मुस्लिम गव्हर्नर म्हणतात “हिजाब नव्हे तर इस्लाममध्ये या ५ गोष्टी महत्वाच्या आहेत”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेल्या महिन्यात देशातील निवडणुकांचा विषय मागे पडून एकच विषय गाजत होता तो म्हणजे मुस्लिम महिलांच्या हिजाब परिधानवरून, कर्नाटकमधील एका कॉलेजमध्ये काही मुस्लिम मुलींनी हिजाब परिधान केला आणि त्यावर बंदी घातली गेली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात घडू लागले.
सेक्युलर विचारणसरणी आणि मुस्लिम विचारणसरणी असेलल्या लोकांनी या घटनेचा निषेध केला.फेकते या घटनेचे देशातच नव्हे तर सख्ख्या शेजारी असलेल्या देशात देखील उमटले, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तर थेट मोदींवरच टीका केली. कलाकार मंडळी राजकारणी लोकांनी स्त्रियांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असा आरोप केला.

या घटनेचा तीव्र निषेध होत असताना केरळचे गर्व्हनर असलेले आरिफ मोहम्मद खान यांनी हिजाब वरून आपली मत मांडली आहेत जी पूर्णतः यापेक्षा वेगळी आहे नेमकं काय म्हणाले आहेत, चला तर मग जाणून घेऊयात…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
नेमकं काय म्हणाले?
आरिफ मोहम्मद खान यांनी हिजाब वादावर मोकळणेपणाने आपली मते मांडली आहेत. ते बोलताना असं म्हणाले की हिजाबवरून चालू असलेला वाद हा वाद नसून मुस्लिम महिलांच्या विरोधातील षडयंत्र आहे.
इस्लामशी निगडीत असलेल्या पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्याची माहिती विस्तृतपणे मांडली आहेत. खान यांनी त्याच मुद्यांचा आधार घेऊन पुढे म्हणाले की, फक्त पाच गोष्टी आवश्यक आहेत ज्यांना आर्काण ए इस्लाम असं म्हणतात. ज्यात कालिमाद्वारे तुमची श्रद्धा दृढ करा, रोज ठरविक अंतराने प्रार्थना करा, रमजानमध्ये उपवास करा, दान करा आणि जर शक्य असेल तर एकदा हजची यात्रा करा.

जेव्हा तुम्ही अत्यावश्यक सेवा लागू करता, तेव्हा हिजाब हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे की केवळ धर्मामध्ये ज्या गोष्टी श्रद्धेसाठी अत्यावश्यक आहेत अशाच गोष्टींना कलम २५ मध्ये संरक्षण दिले जाईल. यात हिजाब नक्कीच नाही. शैक्षणिक संस्थामधील मुलींच्या हिजाबबंदी वर ते म्हणाले की हे संपूर्ण अज्ञानाचे परिणाम आहेत.
कुराणामधील ७०० हुन अधिक शब्दांचा अर्थ असा आहे की ज्ञान मिळवा, विचार करा, मनन करा तसेच ते पुढे म्हणाले की धर्म म्हणजे ज्ञानाच्या शोध घेणे…
कोण आहेत आरिफ मोहम्मद खान?
मूळचे उत्तरप्रदेशचे असलेले खान यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे अध्यक्षपद भूषवले आहे, तसेच राजकीय कारकिर्दीची सुरवात त्यांनी काँग्रेसमधून केली होती मात्र नंतर विचारसरणी न पटल्याने त्यांनी काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेले, २००४ साली त्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केला होता. मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी ते कायमच अग्रेसर असतात.
–
- “पहले हिजाब फिर किताब”: डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एक नवा पैलू
- एकीकडे हिजाबवरून वाद, पण इथे ८०० वर्ष जुन्या मंदिरासाठी एकत्र आले हिंदू- मुस्लिम!
–
सध्या हिजाबवरून चाललेला वाद कर्नाटकच्या हाय कोर्टात गेला आहे, दोन्ही बाजूने यावर सारासार विचार करून यावर हाय कोर्ट काय म्हणतंय ते आता काही दिवसात आपल्यापुढे येईलच.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.