९ भयानक बेटं, इथे प्रत्येक क्षण वैऱ्याचा आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो नयनरम्य सागरकिनारा, नितांत सुंदर निळाशार समुद्र, तेथील डोळयांच पारणं फेडणारं वातवरण, पण तुम्हाला माहित आहे का जगात अशी काही बेटं आहेत जेथील वातावरण उलट आहे.
म्हणजेच येथे निरव शांतता तर असते, पण ती हृदयात धडकी भरवणारी असते, येथील वातावरण भयभीत करून सोडणारं असतं. येथे एक क्षण घालवणं म्हणजे देखील जीव स्वत:हून धोक्यात घालण्यासारखं आहे.
१) Ilha da Queimada Grande

ब्राझील मधील, हे बेट संपूर्ण जगात स्नेक आयलँड म्हणून देखील प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात विषारी आणि दुर्मिळ प्रकारच्या सापांपैकी एक असलेल्या Bothrops insularis जातीच्या सापांचे येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे.
येथे भेट दिलेल्या प्रवाश्यांच्या मते दर स्क्वेअर मीटरला तब्बल ५ Bothrops insularis जातीचे साप येथे आढळतातच. याच कारणामुळे येथे वास्तव्य करणे धोकादायक आहे. तरीही अनेक जण साहस म्हणून येथे पाउल ठेवतात.
२) Miyake-jima

जपान मध्ये स्थित असलेल हे बेट येथील एका ज्वालामुखीमुळे अतिशय खतरनाक मानले जाते. या बेटाखाली mount oyama नावाचा जिवंत ज्वालामुखी पहुडलेला आहे, जो कधीही उसळी मारू शकतो आणि या बेटाला आपल्या कवेत घेऊ शकतो.
२००५ मध्ये काही प्रमाणात या ज्वालामुखीचा भाग वर आला होता, तेव्हापासून हा ज्वालामुखी या बेटावर सतत विषारी वायू सोडतो आहे, त्यामुळे येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला आणि येथे राहणाऱ्यांना मास्क घालूनच राहावे लागते, अन्यथा काही मिनिटांत त्यांचा मृत्यू निश्चित आहे.
३) Ramree Island

