Site icon InMarathi

भारतातील १० करोडपती चहावाले, ज्यांनी या साध्या धंद्यातून कमावले ढिगाने पैसे!

mba chaiwala im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चहाचा नुसता वास आला किंवा चहा झाला आहे हे वाक्य ऐकलं तरी आपल्याकडं लोक झोपेतून उठतात. भारतात चहाच्या लोकप्रियतेने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

गरम पेय म्हणजे काय तर चहा. कॉफी हेही एक गरम पेय होऊ शकतं, पण ते कुठंही उभं राहून प्यावंसं वाटत नाही. म्हणजे आपण चहा एखाद्या टपरीपासून ते एखाद्या ५ स्टार हॉटेलपर्यंत अशा कोणत्याही ठिकाणी उभं राहून पिऊ शकतो.

 

 

काळा चहा, आलं घातलेलं चहा, साधा चहा, तंदुरी चहा, लेमन टी, स्पेशल टी असे अनेक प्रकार भारतभरात सगळीकडे मिळतात. चहा टपरी म्हटल्यावर काळेकुट्ट भांडे, एक शेगडी, घामाने भिजलेला माणूस, वेलदोडा, चहा, दूध यांचा एकत्रित खमंग वास एवढं साहित्य आलंच.

हे टपरीवाले दिवसभरात बरी कमाई करतात. वर्दळीच्या ठिकाणी जर असेल तर काही विचारायला नको, पण भारतात करोडपती चहावाले आहेत. चला बघूया आहेत तरी कोण हे १० करोडपती चहावाले..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. चाय ठेला

 

 

पंकज न्यायाधीश आणि नितीन चौधरी या आयआयटी खरगपूरच्या माजी विद्यार्थ्यांनी २०१५ साली चाय ठेलाची सुरुवात केली. यांच्या कॅफेमधलं किऑस्क (ज्यामधून चहा येतो ते मशीन) आणि ठेला ही लोकांची आकर्षणं आहेत.

गुरुग्राम, नॉयडा, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान आणि मुंबई अशा ठिकाणी चाय ठेलाच्या ब्रॅंचेस आहेत. ८ रोड व्हेंचर्स यांचे गुंतवणूकदार आहेत. या स्टार्टअपला मिळणारा निधी जवळजवळ ७ कोटी रुपये आहे.

२. चायपत्ती कॅफे

२०१० साली चिराग यादवने बंगळुरूमध्ये चायपत्ती कॅफे उघडलं. या कॅफेमध्ये मटका चहा बरोबर स्नॅक्सही मिळतात, जसे की मॅगी, सॅन्डविच, मोमो आणि पास्ता. चायपत्ती कॅफेची एकूण ५ आउटलेट्स आहेत. आत्तापर्यंत या कॅफेमध्ये ४ लाख लोक चहा पिऊन गेले आहेत.

३. टीपॉट कॅफे

 

 

नवी दिल्लीत टी अँड बाईट कॅफे टीपॉट आहे. असद खान, रॉबिन झा आणि अतीत वर्मा या तीन मित्रांनी २०१३ मित्रांनी हे स्टार्टअप सुरु केलं. हे सुरु करताना त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांची सगळी सेविंग्स या स्टार्टअपसाठी वापरली.

या कॅफेमध्ये लोकांना चहा आणि त्याबरोबरचे स्नॅक्स एकदम स्वस्तात मिळतात. यांच्या लोकप्रियतेचे करम म्हणजे यांनी दिल्लीच्या प्रसिद्ध CP मध्ये (कॅनॉट प्लेस) त्यांची आउटलेट्स उघडली ज्यामध्ये लोकांना एकदम स्वस्त आणि कडक चहा मिळतो.

४. एमबीए चायवाला

 

 

एमबीए चायवाला या टपरीच्या सुरुवात प्रफुल्ल बिलोर याने केली होती. वडिलांकडून ८ हजार रुपये घेऊन एका रस्त्याकडेला त्यानं ही टपरी टाकली होती. ८ हजारात सुरु झालेल्या या टपरीचं सध्याचं वार्षिक उत्पन्न ३ ते ४ कोटी आहे.

५. चायोस

 

 

नितीन सलुजा आणि राघव वर्मा या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी २०१२ साली नवी दिल्लीत चायोस या कॅफेची सुरुवात केली होती. या कॅफेमध्ये आवडीनुसार चहाच्या हजारो प्रकारांमधून चहा निवडता येतो.

