Site icon InMarathi

दिव्यांग स्त्रीला हॉटेलमध्ये प्रवेशबंदी, नंतर माफीनामा: देशात आजही अपंग उपेक्षित…

srutshti im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शासनाने दिव्यांगांना समान अधिकार देण्यासाठी कितीही कायदे तयार केले तरी प्रत्यक्षात मात्र हे कायदे केवळ कागदापुरते मर्यादित असल्याची बाब सिद्ध करणारा एक धक्कादायक प्रकार घडलाय. गुरुग्राम मध्ये एका नामांकित हॉटेलने व्हिलचेअरवरून आलेल्या या महिलेला प्रवेश नाकारल्यानंतर सोशल मिडीयावर एक नवा वाद सुरु झालाय.

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीची रहिवासी असलेली सृष्टी पांडे ही रविवारी गुरुग्राममधील रास्ता नावाच्या रेस्तराँमध्ये जेवण्यासाठी गेली होती. पण तेथिल व्यवस्थापकानं आम्हाला प्रवेश नाकारला.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सृष्टी ही दिव्यांग असल्याने व्हिलचेअरवरून ती हॉटेलमध्ये दाखल झाली होती. मात्र तिच्या व्हिलचेअरमुळे ग्राहकांची गैरसोय होईल असं सांगून आम्हाला टेबल देण्यास नकार दिला.

यावेळी सृष्टीसह आलेल्या मित्रांनी हॉटेलमध्ये असलेल्या दिव्यांगांच्या आरक्षणाबद्दलही चौकशी केली, मात्र असे कोणतेही आरक्षण नसल्याचे सांगत त्यांनी हा विषय टाळला.

हॉटेलबाहेरील वाईट व्यवस्था तसेच वाढती थंडी यामुळे दिव्यांग सृष्टीला बाहेर बसणे अशक्य झाले होते. अखेरिस त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ही बाब तिने लगेचच सोशल मिडीयावर नोंदवली. मात्र याचा परिणाम म्हणजे सोशल मिडीयावर सृष्टीच्या बाजुने अनेकांनी कौल दिला.

दिव्यांगांना होणारा त्रास, समाजाकडून केली जाणारी उपेक्षा यांवर सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरु झाली. 

 

 

लोकांमध्ये अपंगांसाठी संवेदनशीलता आणि काळजी नसल्याचं सांगणाऱ्या सृष्टीला अशी वागणूक मिळण्याची ही पहिलीच घटना नाही.  या देशातील इतर नागरिकांप्रमाणेच मूलभूत मान्यता आणि आमचे हक्क हवेत असे अशी खंतही ती व्यक्त करते. दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली श्रृष्टी सांगते की तिचा हा ‘दैनंदिन’ संघर्ष आहे.

सोशल मिडीया, तक्रार आणि माफीनामा

सृष्टीने सोशल मिडीयावर नोंदवलेल्या या प्रकारानंतर हा सोशल मिडीयावर एकच गोंधळ उडाला. मेट्रो शहरांमध्ये मनमानी करमारे रेस्टॉरन्ट्स आणि दिव्यांगांचा अपमान या विषयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बहुतेक तरुणांनी सृष्टीचा अपमान करणाऱ्या हॉटेलवर बंदी घालण्याची मागणी केली तर काहींनी पोलिसांकडे तक्रारीचा सल्ला दिला.

माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतल्याने अखेरिस संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला आपली चूक जाणवल्याने त्यांनी सृष्टीची माफी मागितली.

 

 

या माफीनाम्यामुळे हे प्रकरण इथे संपले असले तरी एकंदरित समाजात दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही हे नक्की! दिव्यांगांसाठी कितीही कायदे असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची उपेक्षाच केली जाते.

याबाबत तुमचा अनुभव काय आहे? दिव्यांगासाठी आणखी सशक्त कायद्यांची गरज आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version