आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय सैन्यात भरती झालेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. चीन, पाकिस्तान यांच्या सतत कुरापती सुरू असलेल्या आपल्या सीमेवर काम करणारे आपले सैनिक हे त्यांच्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास समर्थ आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.
१३० कोटी भारतीयांच्या आपल्या सैनिकांकडून ‘सुपरमॅन’ सारख्या अपेक्षा आहेत हे आपण रोजच बघतो. कोणतंही आंतरराष्ट्रीय किंवा नैसर्गिक संकट येवो, सैनिकांनी नेहमीच लोकांची मदत करण्यासाठी तत्पर असावं अशी आपली अपेक्षा असते.
आपल्या सिनेमांमध्ये सुद्धा सैनिकांचा खूप आदर्शवाद दाखवण्यात येतो. ‘सैनिकतील माणूस’ हा फार कमी सिनेमांमध्ये दाखवण्यात आला आहे. कारण, प्रेक्षकांना तो बघण्यात इंटरेस्ट नाहीये किंवा आपल्या सरकार, सुरक्षा मंत्रालय किंवा सेन्सॉर बोर्डला सैनिक म्हणजे कायम ‘आदर्श व्यक्ती’ असाच पडद्यावर दिसण्याची रास्त अपेक्षा आहे.
देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या आयुष्यावर सिनेमा जरी काढायचा असेल तरीही संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते ही बाब फार कमी जणांना माहीत असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
संरक्षण खात्याने नुकत्याच एका सिनेमाला परवानगी नाकारली आहे. त्याचं कारण हे आहे की, राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिगदर्शक ओनिर याने मेजर जे सुरेश या इंडियन आर्मी ऑफिसरच्या आयुष्यावर सिनेमा तयार करण्याची परवानगी संरक्षण मंत्रालयाकडे मागितली होती. पण, मेजर जे सुरेश यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत की, ही परवानगी संरक्षण खात्याने स्पष्टपणे फेटाळली आहे.
ओनिरच्या प्रस्तावित सिनेमात मेजर जे सुरेश यांचे काश्मीर मधील एका १५ वर्षीय मुलासोबत अनैतिक शारीरिक संबंध होते हे दाखवण्यात येणार होते.
या संवेदनशील विषयाला नकार देतांना सरकारच्या वतीने कोणी प्रतिक्रिया दिली? सोशल मीडियाचा वापर करून ओनिर सध्या सरकारवर काय टीका करतोय? हे जाणून घेऊयात.
ओनिर कोण आहे?
२०१० मध्ये ओनिर ने ‘आय ऍम’ नावाच्या एका सिनेमाचं दिगदर्शन केलं होतं. ४ कथा असलेल्या या सिनेमात कुमारी माता, समलिंगी संबंध या विषयांवर भाष्य केलं होतं.
आपला समाज हा वेबसिरीज, साहित्य संमेलन सारख्या ठिकाणी खूप पुढारला आहे. पण, पुरुष अथवा स्त्री यांचे समलिंगी संबंध हा असा विषय आहे ज्याकडे आजही संकोचानेच बघितलं जातं आणि बघितलं जाईल. याचं कारण आपली ‘कुटुंब पद्धती’ हे असावं.
परदेशात या गोष्टींना तितकं महत्व दिलं जात नाही, ज्यामुळे तिथे अशा विषयांवर मुक्तपणे चर्चा होते, सिनेमांना लोकप्रियता मिळते. भारतीय प्रेक्षकांची आपली एक टेस्ट आहे. पण, ओनिर, करण जोहर सारख्या दिगदर्शकांनी मात्र भारताचं हॉलीवूड करायचा जणू चंगच बांधला आहे.
‘आय ऍम’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या ओनिरला त्या सिनेमाचा पुढचा भागसुद्धा समलिंगी संबंध याच विषयावर सुचला आहे याचं तसं आश्चर्य कमी आहे. पण, भारतीय सैन्याबद्दल आदर असलेल्या लोकांना त्याचा हे ऐकून नक्की राग येईल की, समलिंगी संबंधांचं समर्थन हे त्याने यावेळी एका इंडियन आर्मी ऑफिसरच्या माध्यमातून केलं आहे.
“मग काय झालं?” असा विचार करणारा सुद्धा एक वर्ग असणार हे मान्य. पण, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत? उद्या सौनिकांच्या इतर खासगी विषयांबद्दल चर्चा केली जाईल? त्यांना पण ट्रोल केलं जाईल? याचा कोणीतरी विचार करावा की नाही हाच सध्या प्रश्न आहे.
परवानगी का नाकारण्यात आली?
भारतीय संरक्षण खात्याने ओनिरच्या विनंतीला पत्र देतांना वरूण गांधी यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की, “ओनिर यांच्या सिनेमाला परवानगी नाकारण्याचं कारण हे आहे की, त्यामध्ये चित्रित होणाऱ्या मेजर जे सुरेश यांचं पात्र काश्मीर मधील एका मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतांना दाखवण्यात येणार आहे. हे दाखवून दिगदर्शकाला काय साध्य करायचं आहे? हा एक प्रश्न आहे. असा विषय पडद्यावर आल्यावर लोकांच्या मनात सैनिक आणि संरक्षण खातं यांच्याबद्दल खूप प्रश्न निर्माण होतील.”
