Site icon InMarathi

कधीकाळी मुलीसाठी चप्पल घ्यायला नव्हते पैसे, आज कोट्यवधींची चप्पलांचीच कंपनी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही दिवसांपूर्वीच ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारची घोषणा करण्यात आली होती. यावर्षी १२८ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये मणिपूरमधील एक महिला आहे आणि तिचे नाव मोइरंगथेम मुक्तामणी देवी आहे. काकचिंग, मणिपूर येथे राहणाऱ्या मुक्तामणी देवी त्यांच्या यशोगाथेमुळे आज जगभर प्रसिद्ध आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर, ती भारताच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जवळपास 3 दशकांपूर्वी म्हणजेच १९८९ मध्ये मुक्तामणी देवी यांची परिस्थिती इतकी हलाखीची होती, की त्यांच्याकडे आपल्या मुलीसाठी बूट खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते.

मुक्तामणी देवीच्या दुसऱ्या मुलीच्या बुटाचा सोल फाटला होता. यामुळे त्यांची मुलगी शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती, यामागचे कारण म्हणजे तिला भीती होती, की शाळेमधून तिला फाटलेल्या बुटामुळे रागावले जाईल. यानंतर मुक्तामणी देवी यांनी स्वतः त्यांच्या मुलीला बूट शिवून दिले होते.

 

 

यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांची मुलगी शाळेत गेली, तेव्हा शिक्षिकेने तिला बोलावले आणि तिचे बूट कोणी बनवले, त्यांनाही एक जोडी हवी आहे, असे तिला म्हटले. याच ६ घटनेनंतर मुक्तामणीचे भाग्योदय व्हायला सुरुवात झाली.

● सुरुवातीचे जीवन

मुक्तामणी यांचे सुरुवातीचे आयुष्य अनेक अडचणींना मात करण्यातच गेले. बुक ऑफ अचिव्हर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, त्यांचा जन्म डिसेंबर १९५८ मध्ये झाला होता. त्यांचे पालनपोषण त्यांच्या विधवा आईने केले होते आणि वयाच्या अवघ्या १६-१७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते.

लग्नानंतर मुक्तामणी यांना चार मुले झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या दिवसा भाताच्या शेतामध्ये काम करत असत, तर संध्याकाळी भाजी विकत असत. तर थोडे जास्त पैसे मिळावे यांसाठी त्या रात्री बॅग विणत असायच्या.

● मुक्ता शूज इंडस्ट्रीज झाली सुरू

 

 

मुलीसोबत शाळेत घडलेल्या त्या घटनेनंतर मुक्तामणीच्या जीवनात एक नवीन पर्व सुरु झाले. १९९०-९१ मध्ये त्यांनी स्वतःच्या नावाने मुक्ता शूज इंडस्‍ट्री सुरु केली.

काही दिवसांमध्येच त्यांच्या बुटांनी बाजारामध्ये नाव कमावले आणि त्यांच्या या विनलेल्या बुटांची मागणी खुप वाढायला लागली. मुक्तामणीने यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर आणि अनेक प्रदर्शनीच्या माध्यमातून आपले प्रॉडक्ट सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले.

मुक्तामणी देवी यांनी १ हजार हून अधिक लोकांना जोडे विणणे शिकवले आहे. त्यांच्या कारखान्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी शूज बनवले जातात. मुक्तामणी यांची कंपनी ऑस्ट्रेलिया, यूके, मेक्सिको, आफ्रिकन देशांमध्ये शूज निर्यात करते.

● कुटुंबाच्या मदतीने व्यवसायाला केली सुरुवात

भारतीय गृहिणीसाठी कुटुंबासह आपला व्यवसाय सांभाळणे सोपे नाही. भारतात अजूनही काही भागात महिलांना व्यवसाय/नोकरी करु देत नाही, पण मुक्तामणीने सर्व काही सांभाळले, काम आणि घर यात समतोल साधला आणि आपली स्वप्ने साकारली.

व्यवसायासाठी निधी उभारताना अडचणी आणि अडथळे तर आले, पण तीचे मन एवढे खंबीर होते की कोण तीही अडचण तिच्या व्यावसायाला थांबवू शकली नाही. मुक्ता इंडस्ट्रीजने बनवलेले शूज हवामानाच्या प्रभावापासून आपल्या पायांचे संरक्षण तर करतेच, याचसोबत हे बूट आपण सहज धुऊन वाळवू शकतो.

● लोकरीचे शूज कसे बनवले जातात?

 

 

शूज बनवणे काही सोपे काम नाही आहे. शूजची जोडी बनवण्यासाठी किमान तीन दिवस तरी लागतात. मुक्तामणी स्थानिक बाजारपेठेतून आणि इंफाळच्या बाजारपेठांमधून लोकर आयात करून विणकाम करत असे.

मुक्तामणी देवी म्हणाल्या, की ‘स्थानिक बाजारात उपलब्ध असलेल्या लोकरीच्या गुणवत्तेवर मला नेहमी संशय असतो, त्यात माझ्याकडे भांडवल कमी असल्यामुळे मी कोलकाता किंवा गुवाहाटीहून लोकर विकत घेऊ शकत नाही. यामुळे माझे शूज काही प्रमाणात महागडे असतात.’

● शूज कसे बनवले जाते

पुरुष बुटांचे सोल बनवतात, तर स्त्रिया विणकाम करतात. एक कारागीर एका दिवसात १००-१५० सोल बनवू शकतो आणि त्याला प्रति सोल ५० रुपये दिले जातात. तर याचवेळी चपला विणण्यासाठी ३०-३५ रुपये दिले जातात.

शूजच्या डिझाइनची जबाबदारी मुक्तामणी देवी यांच्याकडेच  आहे. त्यांचा मुलगा, क्षेत्रीमायुम देवदत्त सिंग यांनी सांगितले, की विणकामासाठी सर्वाधिक वेळ लागतो. एका महिलेला एका दिवसाच्या कामासाठी ५०० रुपये दिले जातात.

 

 

मुक्ता शूज इंडस्ट्री एका दिवसात १० जोड्या शूज बनवते. बदलत्या काळानुसार बुटांचे डिझाईन आणि किंमतही बदलली आहे, पूर्वी चपलांची जोडी २०० ते ८०० रुपयांना विकली जात होती, आता त्यांची किंमत १००० रुपयांपर्यंत आहे. मुक्तामणी देवी त्यांच्या घरी मोफत विणकाम शिकवतात.

यावरून आपल्याला दिसून येईल की मुक्तामणी देवी यांनी स्वत:चे नशीब तर बदलले आहे, सोबतच आज त्या शेकडो लोकांना त्यांचे भाग्य बदलण्याची संधी देत ​​आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version