Site icon InMarathi

आधी भ्रष्टाचाराचा आरोप आता वय लपवल्याप्रकरणी समीर वानखेडे वादात अडकले आहेत

sameer im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, लहान मुलांच्या आवडीचं हे गाणं त्यांना कधीही ऐकवले तरी अगदी आवडीने बघतात. लहान मुलांप्रमाणे मोठ्या मंडळींना देखील घरानंतर स्वप्न दिसते बंगल्याचं, गावाकडे जमीन घेऊन त्यावर टुमदार बंगला बांधावा अशी सर्वसामान्य माणसाची कल्पना असते.

सध्याचं राजकारण देखील याच बंगल्यांच्या भोवती फिरताना दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपचे किरीट सोमय्या हे सरकारमधील काही नेत्यांच्या मागे हात धुवून मागे लागले आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे देखील ते लागलेले आहेत.

 

 

कोर्लईमधल्या ठाकरेंच्या मालकीचे १९ बंगले आणि त्यावरून सुरु असलेले  प्रत्यारोपाचे राजकरण आपण बघितलेच, याला शिवसेनेने आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. हा वाद एकीकडे सुरु आहेच तर दुसरीकडे आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, नेमका काय आहे वाद चला तर मग जाणून घेऊयात….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नेमका काय आहे वाद?

बारचा परवाना मिळवण्यासाठी वय आणि कागदपत्रे यांची खोटी केल्याप्रमाणे एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात एफआयर दाखल करण्यात आली आहे. खोटे बोलणे, फसवणूक, शपथेवर खोटी माहिती देणे आणि इतर कलमाबाबत कोपरी पोलीस ठाण्यात एफएआयर दाखल करण्यात आली आहे.

 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला होता की नवी मुंबईमधील सद्गुरू नामक हॉटेल आणि बारचा परवाना मिळवण्यासाठी समीर यांनी आपले वय खोटे सांगून हा परवाना मिळवला होता.

स्थानिक शुल्क विभागाने यांची दखल घेऊन याचा पाठपुरावा केला असता असे समोर आले की बार प्रकरण हे १९९७ सालातले आहे. २७ ऑक्टोबर १९७७ साली समीर वानखेडे यांना बारचा परवाना मिळाला होता, तेव्हा त्यांचे वय १७ होते आणि नियमानुसार लायसन्स साठी वय वर्ष कमीत कमी २१ पूर्ण असावे लागते.

 

 

सूत्रांच्या माहितीनुसार या वर्षाच्या सुरवातीलाच समीर वानखेडे यांच्या नावे असलेले बार लायसन्स हे ठाणे जिह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यानी रद्द केले असून नवी मुंबईमध्ये असलेला बार त्यांचे कुटुंबीय बघत आहेत.

 

 

आर्यन खान प्रकरण एकीकडे सुरु होते तर दुसरीकडे समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका सुरूच होती. नवाब मालिका यांनी तर त्यांच्या जन्मदाखल्यापासून ते लग्नापर्यंत त्यांची संपूर्ण वयक्तिक माहिती मीडिया समोर आणली. आर्यन खान प्रकरणात देखील त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी लाच घेतली आहे असा आरोप किरण गोसावींच्या बॉडीगार्डने केला होता.

 

 

आता या नवीन प्रकरणात समीर वानखेडे यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली असून, आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे की या घटनेवर कोर्ट कोणती कारवाई करणार आहे.  सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील कलगीतुरा आता दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येतोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version