Site icon InMarathi

जिथे इंजिनीयर कमी पडले, तिथे एका मुस्लिम मेस्त्रीने केली शिवलिंगाची स्थापना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी गणेशोत्सवा दरम्यान एक जाहिरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. त्यात जाहिरात एक असे दाखवले होते की एक माणूस बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी गणपती कारखान्यात जातो तिथे काम करणारी एक व्यक्ती त्याला मूर्ती दाखवते आणि तितक्यात मागून अजानचा आवाज येतो, आणि तिथे काम करणारी व्यक्ती आपली टोपी परिधान करते, काही क्षणात जाहिरात हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देऊन जाते…

आज मुस्लिम महिलांनी हिजाब परिधान केल्याने वाद होत आहेत, मात्र ज्या राज्यात हे वाद होत आहेत तिथे ८०० वर्ष जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकत्र आले आहेत. अशीच एक घटना मध्यप्रदेशात घडली आहे, नेमकी काय आहे ती घटना चला तर मग जाणून घेऊयात..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मध्यप्रदेशमधील मंदसौर भागात पशुपतीनाथ महादेव मंदिर प्रसिद्ध आहे, याच मंदिरात एका शिवलिंगाची स्थापना केली गेली, मात्र हे शिवलिंग नेहमीच्या शिव लिंगाएवढे नसून एक अवाढव्य असे आहे ज्याची उंची ६.५ फूट असून वजन काही टनांमध्ये आहे. अशा या शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी चक्क प्रशासन सुद्धा कामाला लागले होते.

 

शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी सामान्य कारगिरांऐवजी इंजिनियर मंडळींना पाचारण केले होते. मात्र या तज्ज्ञ मंडळींना देखील हे महाकाय शिवलिंग स्थापन करता आले नाही. या शिवलिंगची स्थापना जिलहारीमध्ये स्थापना करायची होती मात्र या मंडळींना ते काही केल्या जमत नव्हते.

अखेर हा प्रकार घडत असताना तिकडे उपस्थतीत असलेले स्थानिक गवंडी मकबूल हुसेन पुढे आणि आणि त्यांनी या मंडळींची अस्वस्था बघून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. मकबूल यांनी इंजिनियर मंडळींना एक कल्पना सुचवली..

काय होती कल्पना?

मेस्त्री मकबूल यांनी अशी कल्पना सुचवली की, जिलहारीमध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापन करायचे आहे त्या ठिकाणी बर्फाची लादी ठेवली तर त्या जिलहारीला कोणतेही नुकसान होणार नाही, आणि शिवलिंग देखील सुरक्षित राहील. जसा जसा बर्फ वितळेल तसे तसे शिवलिंग जलधारीच्या आत प्रवेश करेल.

 

 

मकबूल यांच्या या कल्पनेला सगळ्यांनी होकार दिला, आणि लगोलग बर्फाची ऑर्डर देऊन तो गोलाकार कापून त्यावर शिवलिंग ठेवले गेले. जसा बर्फ वितळला शिवलिंगाने आपली जागा घेतली. मकबूल यांच्या कल्पनेचे सगळ्यांनी कौतुक केले.

कोण आहेत मकबूल हुसेन?

आज आपल्याकडे अनेक यशस्वी लोक आहेत ज्यांनी ना शाळेचे तोंड बघितले ना कॉलेजचे, तरीदेखील आपल्या मेहनतीवर यशस्वी ठरले आहेत. मकबूल देखील याच वळणावरचे आहेत. मकबूल यांनी शालेय शिक्षण घेतले नसले तरी हाती असलेल्या कलेने त्यांनी सौदी अरेबियामध्ये काही वर्ष मेकॅनिक म्हणून काम केले, त्यांनतर भारतात येऊन त्यांनी काही मंदिरांची स्थापना देखील केली आहे.

 

 

लहानपणापासून आपण पुस्तक वाचत असतो, मात्र केवळ काही मार्कांसाठी ही पुस्तक न वाचता आणि केवळ पुस्तकी ज्ञान न घेता इतर आपल्या अंगातील कलागुणांना तपासा, ज्या शिवलिंगची स्थापना भल्या भल्या इंजिनियर मंडळींना करता आली नाही ते एका अशिक्षित माणसाने आपल्या अनुभवाच्या जोरावर करून दाखवले, त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण की अनुभव हा प्रश्न उभा राहतोच….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version