आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना असामान्य महत्त्व आहे. सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मा, पालनहार विष्णू आणि संहारक महेश म्हणजेच शिव अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. भारतात शंकराची अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत, तसेच त्याची अनेक रूपे सुद्धा आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
गावोगावी कुलदैवत म्हणून शंकराची वेगवेगळ्या रूपांत आराधना होते. महाराष्ट्रचे दैवत खंडोबा आणि ज्योतीबा हे सुद्धा भगवान शंकराचेच अवतार.
साधारणतः सोमवारी शंकराची उपासना केली जाते. अनेकदा आपण मंदिरातील शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण करतो.
‘हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची , बेलाच्या पानाची’ या गाण्यामधून शंकराला बेल किती प्रिय आहे ते सांगितले आहे, परंतु शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलच का अर्पण केला जातो? बेलपत्राचे महत्त्व काय आहे? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का?
बेलपत्राचे झाड हे त्याच्या काही गुणांमुळे शतकानुशतके एक पवित्र वृक्ष मानले जाते आणि बेलपत्राची पाने भगवान शंकरांना खूप प्रिय आहेत, त्यामुळे भगवान शिवाला केलेला नैवेद्य देखील बेलपत्राशिवाय अपूर्ण मानला जातो.
बेलपत्राची तीन पाने एकत्र जोडलेली असतात ती पवित्र मानली जातात. तिन्ही पाने एकमेकांशी जोडलेली असल्याने ही तीन पाने त्रिदेव मानली जातात, तर काहींच्या मते तीन पाने महादेवाचे त्रिशूळ दर्शवतात.
—
- भारतातील या रहस्यमयी मंदिरात ३ वेळा शिवलिंगाचा रंग बदलतो: विज्ञान की चमत्कार?
- बालाजी अवतार – “लग्नासाठी” घेतलेले कर्ज भगवान विष्णू आजही फेडत आहेत…
—
भगवान शिवाला फक्त बेलपत्राची पाने प्रेमाने अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात. बेलपत्राचं महत्त्व आपल्याला या आख्यायिकेमधून जाणून घेता येईल.
तर ही कथा आहे समुद्र मंथनाची. जेव्हा देव आणि दानव यांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. त्यातील एक होते हलाहल विष. हे विष बाहेर आल्यानंतर संपूर्ण जगात पसरण्याची आणि त्यामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती होती.
भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी हे विष प्राशन केले आणि आपल्या कंठामध्ये ते साठवून ठेवले. त्यामुळेच भगवान शंकरांना नीलकंठ असेही म्हणतात.
या विषाचा प्रभाव इतका भयंकर होता, की भगवान शंकर यांचं मेंदू गरम झाला आणि भगवान शिव अस्वस्थ झाले. तेव्हा देवतांनी शंकराच्या मस्तकावर पाणी घातले. पाण्याच्या थंड गुणधर्मामुळे मेंदूला आराम मिळाला, पण घशाची जळजळ काही कमी झाली नाही.
त्यानंतर देवतांनी बेलपत्राची पाने भगवान शंकराला खाऊ घातली, कारण बेलपत्रामध्ये विषाचा प्रभाव कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे शिवपूजेत बेलपत्राच्या पानाला विशेष महत्त्व आहे.
बेलाचे पान हे शीतल गुणधर्माचे असते, म्हणूनच शिवलिंगावर बेलपत्र आणि जल अर्पण केल्याने शिव भगवान प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे.
बेलपत्र वाहताना उलटे वाहावे तसेच बेलपत्र नेहमी अखंडित असावे. तुटलेले, छिद्र असलेले बेलपत्र अर्पण करणे वर्ज्य समजले जाते. गंगाजलात रात्रभर भिजत ठेवल्याने बेलपत्राचे गुणधर्म वृध्दींगत होतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.