Site icon InMarathi

आमिर खानने दिला होता ‘लगान’ साठी नकार, वाचा ‘लगान’च्या निर्मितीची कथा

lagaan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

“विसरून जा आशुतोष, हे लगान भरणे आणि क्रिकेट खेळण्याच्या आइडिया मध्ये मला काहीच रुची नाही. एक मित्र म्हणून मी तुला एकच सल्ला देईन की, तू यावर वेळ वाया घालवू नको.

आधीच तुझे दोन चित्रपट पडले आहेत. यावेळी तू कोणतीतरी सुरक्षित किंवा जो ट्रेंड मध्ये आहे असा विषय घेऊन चित्रपट बनव. ही कोणती बालिश कल्पना घेऊन आला आहेस तू,

ब्रिटीश काळातील गाववाले आणि क्रिकेट? कोणत्या दुसऱ्या निर्मात्याला हे ऐकवू सुद्धा नको.”

 

imgpic.or

 

३० जुलै १९९६ रोजी आमिर खानने वरील शब्दांत आपला मित्र आशुतोष गोवारीकरला लगान चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. त्या काळी  या जोडीचे आलेले दोन्ही चित्रपट,’पहला नशा’ आणि ‘बाजी’ पडले होते.

आमिर खानचे हे बोल ऐकून आशुतोष गोवारीकर यांचे मनोधैर्य किती खच्ची झाले असेल याचा अंदाज आपण लावूच शकत नाही.

पण हार न मानलेल्या आशुतोष गोवारीकरने १ जानेवारी १९९७ ला परत आमिर खानकडे भेटण्यासाठी वेळ मागितला. या पाच महिन्यात दोघांमध्ये काहीच बोलणे झाले नव्हते.

 

 

आमिर खानला जेव्हा माहित पडले की, आशुतोष परत एकदा ‘लगान’ची स्क्रिप्ट घेऊन पोहचला आहे, तेव्हा त्याने स्क्रिप्ट ऐकण्यास साफ नकार दिला. परंतु आशुतोष मित्र असल्याने त्याने यासाठी वेळ काढला.

गोष्ट ऐकताना आमिरला जाणवले होते की, हे काही तरी अद्भुत आहे. तो यावेळी हसला, रडला आणि कित्येक भावना त्याच्या मनात दाटून आल्या. अखेर त्याने आपला निर्णय बदलला.

परंतु, लगान व्यावसायिकदृष्ट्या धोकादायक चित्रपट होता. तो कितपत हिट ठरेल याबद्दल शंका होती.

आमिरला लगान आवडला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा धोकादायक आणि आव्हानात्मक चित्रपटासाठी कोणीही निर्माता तयार होत नव्हता.

आशुतोष या दरम्यान शाहरुख खान कडेही गेला, पण परत एकदा फिल्म प्रोडक्शनमुळे गोष्ट अडकली.

आमिर खानचे वडील एक यशस्वी निर्माते होते, परंतु आमिर खानने पण घेतला होता की,  तो कधीही चित्रपट निर्मितीत उतरणार नाही. मात्र लगान साठी त्याने आपला पण मोडला आणि स्वत:च लगानची निर्मिती केली.

 

dailyvedas.com

 

३ तास ४२ मिनिटांच्या या चित्रपटाने अमेरिका, कॅनडा, सीरिया, दक्षिण कोरिया, नॉर्वे, अफगाणिस्तान, स्वित्झलँडच्या चित्रपट महोत्सवाचा भाग होऊन थेट प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारापर्यंतचा प्रवास केला.

आपल्या कथेच्या मांडणीने, अदभूत सिनेमॅटोग्राफी आणि खऱ्या जीवनावर आधारित ठिकाणांवर केलेल्या शूटमुळे लगान हा चित्रपट बॉलीववूड मधील सर्वात Iconic चित्रपट म्हणून नावाजला गेला.

