ट्विंकल खन्ना एका विचित्र आजाराने ग्रस्त: सोशल मिडीयावर चर्चेला उधाण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या सगळ्यांनाच काही चांगल्या – वाईट सवयी असतात. अनेकांना प्रयत्न करूनही आपल्या वाईट सवयी सोडण्यात अपयश येतं. पण आपल्याला अशाही काही सवयी असतात ज्यांची गणना आपण चांगल्या किंवा वाईट सवयींमध्ये करू शकत नाही.
आपल्या संपर्कात येणारी माणसं आपापल्या मतानुसार ती सवय चांगली की वाईट हे ठरवत असतात. मनात येईल ते बिनधास्त बोलणे ही गोष्ट काही लोकांना आवडते तर काही लोकांना खटकते. काहीजण याला ‘स्पष्टवक्तेपणा’ म्हणतात तर काहीजण ‘उद्धटपणा’!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याची पत्नी आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची मुलगी असलेली यशस्वी लेखिका ट्विंकल खन्ना हिलादेखील कुठलेही फिल्टर्स न लावता मनात येईल ते बिनधास्त बोलायची सवय आहे. ट्विंकल खन्नाच्या बोलण्याचा हा बोल्ड अंदाज आपण आजवर वेगवेगळ्या मुलाखतींमधून आणि तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट्सवरून पाहिला असेलच.
इतक्यातच ट्विंकलने इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट सध्या लोकांचं लक्ष चांगलंच वेधून घेतेय. या पोस्टमधून तिने आपल्याला असलेल्या एका आजाराविषयी सांगितलंय. काही लोक तिच्या या पोस्टची यथेच्छ मजा लुटताहेत तर काही जण तिला यावर ‘चिंताच करू नको’ असा सल्ला देत आहेत. नेमका काय आहे हा प्रकार?
ट्विंकलने जी पोस्ट केलीये त्यात तिने शेअर केलेल्या फोटोत ती इंचटेपने काहीतरी मोजताना दिसतेय. या पोस्टचं मुख्य आकर्षण ठरलीये ती ट्विंकलने फोटोखाली लिहिलेली कॅप्शन. तिने टाकलेला तिचा फोटो या कॅप्शनशी सुसंगत आहे.
—
View this post on Instagram
—
ट्विंकलने लिहिलंय, “असं म्हणतात, दोनवेळा माप घ्या आणि एकदा कापा. लिखाण करताना मी हेच करते. पण बोलतानाही मला हे करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. विचार न करता बोलण्याच्या या आजारामुळे मी अनेकदा अडचणीत येते. हे खूप लाजिरवाणं आहे.”
हे लिहून झाल्यावर ट्विंकलने तिच्यासारखाच ‘फूट इन द माऊथ’ हा गंभीर आजार असणाऱ्या सगळ्यांना कमेंट्समध्ये आपले वाईट अनुभव लिहा असं म्हटलंय.
खरंतर ‘फूट इन द माऊथ’ ही गोष्ट काहींना चुकीची वाटली तरी हा नक्कीच आजार नाही. मनाला येईल ते पटकन बोलून टाकण्याची काही लोकांना जी सवय असते त्या सवयीविषयीच ट्विंकल खन्नाने लिहिलंय. पण याच सवयीमुळे चारचौघात आपलं हसं होऊ शकतं. जरी तुम्ही प्रगल्भ असलात तरी तुमच्या या सवयीमुळे लोक तुम्हाला बालिश समजू शकतात. विनाकारण तुमचं एक चुकीचं चित्र लोकांच्या मनात तयार होऊ शकतं. थोडक्यात लोकांच्या मस्करीला तुम्ही खाद्य पुरवत राहता.
ट्विंकलने इतक्यातच केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. एका युजरने असं लिहिलंय की, “हा कुठलाही आजार नसून स्पष्टपणे बोलण्याची सवय आहे. तुम्ही किमान त्या लोकांपैकी नाही जे दिखाऊपणा करतात.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, “हा आजार नाही. तुझी ही सवय कायम ठेव. आम्ही सुधारणार नाही आणि आम्हाला जे बोलायचंय ते बिनधास्त बोलू. तेव्हा काळजी करू नकोस.”
अनेक ज्वलंत विषयांवर आणि इतरही गोष्टींवर निडरपणे आपली मत मांडणारी ट्विंकल यापूर्वीच्याही तिच्या काही पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे.
आपला नवरा अक्षय कुमारविषयी तिने केलेल्या एका पोस्टनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्या पोस्टमध्ये तिने अक्षय कुमारचा एक फोटो शेअर करत त्याला आपला ‘माल’ म्हटलं होतं. आपल्या नवऱ्याचं वय व्हिस्कीसारखं वाढतंय. दारू जुनी झाली की कशी अधिक नशिली होते तसंच काहीसं अक्षय कुमारच्या बाबतीत आहे असं तिने त्यात म्हटलं होतं. ही पोस्टदेखील चांगलीच व्हायरल होऊन लोकांना चघळायला विषय मिळाला होता.
हे केवळ आपल्यासारख्या सर्वसामान्य रसिकप्रेक्षकांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर अक्षय कुमारने जेव्हा लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती तेव्हा खुद्द मोदींनीही ट्विंकल खन्नाच्या एका सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख केला होता.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही बॉलिवूडमधली ‘हॉट अँड फिट’ जोडी आहे. दोघांचे स्वभाव एकमेकांपेक्षा खूपच भिन्न आहेत त्यामुळे त्यांच्या एकत्र मुलाखती पाहताना फार मजा येते पण लवकर झोपून लवकर उठायची दोघांचीही सवय सारखी आहे.
फिल्मी पार्ट्यांपासून नेहमी दूर राहणारे हे दोघे नेहमीच एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. इतक्यातच त्यांच्या लग्नाला २१ वर्षं पूर्ण झाली असून त्यांना दोन मुलं आहेत. अक्षय कुमार सध्या ‘बच्चन पांडे’ या त्यांच्या आगामी चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला लुक समोर आला आहे.
ट्विंकलच्या याच सवयीमुळे खरंतर तिच्या चाहत्यांना ती खूप आवडते पण बाकीचे मात्र तिला यावरून ट्रोल करतात. स्वतःच स्वतःची खिल्ली उडवण्याची खिलावूवृत्तीही तिच्याकडे आहे. तुम्हालाही ट्विंकलसारखी अशी सवय आहे का? असं असेल तर उगीच फार विचार न करता या सवयीची मजा घ्या.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.