' कार बंद, चंबळच्या डाकूंचा घेराव… मीना कुमारीने घेतला चाकू, वाचवले सगळ्यांचे प्राण – InMarathi

कार बंद, चंबळच्या डाकूंचा घेराव… मीना कुमारीने घेतला चाकू, वाचवले सगळ्यांचे प्राण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अभिनेते, अभिनेत्री यांचं वेड सगळ्यांनाच असतं. आपापल्या लाडक्या कलाकाराच्या प्रेमात वेडे लोक त्यांच्यासारखं दिसण्या बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे फ़ोटो जमा करतात आणि अगदीच नशिबानं साथ दिली तर भेटून स्वाक्षरीही घेतात. मात्र कधी कधी या कलाकारांना आपल्या फ़ॅन्सचे असे काही अनुभव येतात, की ते त्यांच्या आयुष्यभर लक्षत रहातात.

सत्तरच्या दशकातील ट्रॅजिडी क्विन म्हणून लौकीक मिळविलेली अभिनेत्री मीना कुमारी. अत्यंत तरल असा अभिनय आणि शालीन सौंदर्य अशी जिची ओळख होती ती मीना कुमारी लाखो दिलो की धडकन होती. तिची एक झलक मिळावी म्हणून तिचे चाहते तळमळत असत. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असे.

 

meenakumari im2

 

मात्र एक अनुभव असा आला की त्यानं मीना कुमारीचा थरकाप उडाला. एका डाकू फ़ॅननं मीना कुमारीकदे अशी मागणी केली की मीना कुमारीच काय उपस्थित क्रु मेंबर्सनाही घाम फ़ुटला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याचं झालं असं, की मीना कुमारी त्या काळात कमाल अमरोहींच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. त्यांच्याच पाकिजामधे कामही करत होती. पाकिजाच्या मेकिंगची चर्चा त्या काळात जोरदार होती.

या चित्रपटाच्याच शुटिंगसाठी सगळं युनिट कुप्रसिध्द मध्य प्रदेशातील शिवपूरी भागात गेले होते. त्या काळात चंबळ मधील डाकूंनी नुसता धुमाकूळ घातला होता. अनेक क्रूर डाकू या भागात कार्यरत होते आणि त्यांच्या क्रुरतेच्या कहाण्यांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरले जात होते.

शहाणा माणूस या भागातून रात्रीचा प्रवासच काय पण दिवसाचा प्रवासही शक्यतो टाळत असे. या खोर्‍यात डाकूंच्या तावडीत सापडणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण बनलं होतं.

मीना कुमारी, कमाल अमरोही आणि काही क्रू मेंबर्सना शुटिंग संपवून मुंबईला परतताना रात्र झाली. कुप्रसिध्द चंबळच्या खोर्‍यातून जात असतान कधी एकदा या प्रदेशातून बाहेर पडतोय असं प्रत्येकाला झालेलं होतं. मात्र नियतीनं ती रात्र मीना कुमारीसाठी विचित्र रात्र म्हणून आधीच नोंदवून ठेवली होती. पुढे जे घडणार होतं ते भूतो न भविष्यती असं असणार होतं.

 

meenakumari im1

 

दोन कारमधून ही मंडळी चाललेली असतानाच अचानक बियाबान भागात आल्यावर कारमधलं पेट्रोल संपलं आणि रस्त्याकडेला गाड्या थांबवल्या गेल्या. इतक्या रात्री पेट्रोल शोधायला जाणं म्हणजे डाकूंना आपणहोऊन आमंत्रण दिल्यासारखं होणार होतं. म्हणून कमालजींनी निर्णय घेतला, की गाड्या रस्त्याकडेला थांबवून मुंबईला जाण्याची काही सोय होतेय का बघायची.

विचारविनिमय चाललेला असताना अचानकपणे डाकूंनी त्यांना घेरलं. कारमधल्या प्रत्येकाचे धाबे दणाणले. खिडक्यांच्या काचा ठोठावत सगळ्यांना बाहेर येण्याविषयी सांगितलं जात होतं.

