Site icon InMarathi

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नात्यातल्या खर्‍याखुर्‍या “गेहराईया”…

srk pr im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेमाची परिभाषा काळानुरूप बदलतेय. तरीसुद्धा आजही आपल्याला ‘सुखद शेवट’ असलेले फील गूड रोमॅंटिक हिंदी सिनेमे पाहायला आवडतात. गेल्या काही वर्षांपासून मात्र बॉलिवूडमध्ये विविध चित्रपटांमधून ‘ग्रे शेड’ असलेली पात्रं दाखवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. ‘विवाहबाह्य संबंध’ हा तर नेहमीचाच फॉर्मुला झालाय. काही दिवसांपूर्वीच ‘गेहराईया’ चित्रपट प्रदर्शित झाला.

 

 

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पात्रांच्या दृष्टिकोनातून कथा सांगण्याचा प्रयत्न यात दिग्दर्शकाने केलाय. हा प्रयत्न यशस्वी झाला की फसला हा मुद्दा बाजूला ठेवू. सामान्यांच्या आयुष्याचं प्रतिनिधित्त्व म्हणून मोठ्या पडद्यावर या गोष्टी दाखवल्या जातात. पण आपल्या असं लक्षात येतं की विवाह्यबाह्य संबंधाची ही वस्तुस्थिती केवळ सर्वसामान्यांपुरतीच मर्यादित नसून बॉलिवूडमधली काही जोडपीही याला अपवाद नाहीत.

 

 

सेलिब्रिटींच्या लग्नांचा जितका बोलबाला होतो त्याहून बऱ्याच अधिक चर्चा रंगतात त्या त्यांच्या विवाहबाह्य संबंधांच्या. ज्यांच्याशी त्यांचं लग्न झालंय यापेक्षा ज्यांच्याशी त्यांचं नाव जोडलं गेलंय त्या जोड्याच अधिक लोकप्रिय होतात. बॉलिवूडमधल्या अशाच काही सेलिब्रिटींच्या नात्यातली खरीखुरी ‘गेहराईया’ जाणून घेऊया.

१. अर्जून कपूर – मलायका अरोरा :

अर्जून कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअरविषयी आपल्या सगळ्यांच माहितीये. पण एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वी अर्जून सलमानची बहीण अर्पिता हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता. तर मलायकाचं अरबाज खानशी लग्न झालेलं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतरही ते मुलाचे आईवडील म्हणून व्यवस्थित जबाबदारी निभावत आहेत.

 

 

२. आदित्य चोप्रा – राणी मुखर्जी :

आदित्य चोप्रा यांचं राणी मुखर्जीशी लग्न होण्यापूर्वी २००१ साली त्यांची कॉलेजमधली प्रेयसी पायल खन्ना हिच्याशी लग्न झालं होतं. त्यांचा संसार ८ वर्षं टिकला. पण असं म्हटलं जातं की राणी मुखर्जीमुळे त्यांचा घटस्फोट झाला. आदित्य यांच्या घरच्यांनी त्यानंतर राणीला सून म्हणून स्वीकारलं आणि २०१४ साली त्या दोघांचं लग्न झालं. राणीचं नाव त्यापूर्वी अभिषेक बच्चनशी जोडलं गेलं होतं जो आता ऐश्वर्या रायचा नवरा आहे.

 

 

३. शत्रुघन सिन्हा – रीना रॉय :

शत्रुघन सिन्हा यांचं पूनम सिन्हा यांच्याशी लग्न झालेलं होतं. तरीदेखील शत्रुघन सिन्हांचं रीना रॉय यांच्याशी अफेअर असल्याच्या चर्चांना एकेकाळी उधाण आलं होतं. रीना यांना शत्रुघन सिन्हांसोबत कमिटमेंट हवी होती. मात्र शत्रुघन सिन्हा यांनी बायकोला सोडायला नकार दिल्यामुळे रीना रॉय निराश झाल्या. असं असलं तरी सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय यांच्या चेहऱ्यातलं साधर्म्य आपल्याला बुचकळ्यात पाडतं.

 

 

४. ह्रितिक रोशन – बार्बरा मोरी :

‘काईट्स’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ह्रितिक रोशन – बार्बरा मोरी यांच्यात जवळीक वाढून त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ह्रितिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान रोशन आणि त्याच्यात यामुळे दुरावा निर्माण होऊन ती घर सोडून आपल्या पालकांसोबत राहायला जाण्याचं ठरवत असल्याच्या बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या संसाराची घडी व्यवस्थित झाली होती, मात्र कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला.

 

 

ह्रितिकचं नाव कंगनासोबतही जोडलं गेलं होतं. हे प्रकरण चांगलंच चिघळलं होतं. सध्या ह्रितिक ‘सबा आझाद’ या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना पेव फुटलंय.

५. आदित्य पांचोली – कंगना राणावत :

हे अफेअरही कुणापासून लपलेलं नाही. खुद्द आदित्य पांचोलींची पत्नी झरीना वहाब यांनीही त्या दोघांचं खुलं नातं मान्य केलं होतं. त्यांचं अफेअर चांगलंच चर्चेत असताना एक दिवस सार्वजनिक ठिकाणी भांडण होऊन त्यांचं ब्रेकअप झालं. आदित्य पांचोलीने आपल्यावर हल्ला केल्याचं मान्य करत हे नातं वाईट होतं असं कंगनाने यापूर्वी म्हटलं आहे.

 

 

६. अमिताभ बच्चन – रेखा :

बॉलिवूडची ही एव्हरग्रीन जोडी. त्यांचं ‘प्रेम प्रकरण’ हा कायमच सगळ्यांसाठी गूढ विषय राहिला आहे. असं म्हटलं जातं की त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असताना आपण आपल्या नवऱ्याला कधीही सोडणार नाही असा निर्णय जया बच्चन यांनी घेतला आणि अमिताभ-रेखाच्या नात्याला पूर्णविराम मिळाला. मात्र रेखा यांनी आपलं अमिताभ बच्चन यांच्यावरलं प्रेम व्यक्त केलं असलं तरी त्या दोघांमध्ये कधीच अफेअर नव्हतं असं मुलाखतीत पूर्वी म्हटलं आहे. बच्चनजींनी या विषयावर कायम मौन पाळलंय. पण आजही रेखाजी आसपास असताना बिग बींना अवघडल्यासारखं होतं.

 

 

७. शाहरुख खान – प्रियांका चोप्रा :

प्रियांका चोप्राशी अफेअर असल्याच्या बातम्या ऐकू येईपर्यंत आपल्या मनात शाहरुख खानची प्रतिमा ही कायमच पत्नीशी एकनिष्ठ असलेल्या नवऱ्याची होती. आजही त्यांच्यात कधीकाळी अफेअर असेल या शक्यतेवर आपल्याला विश्वास ठेवावासा वाटत नाही. पण त्यांची एकमेकांसोबतची अनेक संभाषणं पाहिली की ही शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. यात तथ्य किती हे अखेरीस शाहरुख, गौरी आणि प्रियांकालाच माहीत.

 

काही मोजके अपवाद वगळता ज्यांच्यासोबत अफेअर केलं त्यांच्यासोबत या कलाकारांनी नंतर लग्न केलं नाही. त्यामुळे हे विवाहबाह्य संबंध केवळ आकर्षणातूनच निर्माण झाले होते की असे संबंध असलेल्यांच्यात खरंच काही ‘गहिरं नातं’ तयार झालं होतं हे त्या कलाकारांनाच ठाऊक!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version