Site icon InMarathi

भारताचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल…

two Presidents im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक जसजसी जवळ येते होती, तसतश्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात कमालीच्या घडामोडी घडत होत्या. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या पसंतीचा व्यक्ती राष्ट्रपतीपदावर विराजमान व्हावा यासाठी जोराने प्रयत्न सुरु केल्याचे दिसून आलेच. पण त्यांनी तर अनपेक्षितरित्या धक्का देत रामनाथ कोविंद या भारतीय जनतेसाठी अपरिचित असलेल्या चेहऱ्याला पुढे केले. या खेळीने विरोधक तर बावचळलेच. एक दलित नेता म्हणून मिडीयाने त्यांची ओळख उचलून धरली. मग काय, विरोधकांनी देखिल दलित उमेदवार मीरा कुमार यांना पुढे करत प्रभावी नसलेली पण नाईलाजाने खेळावी लागलेली चाल पुढे केली. पहिल्यापासूनच राम नाथ कोविंद यांचे पारडे जड होते आणि निकालही अपेक्षित लागला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे १४ वे राष्ट्रपती म्हणून राम नाथ कोविंद विराजमान झाले.

indianexpress.com

७१ वर्षीय रामनाथ कोविंद हे कानपूरमधील दलित नेते आहेत. १९९४-२००० आणि २०००-२००६ असे सलग दोन वेळा उत्तर प्रदेश मधून ते राज्यसभेसाठी निवडून आले होते. ८ ऑगस्ट २०१५ पासून ते बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. व्यवसायाने ते वकील असून सध्या दिल्ली न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत.

navbharattimes.indiatimes.com

भारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेशमधील दलित घटकांचा खंदा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. १९९८ ते २००२ या काळात त्यांनी भारतीय जनता दलित मोर्चाचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे. तसेच अखिल भारतीय कोळी समजाचे देखील ते अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीत प्रवक्ते या नात्याने देखील त्यांनी पक्षासाठी काम केले आहे.

governor.bih.nic.in

एक सक्षम पर्याय म्हणून सत्ताधारी पक्षातर्फे रामनाथ कोविंद यांना पुढे करण्यात आले आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की त्यांची निवड योग्यच होती. आपल्या देशाच्या नव्या राष्ट्रपति द्रौपदी मूर्मू आता देशाचा कारभार हाती घेतील आणि रामनाथ कोविन्दजी हे राजकारणातून निवृत्ती घेतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version