' ”येत्या काळात जगावर…” बिल गेट्सच्या नव्या भविष्यवाणीने झोप उडवलीय – InMarathi

”येत्या काळात जगावर…” बिल गेट्सच्या नव्या भविष्यवाणीने झोप उडवलीय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बिल गेट्सचं नाव जसं आयटी क्षेत्रातील  क्रांतीसाठी घेतलं जातं तसंच आणखी एका बाबतीत या नावाची चर्चा असते. यापुर्वी बिल गेट्सने केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा समज आहे.

अर्थात या सर्वांना ग्रहताऱ्यांचा आधार नसला तरी विज्ञान आणि आजुबाजुची परिस्थिती यांचा अंदाज बांधत बिल गेट्सने काही भाकीतं केली होती. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातही त्यांनी केलेले भाकीत ठरले होते.

 

bill gates inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मात्र आता बिल गेट्स यांनी केलेल्या भाकीतामुळे सर्वांची झोप उडाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना हळूहळू बंधनं शिथील होत आहेत. पुन्हा एकदा रोजच्या व्यवहारांची गाडी मुळ पदावर येत असून घटती रुग्णसंख्याही दिलासादायक आहे.

येत्या काही महिन्यात बुस्टर डोस मिळाल्याने मास्क फ्री आयुष्य जगण्याची स्वप्नही पाहिली जात आहेत. मात्र बिल गेट्स यांनी केलेल्या भविष्यवाणीने मात्र या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 

covid vaccine inmarathi

 

काय म्हणतात बिल गेट्स?

बिल गेट्स यांनी जगावर आणखी एक संकट येण्याचे भाकीत केले आहे. अर्थात हे संकट महामारीच्या स्वरुपात असेल, मात्र कोरोनापेक्षा याचे रुप अधिक वेगळे असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे,

अर्थात या महामारीचा कोरोनाशी संबंध नसून येत्या काळात लसीकरणात वाढ झाल्याने कोरोनाचा धोका कमी होईल असे त्यांनी म्हटले आहे.

गंभीर आजारांचा धोका आणि तोदेखील खासकरुन वृद्ध, जाड आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी आता संसर्गाच्या माहितीमुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याचे बिल गेट्स म्हणाले आहेत.

 

bill gates ted talks inmarathi
ted talks

 

अर्थात ही महामारी नेमकी कोणत्या रुपात येईल?, त्याचा धोका कुणाला असेल? याबाबत त्यांनी अद्याप सुतोवाच केलेले नाही.

मात्र यासाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज व्हावे, तंत्रज्ञानाच्या मदतीनेे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोवाची असेही त्यांनी सुचवले आहे.

डिसेंबर महिन्यात बिल गेट्स यांनी ओमिक्रॉनची लाट येईल, असा इशारा दिला आहे. ते नेहमीच आपल्या ‘Gates Notes’ ब्लॉगमध्ये हवामानातील बदल आणि जागतिक आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा करत असतात.

त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात केलेली भविष्यवाणी खरी झाल्याने आता नव्या महामारीबाबतचे त्यांचे विधान खरे होणार का? याबाबत भिती व्यक्त केली जात आहे. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?