कमालजीनी धैर्य गोळा करत त्यापैकी एका डाकूला सांगितलं की तुझ्या सरदाराला मला येऊन भेटायला सांग. त्यांनी हे सांगताच याच घेरावातून एक सामान्य उंचीचा आणि रेशमी कुर्ता सलवार घातलेला एक इसम पुढे आला. त्यानं कमालजींना विचारलं,” तुम कौन हो?” कमालजींनी त्याला सांगितलं की,’मैं कलाम अमरोही हूं और मै चंबल शूटिंग करने आया हूं’ शुटिंग हा शब्द ऐकताच तो इसम संतापला.

तो कमालजींना पोलीस समजला आणि शूटिंग म्हणजेच डाकूंना मारायला हा पोलिसवाला आला आहे असा त्याचा समज झाल्यानं तो रागात बोलू लागला. कमालजींच्या लक्षात आलं की समोरच्या इसमाचा काही गैरसमज झालेला आहे. त्यांनी तातडीनं खुलासा केला की, शूटींग म्हणजे चित्रपटाचं शूटिंग. हे ऐकून तो इसम शांत झाला.

 

dacoity im

 

कमालजींनी थोडं धाडस गोळा करत त्या इसमाला विचारलं की तुम्ही कोण आहात? यावर त्यानं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांची भीतीनं दातखीळ बसायची वेळ आली.

या डाकूचं नाव होतं, डाकू अमृत लाल. त्या काळात अमृत लाल त्याच्या कारनाम्यांमुळे सतत बातम्यांत असायचा. त्याच्या क्रुरतेला सीमाच नव्हती. आता कमालजींकडे त्यानं अधिक चौकशी सुरू केली. कोणता चित्रपट, कलाकार कोण? मग त्याला कळलं की या चित्रपटात मीना कुमारी काम करत असून आत्ता या क्षणी ती तिथे उपस्थित आहे.

झालं! तो इसम आनंदानं वेडा झाला कारण तो मीना कुमारीचा प्रचंड मोठा चाहता होता. त्यानं हट्टच धरला, की त्याला मीना कुमारीला भेटायचं आहे.

 

meenakumari im

 

काही झालं तरी डाकूच तो, त्याला भेटायला मीना कुमारी राजी होईना. मात्र अमृत लालनं सांगितलं, की जर त्याला मीना कुमारी भेटली तर तो सर्वांना पुढच्या प्रवासाला जाऊ देईल. अखेर क्रु मेंबर्सचा विचार करत मीना कुमारी या भेटीला तयार झाली.

अमृत लाल आनंदानं अक्षरश: वेडा झाला. त्यानं या मंडळींच्या खानपानाची व्यवस्था केली आणि दरम्यान गाड्यांमधे पेट्रोल भरण्याची व्यवस्था केली. अमृतलालकडचा पाहुणचार घेऊन मंडळी निरोप घेऊन निघाली.

प्रत्येकाच्याच मनात सुटलो बुवा अशी भावना असतानाच अमृतलालचं डोकं पुन्हा फ़िरलं. आता त्याला मीना कुमारीची सही हवी होती. ती द्यायला खरंतर मीना कुमारीची काहीच हरकत नव्हती, पण डाकूला हवी असणारी स्वाक्षरी सामान्य कशी असेल? सुरीने मीना कुमारीने तिचं नाव स्वत:च्या हाताने अमृतलालच्या हातावर कोरावं अशी त्याची इच्छा होती.

कधी कोणावर चढ्या आवाजातही न बोलणार्‍या मीना कुमारीला हे करणं म्हणझे साक्षात ब्रम्हांड आठवणारं होतं. तिनं नकार दिला मात्र डाकू हट्टालाच पेटलेला. अखेर मीना कुमारीनं कशीबशी हिंमत करुन हे कामही पार पाडलं आणि सगळ्या क्रु मेंबर्सची सुटका केली. स्वाक्षरी घेऊन अमृतलाल खुष झाला आणि क्रुमेंबर्स गाडीत बसून वेगात गाडी दामटवत मुंबईच्या दिशेने निघाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?