Site icon InMarathi

एकही मॅच न खेळता अर्जून लखपती; IPL मधील ‘नेपोटिझम’ वर नेटकऱ्यांचा सवाल

mumbai indians arjun IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्टार्सच्या घरात जन्म घेतल्यापासूनच स्टारकिड्स लाइमलाईटमध्ये असतात. आपल्या आवडत्या स्टार्सप्रमाणेच त्यांच्या मुलांनीही आपली एक वेगळी छाप लोकांवर पाडावी अशी सगळ्यांची अपेक्षा असते.

काही स्टारकिड्स या अपेक्षा खऱ्या करून दाखवतात तर बरेचसे अपयशी ठरतात . त्यामुळे स्टारकिड्स आणि ट्रोलिंग हे समीकरण आता आपल्यासाठी नवं राहिलेलं नाही.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर एका कारणासाठी सध्या बराच ट्रोल होतोय.

आचरेकर सरांकडून ज्याने क्रिकेटचे धडे गिरवले तो मध्यमवर्गीय मराठी मुलगा ते आज जगभरात भारताचं नाव उंचावणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर हा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिलाय. प्रचंड मेहनतीनच्या जोरावर आणि सातत्याने चांगला खेळ खेळून त्याने आपलं स्टारडम कमावलंय. पण बाकी स्टारकिड्सप्रमाणेच सचिनचा मुलगाही शून्यातून वर आलेला नाही.

 

 

अर्जूनचा खेळ सचिनपेक्षा वेगळा आहे. पण जरी तो वेगवान गोलंदाज असला आणि ऑलराऊंडर असला तरी त्याच्या खेळातून आजवर काही विशेष चमक दिसलेली नाही. असं असूनही अर्जून तेंडुलकरचं भाग्य उजळवणारी एक घटना घडलीये.

२०२२ च्या आयपीएलच्या लिलावात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स फ्रँचाइजने अर्जून तेंडुलकरला ३० लाखात खरेदी केलंय.

 

 

मुंबई इंडियन्स टीमने इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केलाय ज्यात अर्जून टीमचे आभार मानताना दिसतोय. या कारणामुळे अर्जूनची सध्या सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली जातेय.

 

मुंबई इंडियन्सने अर्जूनवर बोली लावण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये आयपीएलच्या झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स फ्रँचाइजने अर्जूनाला २० लाखात खरेदी केलं होतं. एकही मॅच न खेळवता त्याला एका सिझननंतर टीमने रिलीज केलं होतं.

 

 

यावर्षी गुजरात टायटन्सनेही अर्जूनवर बोली लावली होती मात्र अखेरीस मुंबई इंडियन्स फ्रँचाइजनेच त्याला खरेदी केलं. कमेंट्सचा पाऊस पाडत लोकांनी अर्जूनाला ट्रोल केलंय. यामध्ये बहुतांश जणांनी नेपोटिझमवर टिका करत अनेक विनोदी मीम्सही तयार केली आहेत.

 

 

अनेकांनी नेपोटिझम हा हॅशटॅग व्हायरल करत त्याची तुलना थेट आर्यन खानशी केली आहे.

फ्रँचाइजला स्टार व्हॅल्यू मिळावी म्हणून केवळ स्टारकीड असलेल्या पण सुमार खेळ खेळणाऱ्या अर्जून तेंडुलकरलाही मुंबई इंडियन्सने टीममध्ये घ्यावं ही गोष्ट अनेकांसाठी संतापजनक ठरलीय. आयपीएलच्या बाजारीकरणाचं हे आणखी एक उदाहरण म्हणावं लागेल.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सचिनने खेळात जसं यश मिळवलं होतं तसं यश अर्जून तेंडुलकरला अजिबातच मिळवता आलेलं नाही. आपल्या वडिलांप्रमाणेच आपल्या खेळातून अर्जून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करेल अशी लोकांची अपेक्षा होती पण तसं काहीच घडलं नाही. तरीदेखील आयपीएलमध्ये लिलाव झालेली आणि एकाच टीमकडून खेळणारी सचिन आणि अर्जून तेंडुलकर ही पितापुत्रांची पहिलीच जोडी आहे.

 

 

सचिन २००८ पासून २०१३ पर्यंत आयपीएलच्या ६ सीझन्सचा भाग होता. त्यादरम्यान त्याने खेळलेल्या ७८ मॅचेसमध्ये ३४.८३ च्या सरासरीने त्याने २,३३४ रन्स केले. आयपीएलमधली त्याची सर्वोत्तम खेळी नाबाद १०० रन्सची होती.आयपीएलमध्ये सचिनच्या नावावर १ शतक तर १३ अर्धशतकं आहेत.

चांगला खेळ खेळता येत नसूनही नशीबाने अशा प्रकारे अर्जूनवर मेहेरबान होताना दुसरीकडे कुठेतरी क्रिकेटर बनायचं स्वप्न मनापासून पाहिलेला एखादा खेळाडू आपल्या खेळावर मेहनत घेत असेल.

 

 

आयपीएलमधल्या या राजकारणाने भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव करायला नको आणि भविष्यात खरोखरच उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होतोय असं वाटतं का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version