Site icon InMarathi

किन्नरची लाजवाब अदाकारी; या ६ कलाकारांनी कधी घाबरवलं तर कधी दिला सामाजिक संदेश

trans im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्या ही अभिनेत्याचा अथवा अभिनेत्रीची त्याच्या आयुष्यात एखादा असा रोल येतो ज्या रोलमुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. खास करून अभिनेते मंडळीनींना आयुष्यात एकदातरी स्त्री पात्र करावेच लागते. दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या आत्मचरितात हेच सांगितले आहे की विनोदी अभिनेत्याला आयुष्यात एकदातरी स्त्री पात्र त्याच्या वाट्याला येते.

 

 

मराठीत अशी बनवा बनवीमध्ये लक्ष्या मामा आणि सचिनजींनी स्तररी पात्र साकारून धमाल उडवून दिली होती तर हिंदीत खुद्द बचनजींन पासून राजकुमार राव, आयुष्यमान खुराणा यासारख्या अभिनेत्यांनी स्त्री पात्र रंगवली आहेत.

 

 

 

हिरो व्हिलन यासारखे रोलमध्ये अभिनेत्यांना फार मेहनत घ्यावी लागत नाही जितकी स्त्री पात्र किंवा किन्नरसारखी भूमिका करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. नुकताच गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हरहुन्नरी अभिनेता विजयराज किन्नरच्या भूमिकेत दिसून आला, मात्र विजयराजच्या आधी देखील काही दिग्गज अभिनेत्यांनी या प्रकारची भूमिका केल्या आहेत, कोण आहेत ते कलाकार चला तर मग जाणून घेऊयात …

अक्षय कुमार :

खिलाडी कुमार आपल्याला हसवतो, रडवतो, आपल्यात देशाभिमान जागृत करतो मात्र याच खिलाडी कुमारने काही दिवसांपूर्वी आलेल्या लक्ष्मी बॉम्ब सिनेमात किन्नरची भूमिका दिसला होता. सिनेमाच्या पोस्टरमध्येच तो या अवतारात दिसल्याने प्रेक्षकांना देखील त्याच्या या भूमिकेचे उत्सुकता होती.

 

 

परेश रावल :

कधीकाळचा व्हिलन, त्यानंतर विनोदी भूमिका,चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे परेश रावल, परेश रावल सारख्या अभिनेत्याने देखील १९९७ साली आलेल्या तम्मना सिनेमात अशा प्रकराची भूमिका केली होती. या सिनेमात किन्नरची भूमिका सकारात्मक पद्धतीने दाखवली गेली होती. सामाजिक विषयवार भाष्य करणाऱ्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने नावाजले होते…

 

 

आशुतोष राणा :

महाराष्ट्राचा जावई, उत्तम अभिनेता आणि कवी मनाचा कलाकार म्हणजे आशुतोष राणा. करियरच्या अगदी सुरवातीलाच त्यांनी अशा प्रकारची भूमिका साकारली होती. शबनम मौसी या सिनेमात त्यांनी किन्नरची भूमिका साकारली होती.

 

 

संघर्ष सिनेमातील लज्जा शंकर पांडे नावाची भूमिका चांगलीच गाजली, ही भूमिका नकारात्मक होती, मात्र यातील त्यांनी रंगवलेला व्हिलन आजही अनेकांचा लक्षात आहे. यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता.

सदाशिव अमरावपुरकर :

मराठीतले दिग्गज अभिनेते सदाशिव अमरावपुरकर ज्यांनी मराठी नाटकात दमदार भूमिका तर केल्यात मात्र हिंदीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत.  महेश भट यांच्या भट्टीत त्यांना किन्नरची भूमिका मिळाली होती. हॉलवुडच्या  टॅक्सी ड्रायव्हर बेतलेला सडक सिनेमात त्यांनी अशा प्रकराची भूमिका केली होती.

 

 

निर्मल पांड्ये :

अल्पायुषी ठरेलला अभिनेता म्हणजे निर्मल पांड्ये, आपल्या छोटयाश्या कारकिर्दीत त्यांनी अशा भूमिका केल्या ज्या अजरामर झाल्या आहेत. दायारा नावाच्या सिनेमात निर्मलने किन्नरची भूमिका बजावली होती, देशभरातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या भूमिकेची चर्चा झाली होती.

 

प्रशांत नारायण :

मर्डर पहिला गाजला तो त्यातील बोल्ड सीन्समुले मात्र मर्डर २ सिनेमा गाजला तो त्यातील प्रशांत नारायण या कलाकाराच्या भूमिकेमुळे, यात त्याने सायको किलरची भूमिका केली होती. धीरज पांडे असं त्या भूमिकेचे नाव होते.

 

 

आज बॉलीवूडमध्ये अभिनेते मंडळी भूमिकांसाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. कव्वा बिर्याणीमुळे चर्चेत आलेला विजयराज आज किन्नरच्या भूमिकेत दिसत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version