मुंबई, नोएडा, गुरुग्राम, दिल्ली, गाजियाबाद आणि चंदीगड अशा शहरांसह भारतभरात चायोसच्या एकूण ७० शाखा आहेत. या चायोसची सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं हिरवी मिरची चहा आणि पापड चहा प्यायला मिळतो. ४१.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ ३ अब्ज रुपये एवढा त्यांना मिळणारा निधी आहे.

६. चाय पॉईंट

 

 

बंगळुरूमध्ये सुरू झालेला टी पॉइंट भारतातला पहिला चहा स्टार्टअप म्हणून ओळखला जातो. हार्वर्ड विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीने म्हणजेच अमुलिक बिजराल याने चाय पॉईंटची सुरुवात केली होती.

गरम चहाची होम डिलिव्हरी करणारी चाय पॉईंट ही पहिलीच कंपनी आहे. बंगळुरूशिवाय यांचे पुणे, दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई येथे आउटलेट आहेत.

त्यांच्याबाबत एक गोष्ट सांगितली तर आपल्या सगळ्यांनाच धक्का बसेल. ती म्हणजे, त्यांचा व्यवसाय २०१८ च्या आर्थिक वर्षात ८८ कोटी होता, तो २०२० मध्ये १९० कोटींपर्यंत पोहोचला. त्यांना मिळणारा एकूण निधी ३४ मिलियन डॉलर्स आहे, जे भारतीय रुपयांमध्ये तब्बल २.५ अब्ज रुपये होतात.

७. टी-बॉक्स

सिलीगुडीमध्ये असलेले टीबॉक्स इथे कोटाझी चहाच्या पानांचा चहा मिळतो. ही पाने ते आसाम, दार्जिलिंग, नेपाळ आणि निलगिरी या ठिकाणांहून आणतात.

या कंपनीमध्ये रतन टाटा, रॉबर्ट एम बास आणि कॅमेरून जोन्स या दिग्गजांनी गुंतवणूक केली आहे. टीबॉक्सला मिळणारा एकूण निधी १० मिलियन डॉलर्स आहे. याची भारतीय रुपयांमध्ये ७ कोटी एवढी किंमत होते. सिलीगुडी व्यतिरिक्त यूएसए आणि युरोपियन युनियनमध्येही टीबॉक्सच्या शाखा आहेत.

८. चाय गरम

 

 

नवी दिल्ली मध्ये असलेल्या चाय गरमची सुरुवात २००८ मध्ये भृगु दत्त आणि अभिषेक नाहटा यांनी केली होती. चाय गरम या कॅफेमध्ये २० पेक्षा जास्त प्रकारचे चहा मिळतीलच शिवाय त्यासोबत स्नॅक्सही मिळतील. या कॅफेचे देशभरात ६० आउटलेट आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत ३० लाख कप चहाची विक्री केली आहे.

९. चाय ब्रेक

 

 

कोलकाता मधले टी ब्रेक २०११ मध्ये आदित्य लाडसारिया आणि अनिरुद्ध पोद्दार यांनी सुरू केले होते. ते अनेकदा त्यांच्या ग्राहकांसाठी चहासोबत काहीतरी नवीन आणि नाविन्यपूर्ण करतात. त्यांचा नाश्ता त्यांच्या चहाइतकाच चविष्ट असतो.

कोलकाता, दुर्गापूर आणि भुवनेश्वरमध्ये टी ब्रेकचे ११ आउटलेट आहेत. टी ब्रेक कॅफेने आतापर्यंत १४ लाख डॉलर्सचा (१०.५ कोटी रुपये) निधी उभारला आहे.

१०. चाय सुट्टा बार

 

 

२२ वर्षांच्या अनुभव दुबेने २०१६ साली इंदूरमध्ये चाय सुट्टा बार सुरू केला. अनुभवने त्याचे वडील, व्यापारी आणि त्याचा मित्र आनंद नायक यांच्यासोबत ३ लाख रुपये गुंतवून या कॅफेची सुरुवात केली.

या कॅफेच्या वेबसाइटनुसार, कॅफेचे ३ देशांमधील ७० शहरांमध्ये १५० हून अधिक आउटलेट आहेत. चाय सुट्टा बारमध्ये एकूण १० प्रकारचे चहा मिळतात.

यावरून आपल्याला काय समजतं? उच्चशिक्षित तरुणही चहाविक्रीकडे ओढले जातात आणि ‘ती’च्या आधी ‘टी’ला प्राधान्य देतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version