स्मशानात सुरु केलेल्या चहाच्या टपरीचं आता एका हॉटेलात झालं रूपांतर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात प्रत्येकजण खाण्यापिण्याचा शौकीन आहे. भारतातील लोक नेहमी वेगवेगळ्या कॅफे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतात आणि त्यांचे फोटो वगैरे काढून सोशल मीडिया वर शेयर करत असतात. जन्मदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा अन्य कुठले प्रसंग असो, बहुतेक लोक ही प्रसंग सेलिब्रेट करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जात असतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जर तुम्हालाही एखादे प्रसंग सेलेब्रेट करायचे असेल आणि तेही एखाद्या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी द्यायची असेल तर तुम्ही आमचा आजचा हा लेख नक्की वाचा. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका अशा अनोख्या रेस्टॉरंटविषयी सांगणार आहोत, जिथे आपल्याला चक्क मृत व्यक्ती सोबत जेवण करायला मिळतं.
‘द न्यू लकी रेस्टॉरंट’ या नावाने ओळखला जाणारा हा टी स्टॉल, खमाशाच्या जुन्या अहमदाबाद भागात स्थित कब्रिस्तानवर बांधलेला आहे. हे एकमेव असे ठिकाण असेल जिथे आपल्याला मृतांसोबत चहा घ्यायला आणि जेवायला मिळत असेल.
एखाद्या मृत व्यक्तीसोबत किंवा एखाद्या कब्रिस्तान मध्ये चहा पिणे हे आपल्यासाठी जरी असामान्य असले तरी अहमदाबादच्या लोकांसाठी हे अगदी सामान्य झाले आहे कारण येथील ‘द न्यू लकी रेस्टॉरंट’चे दृश्य असेच काहीसे आहे. इथे गेल्यावर ते रेस्टॉरंट, स्मशान आहे की चहाची टपरी आहे असा विचार करायला आपल्याला नक्कीच भाग पडेल.
या रेस्टॉरंटमध्ये एकूण २६ कबरी आहेत. तथापि, या ठिकाणी भेट देणाऱ्या ग्राहकांना देखील आता याची सवय झाली आहे. तसेच या रेस्टॉरंटमध्ये येणारे लोक आनंदाने मृतांसोबत मेजवानी करतात आणि बराच वेळ घालवतात. हे रेस्टॉरंट ज्याठिकाणी बांधलेला आहे त्याठिकाणी एकेकाळी कब्रिस्तान अस्तित्वात होता आणि ही कब्रिस्तानची जागा खाजगी मालकीची होती.
परंतु त्याकाळात या जागेच्या मालकाला या जमिनीवर हॉटेल सुरु करायचे होते आणि सोबतच त्याला तिथे असलेल्या कबरला धक्का ही लावायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी रेस्टॉरंटसाठी ती जागा साफ करण्याऐवजी, कबरींमधील उपलब्ध जागेवरचं टेबल लावून त्यांनी आपल्या हॉटेलसाठी बसण्याची व्यवस्था केली.
● रेस्टॉरंटची सुरुवात.
केएच मोहम्मद आणि कृष्णन कुट्टी नायर या दोन तरुणांनी या स्मशानाच्या शेजारी कडुलिंबाच्या झाडाखाली हातगाडी म्हणून चहाची टपरी सुरू केली होती. चहा व्यतिरिक्त, त्यांनी ‘मस्का बन’ विकायला सुरुवात केली होती. काही दिवसांमध्येच त्यांचा मसाला चहा एवढा प्रसिद्ध झाला की, ग्राहकांना त्या चहाच्या टपरीजवळ उभे राहण्यासाठी देखील जागा उपलब्ध नव्हती.
त्यामुळे या दोघांनी त्यांच्या वाढत्या ग्राहकांची पूर्तता करण्यासाठी झाडाभोवती एक खोली बनवली. ही लोक चहामध्ये कोको पावडर वापरत असे, जे लोकांना खुप आवडत होते. चहा आणि मस्का बन व्यतिरिक्त, त्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार इतर स्वादिष्ट पदार्थ द्यायला सुरुवात केली.
अहमदाबादच्या लोकांनी सुरुवातीला तर या कब्रिस्तानमध्ये असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचे टाळले, परंतु जेव्हा या लोकांना कळले की, या कबरी १९ व्या शतकातील संतांची आहेत, तेव्हापासून त्यांनी या रेस्टॉरंटला भेट देण्यास सुरुवात केली आणि आता तर या रेस्टॉरंटमध्ये जगभरातून लोक येत असतात. दररोज सकाळी या कबरी स्वच्छ केल्या जातात आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून ताजी फुले अर्पण केली जातात.
प्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसैन हे त्यांच्या अहमदाबादमधील वास्तव्यादरम्यान अनेकदा रेस्टॉरंटमध्ये येत होते. एमएफ हुसेन हे या रेस्टॉरंटच्या मालकांपैकी एक मिस्टर मोहम्मद यांचे मित्र होते, नव्वदच्या दशकाच्या सुरूवातीस हुसैन अनेकदा या रेस्टॉरंटमध्ये येत असत.
–
- भारतातील १० करोडपती चहावाले, ज्यांनी या साध्या धंद्यातून कमावले ढिगाने पैसे!
- ७८०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २६ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा
–
१९९४ मध्ये रेस्टॉरंटमध्ये चहा आणि मस्का बन घेताना त्यांनी एक पेंटिंग बनवली होती आणि तिच पेंटिंग त्यांनी नंतर त्या रेस्टॉरंटच्या मालकाला भेट दिली.
पेंटिंग अजूनही रेस्टॉरंटच्या भिंतीवर टांगलेली आहेआणि अजुनही तेवढीच आकर्षक आहे. या पेंटिंगमध्ये दोन उंट आणि एका वाड्यासारखे बांधकाम आणि पार्श्वभूमीत वाळवंट दाखवण्यात आले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.