Site icon InMarathi

चक्क हत्तीचं दूध पिते ही चिमुरडी, मनुष्य- प्राण्याचं अनोखं नातं दाखवणारी गोष्ट

elephant milk drinking IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात, की प्राणी तुमच्यावर जितकं निरपेक्ष प्रेम करतात तितकं माणसंही माणसांवर करत नाहीत. कुत्रे, मांजरं, ससे पाळलेल्या सगळ्यांचंच या प्राण्यांसोबत अगदी जवळचं नातं तयार झालेलं असतं.

पाळीव प्राणी माणसांना लळा लावतात. त्यांना बोलता येत नसलं तरी कधी आपले लाड करून, आपल्या जवळ बसून-झोपून, आपल्या हावभावांतून ते आपल्यावर जीव लावतात. शहाण्या मुलासारखं घरातल्यांचं ऐकणारे प्राणी पाहणं मजेशीर असतं.

 

 

 

हे झालं मोठ्या माणसांच्या बाबतीत, पण जेव्हा एखादं लहान मूल प्राण्यांना जीव लावतं तेव्हा ते निरागस मुलही तितक्याच उत्कटनेते त्या प्राण्याला प्रेम देतं.

आसाममधली एक ३ वर्षांची लहानगी तिच्या घराच्या अंगणात एका ५४ वर्षांच्या हत्तीणीसोबत फुटबॉल खेळतेय आणि तिचं दूध पितेय असा एक व्हिडियो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ती हत्तीणसुद्धा आनंदाने त्या मुलीसमोर आपली सोंड हलवत, सोंडेने तिला स्पर्श करत त्या मुलीशी संवाद साधू पाहते आहे. या लहानग्या मुलीतलं आणि हत्तीणीतलं प्रेम या छोट्याश्या व्हिडियोतून पाहणं सुखद आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आसाममधल्या गोलाघाट जिल्ह्यातल्या या लहानगीचं नाव हर्षिता बोरा असं आहे. हर्षिता या हत्तीणीला ‘बिनू’ असं म्हणते. गेला बराच काळ ‘बिनू’ बोरा कुटुंबियांसमवेत आहे.

हर्षिताची आजी तिचं संगोपन करते. कॅमेऱ्याने टिपलेल्या आणखी काही प्रसंगांमध्ये हर्षिता त्या हत्तीणीला मिठी मारताना आणि तिच्या पाप्या घेताना दिसतेय. ती हत्तीणही हर्षिताशी प्रेमाने वागताना दिसतेय.

व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये हर्षिता बिनूला आपल्याला दूध पाजण्यास सांगतेय आणि ती हत्तीणही कुठलेही आढेवेढे न घेता हर्षिताला दूध पिऊ देतेय.

 

 

हर्षिताच्या मोठ्या बहिणीने आणि तिच्या बाकी कुटुंबीयांनी हे पाहिलं आणि असं करण्यासाठी हर्षिताला प्रोत्साहन दिलं. हर्षिताचा सबंध दिवस बिनू हत्तीणीला भरवण्यात आणि तिचे लाड करण्यात जातो. बिनूचंही हर्षितावर इतकं उत्कट प्रेम आहे की ती केवळ हर्षिता तिला ज्या ज्या सूचना करते त्याच ऐकते.

एनडीटिव्हीने हर्षिताला हत्तीणीविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली, “ही हत्तीण माझ्यासोबत फुटबॉल खेळते. तिचं नाव बिनू आहे. तिला केळं खायला आवडतं.”

बिनू हत्तीण बोरा कुटुंबीयांकडे कशी आली याची आठवण ‘इंडिया टुडे’ ला सांगताना हर्षिताचे वडील लोहित बोरा म्हणाले, “माझ्या वडिलांना नागालँडमध्ये बिनू मिळाली. ती तिथे काम करायची. मात्र नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी आणली तेव्हा खोनोमाहून आम्ही तिला परत घेऊन आलो.

बिनूने एका मादी वासराला जन्म दिला. एकदा त्या दोघींनाही कोणीतरी चोरून नेलं. त्यानंतर अरुणाचल प्रदेशजवळच्या सादिया इथून आम्ही त्यांना शोधून आणलं. आर्थिक अडचणींमुळे आम्ही ते वासरू विकलं मात्र माझ्या लेकीबरोबर बिनूचं विशेष नातं आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की इतकी मोठी हत्तीण असूनही माझ्या मुलीला तिची अजिबात भीती वाटत नाही. त्या दोघी खेळतात तेव्हा तुम्ही पाहिलं पाहिजे. बिनू माझ्या मुलीचं सगळं ऐकते.”

परंपरेचा भाग म्हणून हर्षिताला जेव्हा हत्तीणीच्या खालून चालायला सांगितलं गेलं त्यानंतर हर्षिताचं बिनूवरचं प्रेम अधिकच वाढलं. आता ती बिनूवर स्वार होऊन रपेट मारते आणि तिच्या सोंडेला लटकत डोलतेसुद्धा.

 

 

आसाममधल्या जंगलांमध्ये जिथे प्राणी फिरायचे ती जंगलं आता शेतांत आणि चहाच्या मळ्यांमध्ये विभागली गेल्यामुळे प्राण्यांकडून त्यांचं नैसर्गिक निवासस्थानच हिरावून घेतलं गेलं आहे. त्यामुळे आसाममधल्या विविध जिल्ह्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर मानव-प्राणी संघर्ष, विशेषतः माणसांमध्ये आणि हत्तींमध्ये बराच संघर्ष होताना दिसतोय.

परिस्थिती इतकी बिकट आहे, पण तेव्हाच या लहानगीचा आणि हत्तीणीचा सुंदर व्हिडियो समोर आला आहे. अधिकृत नोंदीनुसार, २०२१ मध्ये हत्तींच्या हल्ल्यात १०० पेक्षाही अधिक नागरिक मरण पावले. तर आसामच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विजेचा धक्का लागून, विषबाधा होऊन, ट्रेनच्या धडकेमुळे, तलावात आणि खड्यात किंवा वीज पडून, कधी अचानकपणे एकूण ७१ हत्ती मृत पावले आहेत.

इतक्या आपत्ती येऊनदेखील माणूस अजून शहाणा होत नाहीये. स्वतःच्या फायद्यासाठी अजूनही निसर्गावर अतिक्रमण करत सुटलाय. स्वतःला निसर्गापेक्षा मोठं न समजता माणसाने निसर्गाला शरण जाऊन त्याच्याशी मैत्री करायला हवी. अवघ्या काही मिनिटांचा या चिमुरडीचा आणि हत्तीणीचा व्हिडियो आपल्यात हेच भान जागं करू पाहतोय.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version