आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तासातासांच्या अंतरांनी नव्यानव्या बातम्या समोर येत आहेत. हे तिसऱ्या महायुद्धाचे तर संकेत नाहीत ना असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया हे खरंतर आपलं मित्रराष्ट्र. त्यात या सगळ्या भूमिकेवर भारताने जी भूमिका घेतलीये त्यासाठी रशियाने भारताचं कौतुक केलं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अमेरिकेने इतक्यातच रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियावर अतिशय कडक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेला अशी आशा आहे की या निर्बंधांमुळे रशियाची आक्रमकता शिथिल होईल आणि रशिया युक्रेनला शरण येईल. पण आश्चर्याची गोष्ट ही की बायडन प्रशासनाने रशियावर निर्बंध लावण्याची ही जबाबदारी एका भारतीयावर सोपवलीये. त्यांचं नाव दिलीप सिंग असून ते भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आणि बायडन प्रशासनाचे आर्थिक सल्लागार आहेत.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी युक्रेनच्या ‘दोनेत्स्क’ आणि ‘लुहान्स्क’ या देशांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे आणखीनच तणाव वाढला असून युक्रेनवर मॉस्कोच्या हल्ल्याची शक्यता वाढली आहे. पुतीन यांनी रशियन सैनिकांना पूर्व युक्रेनच्या दिशेने कूच करण्याचे आदेश दिले असून क्रेमलिनने त्याला ‘शांतीरक्षा अभियाना’चं नाव दिलंय.
दिलीप सिंग हे अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’ मध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा परिषदे’चे ‘उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ आहेत आणि ‘राष्ट्रीय वित्त परिषदे’चे ‘उपसंचालक’ आहेत. यापूर्वी ‘ओबामा सरकार’च्या काळात ते ‘ट्रेजरी ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’चे ‘उप सहाय्यक सचिव’ होते आणि ‘ट्रेजरी ऑफ फायनांशीअल मार्केट्स, पोर्टफोलियोज’चे ‘कार्यवाहक सहाय्यक सचिव’ होते.
युक्रेन-रशियामध्ये अशी तणावपूर्ण परिस्थिती असताना इतक्यातच ते दुसऱ्यांदा ‘व्हाईट हाऊस’ मध्ये दिसले. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचं समजतंय. युक्रेनवर ओढावलेलं संकट पाहता रशियाच्या विरोधात निर्बंध लावण्याचा जेव्हा विचार चालला होता तेव्हा बायडन प्रशासनाने सगळ्यात आधी दलीप सिंग यांना ‘व्हाईट हाऊस’मध्ये बोलवून घेतलं.
‘व्हाईट हाऊस’चे प्रवक्ते जेन साकी यांनी दलीप सिंग यांच्या संदर्भात म्हटलं की, “लोकाग्रहास्तव दिलीप सिंग यांना परत आणलं गेलंय.” सिंग हे बायडन प्रशासनाच्या रशियासंदर्भातल्या धोरणात फार महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.
रशियाविरोधात निर्बंध लावायच्या कार्यकारी आदेशावर राष्ट्र्पती बायडन यांची स्वाक्षरी मिळाल्यांनतर दिलीप सिंग यांनी ‘व्हाईट हाऊस’मधल्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रशियाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. रशियाविरोधातलं अमेरिकेचं धोरण किती कठोर असेल हे त्यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं, “युक्रेनवर अतिक्रमण करायला रशियाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हीही यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहोत.
आमच्या वेगाला आणि एकजुटीला इतिहास साक्षी आहे. आम्ही जर्मनीसोबत रात्रभर चर्चा करून रशियाच्या ‘नॉर्ड स्ट्रीम -२’ या महत्त्वपूर्ण अशा प्राकृतिक गॅस प्रकल्पाचं कामही बंद पाडलं आहे.” एरव्ही असे निर्बंध लावायला कैक आठवडे, महिने जातात. पण दिलीप सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली बायडन प्रशासनाने जलद गतीने पावलं उचलली आहेत.
दिलीप सिंग यांनी म्हटलंय की जर्मनीला गॅसचा पुरवठा करणाऱ्या नॉर्ड-२ या प्रकल्पात रशियाने तब्बल ११ अरब डॉलर्सची भरभक्कम गुंतवणूक केली आहे. आता ही सगळी गुंतवणूक फुकट गेली. हा प्रकल्प रशियाच्या वित्तीय साठ्यात भर घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार होता. त्यांनी म्हटलंय की, याव्यतिरिक्त रशियातल्या बँकांवर आणि मोठमोठ्या व्यावसायिकांवरही आर्थिक निर्बंध लावण्यात आले आहेत.
दिलीप सिंग म्हणाले की, हे आर्थिक निर्बंध लादून आम्ही आमचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. यात आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. पुढे ते म्हणाले की जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर रशियाच्या दोन सगळ्यात मोठ्या वित्तीय संस्थांवरही निर्बंध लावले जातील.
आतापर्यंत रशियाची पाचवी सगळ्यात मोठी वित्तीय संस्था ‘वीईबी’वर, रशियाच्या ‘प्रोम्सवाज बँके’वर निर्बंध लावले गेले आहेत. रशियाच्या वित्तीय संस्थांवर संपूर्ण निर्बंध लावण्याचा अर्थ असा की या बँका आता अमेरिका किंवा युरोपशी कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. रशियन बँकांची जी संपत्ती अमेरिकेतल्या संस्थांमध्ये आहे तीदेखील त्यांना आता परत मिळणार नाही.
–
- युक्रेन-रशिया वादाचे मूळ आहे जर्मनी…! आंतरराष्ट्रीय राजकारण जाणून घ्या
- या पंतप्रधानांना महागात पडली दारू पार्टी, नारायण मूर्तींच्या जावयाची लागणार वर्णी?
–
अमेरिकेसारख्या देशाने एका भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या पुढाकाराने रशियावर निर्बंध लादणं यामागच्या राजकीय हेतूत शिरायला नको. पण भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या शब्दाला ‘व्हाईट हाऊस’ मध्ये इतकं वजन असावं आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडाव्या या बाबी भारतीयांच्या बुद्धिमत्तेची जगाला किती गरज आहे हेच पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करणाऱ्या आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.