Site icon InMarathi

शनिवारवाड्यातील रक्तरंजित घटनांच्या भितीने पुण्यात उभा राहिला आणखी एक वाडा!

pune im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून तर प्रसिद्ध आहेच, त्याचबरोबर पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. पुणे शहराला स्वतःची एक वेगळी ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. पुणे शहरामध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे असून, शिवाजी महाराज आणि पेशवेकालीन अनेक ऐतिहासिक वास्तु आपल्याला येथे आढळून येतात.

यासोबतच पुण्यात मराठी वास्तूशैलीची ओळख करून देणारे अनेक वाडेही बघायला मिळतात. महाराष्ट्रातील इतर शहरांमधून पुण्यामध्ये आलेला प्रत्येक जण तुळशीबागेमध्ये जातच असतो. तसेच यानंतर पर्यटकांची दूसरे आवडते ठिकाण म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि याच्या बाजूला विश्रामबाग हा वाडा आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

विशेष म्हणजे पुण्याने आपल्या बदलत्या काळानुसार या पुरातन वास्तू अजुनही जपल्या आहेत. या पुरातन वास्तुमधील प्रमुख वास्तु म्हणजे शनिवारवाडा, पर्वती, महादजी शिंदेंची छत्री, विश्रामबागवाडा या आहेत.

 

 

पेशवेकाळात पुण्यात अनेक वाडे बांधले गेले. मात्र यातील बहुतांश वास्तुंची योग्य ती देखभाल न झाल्याने ती आता खंडर झाली आहे. या पुरातन वाड्यांमधील एक वाडा हा खुद्द बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या राहण्यासाठी व आरामासाठी बांधला होता आणि त्याचे नाव आहे ‘विश्रामबागवाडा’!

● वाड्याचा इतिहास :-

विश्रामबाग वाडा हा सन १८०७ मध्ये बांधला गेला होता आणि याला एकूण २ लाख रुपये खर्च आला होता. या वाड्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली होती. हा वाडा ३० हजार चौ. फू. जागेमध्ये पसरलेला आहे.

 

 

दुसरे बाजीराव यांना शनिवार वाड्यापेक्षा हा वाडा जास्त प्रिय होता. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पराभूत होईपर्यंत दुसरे बाजीराव अकरा वर्षे या वाड्यात राहिले होते. युद्धानंतर इंग्रजांनी त्यांना पेन्शन देऊन कानपूरजवळील बिथूर येथे हद्दपार केले होते. तर त्यांची पत्नी वाराणसीबाई बिथूर येथे जाण्यापूर्वी काही काळ येथे राहिली होती. यानंतर काहीच दिवसात इंग्रजांनी संपूर्ण पुणे ताब्यात घेतले होते.

यानंतर १८२१ मध्ये, पुण्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या शासकांनी शहरात संस्कृतचे वर्ग सुरू करण्यासाठी वाडा येथे हिंदू महाविद्यालय सुरू केले होते. विश्रामबाग हायस्कूल नावाची हायस्कूलही या राजवाड्याच्या बाहेर चालत असे. १८७१ मध्ये, जाळपोळीच्या घटनेमुळे वाड्याच्या पूर्वेकडील भाग पूर्णपणे नष्ट झाला होता.

१८७९ साली काही फितुरांनी विश्रामबागवाड्याला आग लावली. या आगीमध्ये वाड्याच्या समोरच असणारे दोन चौक जळून खाक झाले. काही अवधीनंतर स्थानिक नागरिकांनी वर्गणी गोळा करून त्या वाड्याची डागडुजी केली. नंतर तो वाडा नगर पालिकेच्या ताब्यामध्ये देण्यात आला. आता सध्या या वाड्यामध्ये सरकारी कार्यालये आहेत. पेशवे काळातील वैभव म्हणून पर्वती आणि शनिवार वाड्यानंतर फक्त विश्रामबाग वाडा शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे. पेशवेकालीन गौरवीत इतिहासाची साक्ष देणारा विश्रामबाग वाडा वाहतुकीच्या कोंडी मध्ये हरवला आहे.

शनिवारवाड्यात झालेल्या हत्या आणि आत्महत्या यांचे प्रकरण खूपच वेगळे होते. तो काळ सत्य कमी आणि अफवांचा अधिक होता. कुठल्याही सत्यापेक्षा अफवा लवकर पसरली जायची.

शनिवार वाड्यात झालेली नारायणरावांची हत्या आणि त्यानंतर वाड्याविषयी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होत होते. नारायण रावांच्या भुताची कथा तर आजही तशीच आहे. माधवराव पेशवे आणि उमाबाई यांचेही निधन वाड्यातच झाले होते. भुताखेतांच्या या अफवांना कंटाळुनच विश्रामबागवाड्याची निर्मिती केली गेली असल्याचं सांगितलं जातं.

 

 

१९३० मध्ये, तत्कालीन पुणे नगरपालिकेने प्रेसिडेन्सी सरकारकडून १ लाख रुपयामध्ये ही जागा खरेदी केली होती. १९५९ पर्यंत पुणे महानगरपालिका ही या वाड्यातून काम करत असे. यानंतर देखील २००३ पर्यंत अनेक पीएमसी विभागाची कार्यालये या वाडामध्ये होती.

 

 

पुण्यातील अनेक वास्तुंना वैभवशाली इतिहास आहे. मुख्य म्हणजे या वास्तुंचे आजही जतन केले जाते ही अभिमानाची बाब आहे. अशा कोणत्या वास्तुंबद्दल तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version