' १५ वर्षातून फक्त एकदाच उमलणारं गुलाब; किंमत आहे १०० कोटींपेक्षा जास्त…. – InMarathi

१५ वर्षातून फक्त एकदाच उमलणारं गुलाब; किंमत आहे १०० कोटींपेक्षा जास्त….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आवडतं फुल कोणतं? असा प्रश्न विचारल्यावर पटकन एकच उत्तर येतं, ते म्हणजे ‘गुलाब’. फुलांचा राजा असणारं गुलाब सगळ्यांच्या आवडीचं फुल आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला गुलाब या ना त्या कारणाने आवडतंच.

प्रेमी युगुलांसाठी ‘गुलाब’ तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लाल गुलाब म्हणजे प्रेमाचे प्रतीक. गुलाब देऊन प्रेम व्यक्त करणं ही केवळ भारतातच नाही, तर परदेशातही लोकप्रिय पद्धत आहे. अलीकडेच झालेल्या रोझ डे ला कितीतरी तरुणांनी आपल्या मनातील भावना गुलाबाद्वारे व्यक्त केल्या असतील.

rose day inmarathi

 

या गुलाबाच्या मोहकपणातून कोणीच सुटलेलं नाही. कवी- लेखकांवरदेखील गुलाबाची मोहिनी आहे. अनेक कवितांमधून, गाण्यांमधून या गुलाबाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला दिसतात.

केवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी नाही, तर आदर व्यक्त करण्यासाठीही आपल्याकडे गुलाब देण्याची पद्धत आहे. गुरुपौर्णिमा, वाढदिवस, शिक्षक दिन या दिवशी गुलाबाचं महत्त्व अजूनच वाढतं.

सर्वसाधारणपणे आपल्याकडे ५-१० रुपयात गुलाब मिळतं, काही दुर्मिळ गुलाब अजून थोडी महाग मिळतात, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गुलाबाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. या गुलाबाची किंमत १०० कोटींपेक्षाही जास्त आहे.

 

juliet rose im

 

गुलाबात अनेक प्रजाती आहेत, गुलाबाचे अनेक रंगही असतात. असंच एक गुलाब म्हणजे ‘ज्युलिएट रोझ’ आणि याची किंमत कोटींच्या घरात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की या फुलात एवढं महाग असण्यासारखं काय आहे? बघूया

फायनान्स ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार, डेव्हिड ऑस्टिनने पहिल्यांदा या गुलाबाची लागवड केली, या गुलाबाची शेती करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. २००६ मध्ये हे गुलाब पहिल्यांदा उगवले. या ज्युलिएट गुलाबाची किंमत ११२ कोटी रुपये एवढी आहे.

 

juliet rose im2

 

या गुलाबाची लागवड करण्यासाठी डेव्हिड ऑस्टिनने अनेक गुलाबांना एकत्र केले, या वैविध्यपूर्ण गुणधर्मामुळे त्याने या गुलाबाचं नाव ‘ज्युलिएट’ असं ठेवलं.

 

juliet rose im1

 

या गुलाबाची शेती करणं देखील खूप खर्चिक काम आहे. याची लागवड करण्यासाठी ३७ कोटी रुपये लागतात. शिवाय १५ वर्षांचा कालावधी लागतो. २००६ मध्ये हे गुलाब ९० कोटी रुपयांना ऑस्टिनने विकले होते.

गुलाबात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे वास. सुवासासाठीच हे फुल प्रसिद्ध आहे. ज्युलिएट गुलाबाचा मंद सुवास हेच त्याच्या इतकं महाग असण्याचं कारण आहे. हा सुवास अनेकांना आवडतो.

हे गुलाब आपण विकत घेऊ शकू की नाही याबाबत शंका असली, तरीही अशा गोष्टी वाचून आपण आपल्या माहितीत नक्कीच भर टाकू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?