' ऊन, पाऊस, वारा असं वातावरण असतानाही रेल्वे रुळांना गंज का चढत नाही? – InMarathi

ऊन, पाऊस, वारा असं वातावरण असतानाही रेल्वे रुळांना गंज का चढत नाही?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. कधी मामाच्या गावाला जायला, कधी आजोळी जायला किंवा कुठेही फिरायला जाताना सुद्धा, परंतु तरीही अजूनदेखील रेल्वेशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत ज्या खरंतर माहीत पाहिजेत.

रेल्वेने प्रवास करताना प्रत्येक ट्रॅककडे पाहून तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल. रेल्वे ट्रॅकला गंज का पडत नाही, साधारणपणे आपण पाहतो, की ज्या लोखंडी वस्तूंना रंग दिला जात नाही त्या अनेकदा गंजू लागतात, पण रेल्वे रुळावर कोणत्याही प्रकारचा पेंट केला जात नाही, उलट रखरखीत ऊन, कडकडीत थंडी, वादळी वारा किंवा संततधार पाऊस यापैकी कशानेही रेल्वेच्या रुळांना गंज चढत नाही. आजच्या लेखात आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बऱ्याच लोकांना वाटतं, की रुळावर सतत रेल्वे धावल्याने रूळ गरम राहतात आणि घर्षणामुळे रुळावर गंज चढत नाही, पण हेदेखील योग्य  कारण नाही. जाणून घेऊया, का चढत नाही रेल्वेच्या रुळावर गंज? रेल्वेच्या रुळावर गंज का चढत नाही, हे जाणून घेण्याआधी आपण हे जाणून घेऊया, की लोहावर गंज कशाने चढतो.

 

iron rust im

 

तर त्याचे कारण असे आहे,  की लोहापासून बनवलेल्या वस्तू ओलसर हवा आणि ऑक्सिजनवर रासायनिक प्रतिक्रिया (Chemical Reaction) देतात, जे की लोह झिजण्याचे मुख्य कारण आहे. यामुळे लोखंडावर तपकिरी रंगाचे आवरण तयार होते, ज्याला आयर्न ऑक्साईड म्हणतात. ते लोखंडावर एका थराच्या रुपात घट्ट होते. याला आपण लोखंडाचा गंज किंवा संक्षारण म्हणतो.

हे संबंधित क्षेत्रातील वातावरणात असणाऱ्या आर्द्रतेमुळे घडते. त्यामुळे लोहातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सल्फर आणि आम्ल इत्यादींच्या समीकरणाने हा थर तयार होतो. हा गंज हळूहळू लोह कमकुवत करतो.

रेल्वेच्या रुळावर गंज का लागत नाही?

 

railway track im

 

रेल्वेने रेल्वेचे रूळ अतिशय काळजीपूर्वक तयार केलेले असतात, जेणेकरून ट्रॅकवर गंज येत नाही. रुळावरील गंजामुळे रूळ कमकुवत होतात आणि जेव्हा ट्रेन त्यावरून जाते तेव्हा त्या दाबाने रुळाला तडे जाऊ लागतात.

भारतीय रेल्वे देशाच्या प्रत्येक भागात आहे आणि प्रत्येक ठिकाणचे हवामान आणि वातावरण देखील वेगळे आहे. रेल्वे रुळ गंजू लागल्यास वेळोवेळी तो बदलण्यासाठी रेल्वेला मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे स्टील आणि मेगालोय यांचे मिश्रण करून रेल्वे ट्रॅक बनवले जातात.

स्टील आणि मेगालोय यांच्या मिश्रणाला मॅंगनीज स्टील म्हणतात. त्यात बारा टक्के मॅंगनीज आणि एक टक्के कार्बन आहे. यामुळेच रेल्वे रुळांवर ऑक्सिडेशन किंवा गंज येण्याचे प्रमाण खूप कमी आहे आणि अनेक वर्षे रेल्वे रुळांना गंज चढत नाही.

दुसरीकडे, ट्रेनचा ट्रॅक सामान्य लोखंडाचा असेल, तर हवा आणि ओलाव्यामुळे तो गंजतो. गंजामुळे रेल्वे ट्रॅक वारंवार बदलावा लागणार असून खर्चही बऱ्यापैकी आहे. हा खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी स्टील, कार्बन आणि मॅंगनीजचा वापर रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी केला जातो.

आपल्या माहितीसाठी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, की ब्रिटीशांनी भारतात रेल्वेची सुरुवात केली होती. म्हणूनच त्याकाळी रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी अँटी-कॉरोशन मेटलचा वापर केला जात असे.

हेच कारण आहे, की आजही त्या काळातील रेल्वे रुळ मजबूत आणि गंजरोधक आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?