रोजच्या जेवणात दर माणशी किती तेल खाणं योग्य? प्रमाण जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय खाद्य संस्कृती मध्ये तेल हा अनन्य साधारण महत्व असलेला घटक आहे. तेलामुळे तयार करत असलेल्या पदार्थाची चव तर वाढतेच पण त्यासोबतच त्याचा रंग , पोत सुधारतो. भारताच्या विविध भागा मध्ये खाद्य पदार्थांमध्ये तेलाचा समावेश करून च वे वेगळ्या पाक कृती तयार केल्या जातात.
पराठा, समोसा, कचोरी, अशा चमचमीत पदार्थांमध्ये तेलाचा वापर होतो इतकच काय तर कट वडा, मिसळ पाव, वडापाव, कोल्हापूर चा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा यांना देखील तेला शिवाय मजा येत नाही. निरनिराळ्या शहारापरत्वे तेल वापराचे प्रकार बदलत जातात.
मोहरीचे तेल शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑईल, तिळ तेल, पाम तेल सोयाबीन तेल, खोबरेल तेल अशी बरीचशी तेलं स्वयंपाकात वापरली जातात.शरीरासाठी महत्त्वपूर्ण असणारी प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिज मूलद्रव्ये आपल्याला तेलापासून मिळतात.काही काही प्रांतांमध्ये तर तेला विना पदार्थ म्हणजे जल बिन मछली असे संबोधले जाते.एकूणच काय तर तेल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
अतिरिक्त तेल सेवनाचे दुष्परिणाम :-
तेल हा खाद्य पदार्था मधला महत्त्वपूर्ण घटक असला तरी कुठल्याही गोष्टींचे अतिरिक्त प्रमाण हे वाईट! तेलामुळे शरीरातील फॅटचे प्रमाण वाढते, रक्तातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्तदाब, रक्त वाहिन्या गोठणे, हृदयविकारासारख्या पाहुण्यांना आपले शरीर आमंत्रण देऊ लागते. लठ्ठपणा, मधुमेह, इंसुलिन, फॅटी लिवर यांसारख्या अनेक शारीरिक व्याधी तेलाच्या अतिरिक्त वापराने जडण्याची शक्यता असते.
व्यक्तीपरत्वे किती तेल आवश्यक :-
दिवसाला सरासरी किती प्रमाणात तेलाचा वापर केला तर तो अतिरेक होणार नाही आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही असा प्रश्न खाद्यपदार्थ व आरोग्य यांच्या बाबतीत जागरूक असलेल्या नागरिकांना नेहमी पडतो .आहार तज्ञ व्यक्तींच्या मते प्रौढ व्यक्तींनी उत्तम आरोग्यासाठी दिवसभरात ४ चमचे म्हणजे साधारण २० ग्रॅम तेलाचे सेवन केले पाहिजे.
हे प्रमाण स्त्री व पुरुष दोघांसाठी ही थोड्या फार प्रमाणात सारखेच असते. ज्या व्यक्तींना लठ्ठ पन्ना टाळून आपले वजन आटोक्यात ठेवायचे आहे किंवा कमी करावयाचे आहे अशा लोकांनी १ चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी तेलाचे सेवन केले पाहिजे.
लहान मुलांसाठी हेच प्रमाण थोडे वाढले तरी चालते. भिन्न भिन्न व्यक्तीसाठी या प्रमाणामध्ये बदल केल्या जाऊ शकतो.परंतु यामध्ये सातत्य ठेवल्यास अपेक्षित परिणाम दिसू लागतात.
कुठले तेल तळण्यासाठी उत्तम:-
करडई, शेंगदाणा तेल हे तळण्याचे प्रकार करण्यासाठी उत्तम तेल मानले जातात. पदार्थ तळून झाल्यानंतर त्यातील अतिरिक्त तेल शोषले जाईल याची मात्र व्यवस्थित रित्या काळजी घेतली गेली पाहिजे.
कुठले तेल आरोग्यासाठी उत्तम :-
आहारतद्य रमा पवार यांच्या मते घाण्याचे तेल हे आरोग्यासाठी उत्तम प्रकार चे तेल मानल्या जाते. त्यातून नैसर्गिक पोषणमूल्य योग्य प्रमाणात मिळतात. कोलेस्टेरॉल, रक्तदाब नियंत्रणात राहते. शेंगदाणा, मोहरी, खोबरे आणि सूर्यफूल यांचं घाण्याचे तेल आरोग्यासाठी उत्तम असतं.
जसे तेलाचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी हानीकारक आहे, तसेच तेल न खाणे देखील आरोग्यास अपायकारक आहे..
शरीरात वंगणासाठी तेल उपयुक्त असतं. प्रत्येक व्यक्तीने योग्य प्रमाणामध्ये तेलाचे सेवन केल्यास आपले शरीर निरोगी व आरोग्य उत्तम राहील. आज बाजरात तेलांच्या अनेक कंपन्या आहेत त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार तेलाची निवड करा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.