आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगातील कोणत्याही दोन देशात संघर्ष सुरू झाला तरी भारतीय लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो हे आपण नेहमीच ऐकत असतो.
नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी आपल्या भारतीय बांधवांनी जगभरात स्थलांतर करून आपल्या कामाने लोकांची मनं जिंकली आहेत. युरोप, अमेरिका, गल्फ, रशिया, इटली यापैकी कोणत्याही देशात गेलात तरी तिथे भारतीय लोक हे आहेतच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनची राजधानी कीव इथे असलेल्या भारतीयांना सध्या मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
सद्यपरिस्थिती बघता विशेष करून विद्यार्थ्यांना हे सांगण्यात येत आहे की, अत्यंत आवश्यक असेल तरच युक्रेन मध्ये रहा आणि वेळोवेळी आपली खुशाली भारतीय एम्बेसीला कळत रहा.
त्यासोबतच, भारतातून पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांनी युक्रेन मध्ये जाऊ नये अशी सूचना सध्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून दिली जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये कोणत्या विषयावरून सध्या वाद सुरू आहे? जाणून घेऊयात.
सध्याची परिस्थिती काय आहे?
युक्रेनचे राष्ट्रपती वलीदिमिर जेलेस्को यांनी मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती ज्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली होती की, “रशिया सोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण, रशियाकडून तसा कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये.
१६ फेब्रुवारी २०२२ रोजी रशिया आमच्यावर हल्ला करणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. युक्रेन मधील सर्व नागरिकांना आम्ही सतर्कतेची सूचना आम्ही सध्या देत आहोत.”
युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या या पोस्टनंतर भारत, अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा सारख्या कित्येक देशांनी आपल्या देशवासीयांना आपल्या देशात परतण्याचे आवाहन केलं आहे.
–
- कट्टरपंथीय मुस्लिमांच्या टीकेला कंटाळून राष्ट्रपतींच्या कन्येचा शेवटी हिंदू धर्मात प्रवेश
- तालिबान्यांच्या खुनशी प्रवृत्तीला चीन घालतंय खतपाणी, थरकाप उडवणारं वास्तव!
–
सुरक्षेच्या कारणास्तव, काही देशांनी आपल्या राजदूतांना घरातच राहण्याच्या सूचना सुद्धा केल्या आहेत.
भारत युक्रेन मधील भारतीयांसाठी काय करत आहे?
भारतीय एम्बेसीनेसुद्धा युक्रेनमधील भारतीयांना कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना केल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीचा अंदाज घेऊन युक्रेन मधील भारतीय एम्बेसीने जानेवारी महिन्यापासूनच भारतीय लोकांना एका गुगल फॉर्मद्वारे आपली माहिती देण्याचं आवाहन केलं होतं.
“युक्रेन मध्ये घडणाऱ्या घडामोडींवर एम्बेसीचं पूर्ण लक्ष आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेज ला फॉलो करा” असं युक्रेन मधील भारतीय एम्बेसीने २५ जानेवारी २०२२ रोजी ट्विट करून सांगितलं आहे.
युक्रेन-रशिया वाद कधी आणि का सुरू झाला ?
रशिया आणि युक्रेन मधील वाद हा २०१३ मध्ये सुरू झालेला आहे. युक्रेन देशातील काही सामाजिक संस्थांनी युरोपियन युनियन मध्ये समावेश होण्याचा तीव्र विरोध केला होता. पण, तरीही युक्रेन २०१६ मध्ये युरोपियन युनियन मध्ये समाविष्ट झाला आणि त्याने रशियाचा सुद्धा राग ओढवून घेतला होता.
रशियाचा युक्रेनमधील इंटरेस्ट हा केवळ क्रिमेया या शहरासाठी आहे. कारण, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऑईल आणि गॅस यांचा साठा दडलेला आहे.
२०१९ मध्ये युक्रेनची राज्यघटना बदलण्यात आली होती. त्यानंतर देशाच्या उत्तरेकडे असलेल्या क्रिमेआ या भागाला विशेष संरक्षण देण्यात आलं होतं. युरोप खंडातील ‘ब्लॅक सी’ला लागून क्रिमेआ हा भाग आहे. युक्रेन मधील कंपनी ‘नॅफटोगॅझ’ या उद्योग समूहाने क्रिमेआ मध्ये ‘ब्लॅक सी ऑईल अँड गॅस’ ही कंपनी सुरू केली आहे.
ही कंपनी क्रिमेआच्या सिन्फरपुल या भागात स्थित आहे. २७००० स्क्वेअर किलोमीटर भागावर रशियाचा डोळा आहे.
२०१४ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी क्रिमेआ मध्ये रशियन सैन्याला पाठवून तिथल्या स्थानिकांचा रशियामध्ये समावेश होण्याबद्दल मत विचारलं होतं. युक्रेनला ही गोष्ट अजिबात आवडलेली नव्हती आणि तिथून हा वाद सतत वाढत आहे.
युद्धाची भाषा प्रथम कोणत्या देशाने केली?
जानेवारी २०२२ मध्ये रशियाच्या संरक्षण खात्याचे प्रमुख झेलेंस्की यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राला मुलाखत देतांना, युक्रेनला ताकीद दिली की, “रशियन सैन्य हे कोणत्याही क्षणी युक्रेनच्या पश्चिमी भागावर आपला ताबा घोषित करू शकतात. हे साध्य करत असतांना जर युक्रेनने कोणताही विरोध केला तर युक्रेन आणि रशिया या दोन देशात खूप मोठ्या प्रमाणावर युद्ध होऊ शकतं.”
१९९१ मध्ये ‘सोव्हिएत युनियन’ संपुष्टात आल्यापासूनच रशिया आणि युक्रेन यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. रशियाने आपल्या कारवायांनी ही तणावाची आग धगधगत ठेवली आणि आज त्याचा त्रास दोन्ही देश आणि पर्यायाने जगाला होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर सुकर झाल्यानंतर जगातील प्रत्येक देशाने जबाबदारीने वागून चर्चेने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कारण, दोन देशाचे वाद हे जगात एक अस्थिरतेचा संदेश देत असतात, ज्यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते. युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद लवकरच शांत होवो आणि तेथील स्थानिक, परदेशी नागरिक शांततेने नांदावेत अशी आशा व्यक्त करूयात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.