कायदे तज्ज्ञांनी यावर ट्विट करून संरक्षण खात्याला हा प्रश्न देखील विचारला होता की, “ही परवानगी नाकारणं म्हणजे आर्टिकल १४ या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याचं उल्लंघन नाहीये का?”
संरक्षण मंत्रालयाने या प्रश्नावर सुद्धा उत्तर दिलं आहे आणि सांगितलं आहे की, “नाही. आम्ही हा नकार देऊन आर्टिकल १४ चा कोणत्याही प्रकारे अनादर केला नाहीये. देशाच्या संरक्षण खात्याची लोकांच्या मनातील प्रतिमा, आर्मी मधील शिस्त या गोष्टींवर चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
–
- गे नवरदेव, लेस्बियन नवराई : लवेंडर मॅरेज ही संकल्पना आहे तरी काय?
- घरच्यांनी शॉक देऊन त्याला ‘पुरुष’ असल्याचं सिद्ध करायला भाग पाडलं पण…
–
केंद्रीय गृह मंत्रालयानेसुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना इंडियन आर्मीच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये गृह मंत्रालयाने असं लिहिलं आहे की,
“आर्मीला १ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या काळात संरक्षण खात्यासाठी योगदान देणाऱ्या १८ व्यक्तींवर सिनेमा करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यापैकी केवळ ही १ मागणी संरक्षण मंत्रालयाने नाकारली आहे. इतर सर्व प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत.”
ओनिर या आजच्या काळातील विचारांनी पुढारलेल्या दिगदर्शकाने सर्व सरकारी खात्यांना टॅग करत अशी प्रतिक्रिया दिली आहे की, “याचा अर्थ असा आहे की, एक सैनिक हा एका मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवू शकतो. पण एका ‘गे’ व्यक्तीला त्याच्या भावना व्यक्त करण्याचा आपल्या देशात अधिकार नाहीये.”
ओनिरने उल्लेख केलेला सिनेमा हा २००५ मध्ये रिलीज झालेला ‘यहा’ हा आहे, त्याचं दिगदर्शन सुजित सरकारने केलं होतं. या सिनेमात आर्मी ऑफिसर जिमी शेरगिल आणि काश्मीरची मुलगी मिनीषा लांबा यांचे अनैतिक संबंध दाखवण्यात आले होते.
ओनिरने या विषयावर आपलं दुसरं ट्विट लिहून त्यात आपला राग अशा प्रकारे व्यक्त केला आहे की, “भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली आहेत. सुप्रीम कोर्टाने स्वमर्जीने होणाऱ्या समलिंगी संबंधांना गुन्हा नसल्याचं मान्य केलं आहे. पण, आजही आपण समान नाही आहोत. जगातील ५६ देशात ‘LGBTQ’ ला मान्यता मिळाली आहे. पण, भारतात हे अजूनही अवैध मानलं जातं हे फार मोठं आश्चर्य आहे.”
जे सुरेश यांचं काय म्हणणं आहे?
ओनिरला जे सुरेश यांच्या ‘गे’ असण्याची माहिती ही त्यांनीच लिहिलेल्या एका ब्लॉग मधून मिळाली होती.
२०२० मध्ये लिहिलेल्या ब्लॉग मध्ये जे सुरेश यांनी आपण आर्मी मध्ये असतांना आणि व्यक्तिगत आयुष्यात ‘गे’ आहोत हे लिहिलं आहे. इतकंच नाही तर, समलिंगी संबंधांबद्दल भारतीय सैन्यात असलेल्या तीव्र विरोधाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘गे’ व्यक्तींना मिल्ट्री मध्ये सतत अपमानित केलं जातं. हे कुठल्याही प्रकारे सभ्यतेचं लक्षण नाहीये.
ओनिर, जे सुरेश आणि संरक्षण मंत्रालयातील या वादावर लोकांचं एकमत असणं अशक्य आहे. समाजात बदल घडवण्याची एका वर्गाला इतकी घाई झाली आहे की, इतर लोकांवर ते बदल लादले जात आहेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या जे सुरेश यांनी आपलं व्यक्तिगत आयुष्याचे पैलू उलगडतांना सैन्यात शिकवतात तशी गोपनीयता राखली असती तर हा वाद टाळला गेला असता.
ओनिर कदाचित हा विषय घेऊन आता नेटफलिक्सकडे जाईल आणि सिनेमा तयार करेल आणि आधीच नैतिक मूल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या ओटीटीवर भारतीय सैन्याचे सुद्धा धिंडवडे निघतील. येत्या काळात असे प्रयोग होऊ चवीने बघायचे की त्याकडे दुर्लक्ष करायचं? हे मायबाप प्रेक्षकच ठरवेल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.