म्यानमारच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे बेट दुसऱ्या महायुद्धातील काही भयंकर घटनांसाठी प्रसिद्ध आहे. १९४५ रोजी येथे ब्रिटीश सैन्य आणी जपानी सैन्य यांच्यामध्ये घमासान युद्ध सुरु होते.
ब्रिटीशांच्या प्रभावी प्रतिकारापुढे जपान्यांचा निभाव लागू शकला नाही आणि जपानी सैन्य आपला जीव वाचवण्यासाठी बेटाच्या आसपासच्या दलदलीमध्ये, झाडाझुडूपांमध्ये लपून बसले. पण त्यांना ह्याची कल्पना नव्हती की ज्या जागेचा ते जीव वाचविण्यासाठी आसरा घेत आहेत तीच जागा त्यांच्या मृत्यूचा सापळा ठरणार आहे, कारण त्या जागी असंख्य समुद्री मगरींचे वास्तव्य होते, ज्यांनी आपल्या समोर येणाऱ्या सर्वच जपान्यांचा फडशा पाडला.
प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये झालेली ही जगातील आजवरची सर्वात मोठी जीवितहानी ठरली, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये देखील करण्यात आली आहे. आजही या बेटावर या समुद्री मगरींचे मोठ्या प्रमाणवर वास्तव्य आहे.
४) Farallon Islands
सॅन फ्रान्सिस्कोच्या किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे बेट गेल्या २४ वर्षांपासून रेडियोअॅक्टीव्ह कचऱ्याच डम्पिंगहाऊस म्हणून वापरलं जात होतं. न्युक्लिअर पावर प्लांटमधील तब्बल ५५ गॅलन भरून हानिकारक खनिजांचा कचरा येथे टाकण्यात आला आहे.
यामुळे पर्यावरणाला फार जास्त धोका होत नाही आहे, पण या कचऱ्यामुळे एलीफंट सील्सचे वास्तव्य वाढले आहे आणि परिणामी त्यांना भक्ष्य बनवणारे व्हाईट शार्क्स या भागाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे मनुष्य प्राण्यासाठी हे बेट म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे.
५) Gruinard Island
उत्तर स्कॉटलँडच्या भागात स्थित असलेल्या या बेटावर ब्रिटीश सरकारकडून दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान बायोलॉजीकल वॉरफेर वेपन्सची चाचणी केली जायची. वारंवार होणाऱ्या चाचण्यांमुळे येथे विषारी अश्या ऍन्थ्रॅक् जीवाणूची उत्पत्ती झाली, त्याचा परिणाम लवकरच दिसून आला जेव्हा या भागातील १०० पेक्षा जास्त मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाला. आजही या बेटाला भेट देणे म्हणजे मृत्यू ओढवून घेण्यासारखा आहे.
६) Bikini Atoll
मार्शल आयलँडसच्या पट्ट्यामध्ये असलेले हे बेट दोन कारणांमुळे धोकादायक आहे- एक म्हणजे रेडियेशन आणि दुसरं कारण आहे शार्क्स! १९४६ ते १९५८ या काळात येथे २० पेक्षा जास्त न्युक्लिअर वेपन्सच्या चाचण्या घेण्यात आल्या, ज्याचा परिणाम म्हणून येथे आज इतक्या जास्त प्रमाणात रेडीयेशन निर्माण झाले आहे की ते मनुष्य प्राण्याचा काही मिनिटांत जीव घेऊ शकतं.
येथील समुद्र खोल आणि पूरक असल्याने येथे शार्क्स मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि या शार्क्स एका झटक्यात कोणत्याही सजीवाचा लचका तोडू शकतात.
७) Vozrozhdeniya Island
रशियामधील हे बेट देखील बायोलॉजी वेपन्सच्या उत्पादनामुळे आणि चाचण्यांमुळे जीवितास धोकादायक बनले आहे. येथील हवमानत विषारी घटक आणि जीवाणू सापडले आहेत, ज्यांच्या सानिध्यात मनुष्य प्राणी अश्या आजारांनी ग्रासला जाऊ शकतो जे अतिशय भयानक असतील, त्यामुळे सध्या या बेटावर कुणालाही जाण्यास मनाई आहे.
८) Izu Islands

हा जपानमधील ज्वालामुखीच्या प्रभावाखाली असलेला बेटांचा एक समूह आहे. या बेटाच्या हवेमध्ये सल्फरचे अतिशय जास्त प्रमाण आहे. त्यामुळे मास्क घातल्याशिवाय या बेटावर जाता येत नाही.
या बेटावर आजही लोक राहतात, पण त्यांचे जीवन इतके कष्टप्रद आहे की त्याची कल्पनाही न केलेली बरी! बाहेरील माणूस एका दिवसापेक्षा जास्त वेळ या बेटावर घालवण्याची शक्यता फारच कमी आहे.
येथे एक अलार्म लावण्यात आला आहे, तो वाजला की लोकांना समजतं की हवेतील सल्फरचे प्रमाण मर्यादेपलीकडे जात असून तो विषारी वायूचे रूप घेत आहे, त्यानंतर येथील लोक त्यांना दिल्या गेलेल्या निर्देशांनुसार पुढील सुरक्षा पाळतात.
९) Danger Island

मालदीव पासून ८०० किमी वर हे बेट स्थित आहे. या बेटावर वरील इतर बेटाप्रमाणे कोणतीही जीव घेणारी गोष्ट नाही पण याबेटावर पोचणे कठीण आहे. कारण येथे बंदरासारखी कोणतीही जागा नाही जेथे उतरता येईल. त्यामुळे जहाने येथे येणे टाळतात, कारण येथील समुद्राचा भरवसा नाही, तो कधीही रौद्र रूप धारण करून सर्वाना आपल्या कवेत घेऊ शकतो.
तर अशी आहेत ही जगातील अतिशय भयंकर बेटे…काय म्हणता? जाणार का इथे??!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.