व्हायचे. सध्या सगळेच निर्माते, थिएटर मालक हाउसफुलच्या पाट्या बघण्यासाठी आतुर आहेत.

बॉलीवूड सिनेमाने जशी भारतीयांची मने जिंकली तशी देशात परदेशातील लोकांची देखील जिंकली आहेत. आज बॉलीवूडचे सिनेमे अमेरिका लंडनपासून ते चीन, आखाती देश, इत्यादी ठिकाणी बॉलीवूडचे सिनेमे आवडीने बघितले जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलीवूडच्या सिनेमांप्रमाणे त्यातील कलाकार देखील तितकेच प्रसिद्ध आहेत, यातीलच एक सुपरस्टार म्हणजे मिथुनदा ज्याला गरिबांचा अमिताभ बच्चन म्हणायचे असा मिथुन दा रशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता.

 

 

तुम्हाला आश्चर्य वाटेल असेल की मिथुनदा कसं काय रशियात इतका मोठया प्रमाणावर प्रसिद्ध झाले? तर यामागे कारण आहे ते म्हणजे त्यांच्या डिस्को डान्सर या सिनेमाचे. १९८२ साली रिलीज झालेला सिनेमा खऱ्या अर्थाने बॉलीवूडचे तंत्रज्ञान बदलवणारा होता.

यातील मिथुनदाचा डान्स त्याच्या स्टेप्स, डिस्कोनामक प्रकार, एकीकडे मिलवर्कर यांचे प्रश्न सोडवणारे सिनेमे तर दुसरीकडे लोकांना थिरकवणारे सिनेमा लोकांना जास्त आवडू लागले.

मूळचे बंगालचे असेलेले मिथुनदा, सुरवातीला काही काळ नक्षलवादी गटात देखील सामील झाले होते मात्र अभिनय आणि नृत्याच्या वेडामुळे पुढे पुण्याच्या FTI मध्ये दाखल झाले, अभिनयाचे शिक्षण घेऊन पुढे बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आले, सुरवातीला छोटी मोठी कामे मिळत गेली मात्र ब्रेक मिळणार सिनेमा होता तो म्हणजे डिस्को डान्सर..

 

भारतात तर सिनेमा आणि बप्पी दांचं संगीत चांगलेच हिट ठरले, हा सिनेमा मध्य आशिया, यूरोपमध्ये देखील आवडीने पहिला गेला मात्र सिनेमाची चर्चा झाली ती तेव्हाच्या सोव्हिएत युनियनमध्ये, रशिया तेव्हा सोव्हिएत युनियनचा भाग होता. रशियातील लोकांनी राज कपूर आणि कपूर खानदानाला डोक्यावर तर घेतलेच होते मात्र डिस्को डान्सरमुळे मिथुनदेखील प्रसिद्ध झाले.

 

 

मिथुनदांचा डान्स, बप्पीदांच संगीत, डिस्को प्रकार, सामान्य माणूस अशा गोष्टी रशियन मंडळींना आवडायच्या, आणि त्याकाळात एकूणच भारतातील सामाजिक,राजकीय आर्थिक वातावरण जस होते तशा पद्धतीने सिनेमे बनवले जात होते.

सामान्य हिरो असामान्य गोष्ट करतो, अन्यायाविरोधात पेटून उठतो, दुखी होतो, प्रेम करतो या गोष्टींचा भरभरून मसाला वापरून निर्मात्यांनी आपापले खिसे भरले होते.

राज कपूरांच्या लोकप्रियानंतर रशियामध्ये जर बॉलीवूडमधील कोणाला डोक्यावर घेतलं असेल तर ते म्हणजे मिथुनदां, डिस्को सिनेमानंतर ते जेव्हा रशियाला गेले होते तेव्हा त्यांना एअरपोर्टवर भेटायला रशियन मंडळी गर्दी करायचे.

त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी एका फोटो काढण्यासाठी लोक वाट बघत बसायचे. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कट्टर रशियन मंडळी चक्क हिंदी शिकायचे.

 

 

रशियन मंडळींप्रमाणे सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह जेव्हा भारत भेटीसाठी आले होते, तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे स्वागत केले होते, आणि अमिताभ बच्चन यांची भेट घडवून दिली होती, मात्र गोर्बाचेव्ह यांनी राजीव गांधींना असे सांगितले की माझी मुलगी तर मिथुन चक्रवर्तींची चाहती आहे.

या किस्स्यांवरूनच तुमच्या लक्षात आले असेल की मिथुनदा आणि त्यांची रशियातील लोकप्रियता, आज रशिया आणि युक्रेन एकमेकांसमोर आले आहेत, भारताचे दोन्ही देशांशी उत्तम संबंध आहेत त्यामुळे आता भारत कोणते पाऊल उचलेल हे काही दिवसात कळलेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version