Site icon InMarathi

युक्रेन-रशिया युद्ध सुरु झालं, पण भारतावर परिणाम होणार नाही असं समजू नका

putin im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साधं घरात नवरा बायकोच भांडण झालं तर त्याचे परिणाम घरात राहणाऱ्या व्यक्तींवर होत असतात. छोट्या मोठ्या कुरबुरींचे नंतर मोठ्या भांडणात रूपांतर होते आणि मग शेवटी हे भांडण टोकापर्यंत जाते, आजकाल चार घरांमध्ये आढळून येणारी ही गोष्ट आहे.

दोघांच्या भांडणाने संपूर्ण कुटुंब चिंतेत पडते तर तिथे दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकले असताना संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. तुम्हाला कळलेच असेल ते नेमके कोणते देश आहेत तर देश आहेत रशिया आणि युक्रेन, गेल्या अनेक दिवसांपासून जशा  महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातील कुरघोडीच्या बातम्या जसा ऐकत आलो आहोत तशा सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध होणार का अशा बातम्या ही ऐकत आहोत.

 

 

सोव्हिएत युनियनमधून रशिया आणि युक्रेन वेगळे झाल्यापासून हा वाद सुरु झाला आहे. युक्रेन हा खरंतर  महाकाय रशियाचाच भाग आहे मात्र रशियन लोक हे स्वतंत्र युक्रेन मान्य करत नाहीत. नेमकं त्यांच्यात वाद कशावरून हे आधी जाणून घेऊयात आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे जाणून घेऊयात….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रशिया युक्रेन वाद :

वरती आपण जसे बघितले की, रशियाला मुळातच युक्रेन वेगळा झालेला मान्य नाही, युक्रेन १९९१ साली रशियापासून वेगळा झाला आहे. स्वतंत्र झाल्या झाल्या युक्रेनने युरोपियन युनियनआपले संबंध जोडले, यूरोपातील देश हे अमेरिकेच्या अधिपत्याखाली असल्याने साहजिकच युक्रेनदेखील त्यांच्यात सामील होणारआणि नेमकी हीच गोष्ट रशियाला मान्य नाही. आणखीन अनेक कारण या दोन्ही देशांच्या वादाला जबाबदार आहेत.

 

 

जगभरातील १२ देशांनी एकत्र येऊन NATO ची स्थापना केली यामागचा उद्देश असा आहे की या संस्थेतील कोणत्याही देशावर हल्ला झाला तर उर्वरित देश त्या देशाच्या बाजून राहतील, आजवर या NATO मध्ये एकूण ३० देश आहेत, याच संस्थेत युक्रेन सहभाग होण्यास तयार आहे मात्र रशियाचा याला पूर्ण विरोध आहे. युक्रेन यूरोपातील रशिया नंतरचा मोठा देश मनाला जातो,

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लामिदीर पुतीन यांना असा संशय आहे की NATO आणि अमेरिका एकत्र येऊन रशियाला कोंडीत पकडू शकतात. तसेच रशियाचा मुख्य आक्षेप या NATO संस्थेवर आहे कारण त्यांचा असा दावा आहे की यूरोपातील रशियाचे महत्व कमी करण्यासाठी या संस्थेची स्थापन झाली आहे. त्यामुळे जर युद्ध झाले तर अमेरीका युक्रेनच्या बाजूने उभी राहील तर रशियाच्या बाजूने देखील काही देश उभे राहतील.

 

interaztv.com

 

भारत रशिया संबंध :

गेल्या दीड महिन्यापासून रशिया आणि युक्रेन चाललेल्या वादामुळे भारतातील पालक चिंतेत पडले आहेत. कारण आज भारतातील अनेक विद्यार्थी मेडिकल शिक्षणासाठी या दोन देशांमध्ये शिकत आहेत. त्यामुळे भारताचे या दोन्ही देशांशी संबंध चांगले आहेत.

 

गेल्या सत्तर वर्षांपासून आपण भारत आणि रशियाचे संबंध ऐकून आलो आहोत, आणि भारताच्या सरंक्षण क्षेत्रामध्ये रशिया दीर्घकाळापासून आपल्यासोबत आहे. तसेच राज कपूर आणि रशिया हे एक वेगळे नाते आहे. राज कपूर यांच्या अनेक सिनेमांना रशियन लोकांनी पसंती दर्शवली आहे, तसेच पंतप्रधान मोदीजींनी देखील या दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेटी घेतल्या आहेत. यात चीन हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता.

युक्रेन रशिया युद्धाचा भारतावर परिणाम :

आज सामान्य माणसाला जगात कोणाचे काय चालले आहे याच्याशी काही देणे घेणं नसते,मुंबईकर तर सकाळची लोकल मिळेल का या एकाच चिंतेत असतो, मात्र या दोन्ही देशात जर युद्ध झाले तर याचा परिणाम सामान्य माणसाला देखील होऊ शकतो कसे ते म्हणजे रोजच्या वापरातील गोष्टींचा तुटवडा पडू शकतो अथवा या गोष्टी महाग होऊ शकतात.

या युद्धामुळे रोजच्या आयुष्यातील तेल, पेट्रोल डिझेल यांच्या किमती वाढू शकतात, आधीच पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. कारण भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेलआयात करतो, रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्मिती होते.  त्यामुळे युद्ध जर झाले तर त्याचा सर्वाधिक भार आपल्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. युद्ध जर झाले तर तिकडच्या स्थानिक भारतीय मंडळींच्या सुरक्षेची जबाबदारी कशी घेता येईल हा ही प्रश्न भारतापुढे आहे.

 

india.com

कच्चे तेल, पेट्रोल डिझेल तर झाले मात्र रोजच्या घरातील आपण जो गॅस वापरतो तो ही महाग होऊ शकतो. तसेच गव्हासारखी गोष्ट देखील महाग होऊ शकतो. रशिया आणि युक्रेन गहू निर्यातील अग्रेसर आहेत, त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणाची पंचाईत होऊ शकते.

आधीच संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धाच्या कटू आठवणीतून बाहेर आलेले नाही, आजही यूरोपातील जर्मनी सारख्या देशांवर आजही दुसऱ्या महायुद्धाचे घाव पुसले गेले नाहीत. त्यामुळे तिसरे युद्ध भडकू नये अशी सगळ्यांची अपेक्षा आहे कारण या युद्धामुळे आधीच जे देश विकासापासून दूर आहेत असे देश नाहक या युद्धात बळी पडून आणखीनच रसातळाला जाऊ शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version