Site icon InMarathi

ह्या १० देशांत गाडी चालवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या लायसन्सची गरज नाही!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

बाहेरच्या देशांत गाडी चालवायची म्हणजे काही वेगळं परमीट वा कागदपत्रे लागतात असा आपला समज आहे, काही अंशी तो खराही आहे आहे, पण जगात असे काही देश आहेत जेथे भारतीय आपल्या इंडियन्स ड्राईव्हिंग लायसन्स वर काही मुदतीपर्यंत (६ महिने-१ वर्षे) गाडी चालवू शकतात. अर्थात तुम्ही थेट त्या देशात उतरल्यावर लगेच गाडी चालवू शकत नाही, तुम्हाला तेथील रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या कार्यालयाला भेट देऊन काही प्राथमिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतरच तुम्ही हातात स्टेअरिंग पकडू शकता. पण येथे तुम्हाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची बिलकुल गरज भासत नाही. चला तर जाणून घेऊया त्या १० देशांबद्दल!

हे देखील वाचा : विदेशात गाडी चालवण्यासाठी International Driver’s License कसं मिळवाल?

दक्षिण आफ्रिका

skyscrapercity.com

दक्षिण आफ्रिकेत तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सवर एक वर्षापर्यंत वाहन चालवू शकतात. मात्र, लायसन्स हे इंग्रजीत असायला हवे आणि मुख्य म्हणजे त्यावर फोटो व स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

 

 

जर्मनी

alt.ck.ua

जर्मनीत तुम्ही सहा महिने वाहन चालवू शकतात. येथेही इंग्रजी भाषेतील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

 

स्वित्झर्लंड

pinterest.com

स्वित्झर्लंड सारख्या सुंदर देशात गाडी चालवायला कोणाला आवडणार नाही, या देशातही तुम्ही इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवू शकता. येथे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर एक वर्ष गाडी चालवता येते.

 

न्यूझीलँड

traveldailynews.asia

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर न्यूझीलंडमध्ये तुम्ही एक वर्षापर्यंत ड्राईव्हिंगचा आनंद लुटू शकता. मात्र, त्यासाठी तुमचे वय २१ किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

 

यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका

panoramio.com

तुमच्याकडील भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीमध्ये असेल तर तुम्ही अमेरिकेत एक वर्ष गाडी चालवू शकता. मुदत संपल्यानंतर मात्र, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग बनवून घ्यावे लागते. याशिवाय I-94 फॉर्म आपल्याजवळ ठेवावा लागत असतो. त्यावर अमे‍रिकेत प्रवेश करण्याची तारीख नमुद केलेली असणे गरजेचे आहे.

 

इंग्लंड

itv.com

इंग्लंडमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्हाला एक वर्ष गाडी चालवण्याची मुभा दिली जाते. मात्र, ही सवलत केवळ छोटी वाहने व मोटरसायकलसाठीच आहे.

 

फ्रान्स

forum.nationstates.net

फ्रान्समध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसनवर एक वर्ष वाहन चालवता येते. परंतु त्यानंतर भारतीय अँबेसीतून फ्रेंचमध्ये ते लायसन्स ट्रान्सलेट करून घ्यावे लागते.

 

नार्वे

youtube.com

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वर तुम्ही नार्वेमध्ये तीन महिने वाहन चालवू शकता. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी मात्र, नार्वेचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवावे लागेल.

 

फिनलँड

yle.fi

फिनलंडच्या रस्त्यावर भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्हाला सहा महिने वाहन चालवण्याची मुभा मिळते.

 

ऑस्‍ट्रेलिया

ozroads.com.au

न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलंड, दक्षिण ऑस्ट्रेलिया व ऑस्‍ट्रेलिया कॅपिटल टेरिटरीमध्ये भारतीय ड्रायविंग लाईसन्सवर तुम्ही आरामात गाडी चालवू शकतात. पण केवळ तीन महिनेच, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्हाला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स बनवावे लागते.

कधी या देशांना भेटी दिलीत तर येथील रस्त्यांवर ड्राईव्हिंगचा आनंद लुटण्याची अमुल्य संधी गमावू नका!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version