पाकिस्तान पासून फक्त ७० किलोमीटर लांब असल्यामुळे भुज नावाचे क्षेत्र सुरक्षेच्या दृष्टीने खूप संवेदनशील होते आणि इथेच बॉलीववूडच्या त्यावेळच्या सर्वात महागड्या चित्रपटाचे शूट चालू होते.

गुजरात मध्ये आलेल्या भयंकर भूकंपाने भुजचा एक भाग निर्जन झाला होता. ५० अंश तापमान, डोक्यावरून सारखी उडणारी विमाने आणि पायाभूत सुविधांची कमी असल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग करणे खूप आव्हानात्मक होते.

स्वतः आशुतोष आणि वरिष्ठ अभिनेते ए.के. हंगल या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी जखमी झाले होते.

 

in.bookmyshow.com

 

आजारपणामुळे आशुतोषने कितीतरी दिवस झोपूनच निर्देशन केले होते. कदाचित हेच कारण होते की, चित्रपटाच्या चित्रीकरणावर एक वेगळा चित्रपट निर्माण झाला होता, ज्याला ‘चले चलो’ च्या नावाने ओळखले जाते.

‘लगान’ बनण्याची ही पूर्ण गोष्ट ‘लगान’ च्या वेळेपासून चित्रपटात असलेल्या सत्यजीत भटकळ यांनी लिहिली आहे. यावर त्यांचे एक पुस्तक ‘दी स्पिरिट ऑफ लगान’ देखील प्रसिद्ध झाले आहे.

याच पुस्तकावर त्यांनी ‘चले चलो’ हा चित्रपट तयार केला होता.

 

amazon.in

 

लगान चित्रपटात भारतीयांचा लाचारपणा, इंग्रजांसमोर माना झुकवण्याच्या मानसिकतेची झलक आहे, तर दुसरीकडे विदेशी सत्तेला टक्कर देण्याची क्षमता आणि स्वतःवर विश्वास ठेवून जग जिंकण्याचा प्रेरणादायी संदेश देखील आहे.

यामुळे देशभरातील लोक या चित्रपटाशी भावनेच्या रुपात जोडले गेले होते. या चित्रपटाने क्रिकेट आणि देशभक्ती भारतीयांच्या नसानसांत उतरवली आणि बॉक्स ऑफिसवर मोठे यश प्राप्त केले.

गुजरात भूकंपामुळे झालेल्या हानीमुळे चित्रपटाच्या ब्रिटीश कालाकरांसमवेत सगळ्या कलाकारांनी चॅरीटी केली होती. आमिर खानने भुजमधील एका गावाला दत्तक घेतले होते.

बेघर झालेल्या लोकांना टेंट आणि आवश्यक सुविधा दिल्या होत्या.

तर ब्रिटीश अभिनेत्री रेचल शैली  चित्रीकरणाच्या चार महिन्याच्या आव्हानात्मक पण कायम स्मरणात राहणाऱ्या अनुभवातून एवढी प्रभावित झाली की, ११ मे २००१ ला जगातील प्रतिष्ठित वर्तमानपत्र ‘द गार्डियन’ साठी तिने हा संपूर्ण अनुभव कथन केला.

तिच्या या अनुभवाला ‘लव इन ए हॉट क्लाइमेट’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले गेले. हा लेख तुम्ही येथे वाचू शकता.

 

specials.rediff.com

 

लगान चित्रपट रील आणि रीयल जीवनातील एका माणसाचे असंभव स्वप्न,आवड आणि यशस्वी होण्याची जिद्द सांगतो.

एकीकडे चित्रपटात भुवन एकटा इंग्रजांशी झुंज देत होता, तर दुसरीकडे खऱ्या आयुष्यात आशुतोष आपले चित्रपटाचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्याच्या आव्हानामध्ये संघर्ष करत होता.

पण म्हणतात ना, सत्य आणि धाडस ज्याच्या मनात असते, शेवटी त्याचाच विजय होतो आणि अखेर विजय आशुतोष गोवारीकर यांचाच झाला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version