Site icon InMarathi

युक्रेन-रशिया वादाचे मूळ आहे जर्मनी…! आंतरराष्ट्रीय राजकारण जाणून घ्या

ukraine russia featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी अफगाणिस्तानमधल्या तालिबानी आक्रमणानंतर सर्वत्र त्याच चर्चा रंगल्या होत्या. त्याची जागा कालपासून यूक्रेनने घेतली आहे. यूक्रेनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असल्याने बऱ्याच देशात एकच खळबळ माजली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यूक्रेन आणि रशियात तणाव निर्माण झाल्याने तिथे कधीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून तिथल्या भारतीय नागरिकांनासुद्ध आपल्या सरकारने लवकरात लवकर इथे येण्याचं आव्हान केलं आहे, अत्यंत गरज असेल तरच तिथे थांबा आणि भारतीय दूतावासाला तुमची खुशाली कळवत रहा, अशी भारत सरकारने ताकीद दिली आहे.

 

 

यूक्रेन आणि रशियामध्ये हा वाद कशामुळे निर्माण झाला आहे ते आपण जाणतोच. एका शहरातील तेलाच्या साठयावरून दोन देशांतले संबंध खराब झाले, वाद विकोपाला गेला आणि यूक्रेनमध्ये सध्या बिकट परिस्थिति निर्माण झाली आहे.

खरंतर या वादाचा थेट यूक्रेनशी संबंध असला तरी  हा वाद जर्मनी आणि रशियाला थेट जोडणाऱ्या पाइपलाईनमुळे म्हणजे nord stream 2 मुळे निर्माण झाला आहे.

 

 

या पाइपलाईनमार्फत होणाऱ्या गॅसच्या देवाणघेवाणीमधून जर्मनीला चांगलाच फायदा आहे, आणि यामुळेच सध्या जर्मनी यूक्रेन आणि रशियामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे.

यामुळे जर्मनी आणि रशिया दोन्ही देशांना फायदा होणार आहे, जर्मनीच्या पदरात स्वस्तात आणि स्वच्छ असा उर्जेचा स्त्रोत हाती लागणार आहे, आणि यामुळे रशियाच्यादेखील उत्पन्नात वाढ होणार आहे, त्यामुळे हे दोन्ही देशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे!

या सगळ्या प्रकरणामुळे अमेरिकेच्या पोटात दुखत आहे असं काही तज्ञांचं मत आहे. जर्मनीने पूर्णपणे रशियाकडून येणाऱ्या ऊर्जास्त्रोतावर अवलंबून राहणं ही अमेरिकेच्या पचनी पडण्यासारखं नाहीये.

 

 

जर्मनी आणि रशिया यांच्यातले चांगले संबंध पाहून बऱ्याच देशांच्या नजरेत ते खुपत आहे, आणि यामुळेच जो बायडन सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी या nord stream चा विरोध केला होता.

प्रश्न हा फक्त एका पाइपलाईनचा किंवा ऊर्जा स्त्रोताचा नाहीये, प्रश्न आहे तो आंतरराष्ट्रीय वर्चस्वाचा. त्यामुळे या पाइपलाईनवरून वाद निर्माण करून यूक्रेनला एका ऑब्जेक्टप्रमाणे वापरुन मुद्दाम रशिया आणि जर्मनीमधला तणाव वाढवून nord stream हा प्रकल्प हाणून पाडायचं षडयंत्र आहे असं अभ्यासकांचं मत आहे.

या सगळ्यातून पुतीनची प्रतिमा मलिन करण्याचासुद्धा प्रयत्न होताना दिसत आहे. यूक्रेनमध्ये say no to putin असे फलक घेऊन बरीच लोकं निदर्शनंदेखील करत आहेत.

 

 

नुकतच जर्मनीचे चॅन्सलर ओलॅप  यांनी या क्षेत्रात येऊन पाहणी करून दोन्ही देशातले गैरसमज दूर करायचा प्रयत्नदेखील केला आहे, अर्थात या सगळ्या घडामोडींचे पडसाद आपल्याला इतक्यात दिसणार नाहीत.

कारण ही युद्ध कोणताही जातीयवाद, वंशवाद यावरून झालेला नसून, व्यवसाय, दळण-वळण इत्यादि प्रॉब्लेम्समुळे निर्माण झाला आहे. निश्चितच यात राजकारण आहे, पण यूक्रेनच्या माध्यमातून होणाऱ्या या राजकारणाचे पडसाद जगभरात पाहायला मिळतील का ते येणारा काळच ठरवेल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version