आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
उंट हा शब्द ऐकलं की आपल्याला सर्वप्रथम आठवत ते म्हणजे ‘वाळवंट’. उंटाला ‘वाळवंटातील जहाज’ असेही संबोधले जाते, कारण उंट हा प्राणी वाळवंटामध्ये पाणी न पिता बरेच दिवस ५०/६० किमी प्रतितास वेगाने चालू शकतो.
याशिवाय उंटाचे दूध हे मानवासाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. तसे तर उंट हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उंटाला साप खायला दिला जातो आणि तोही जिवंत आणि विषारी.
हे असे का केले जाते, हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
साधारणपणे अरबस्तान, आफ्रिका आणि इतर वाळवंटी भागात उंटाचा वापर आणि संगोपन केले जाते, तसेच या भागात उंटासोबत एक अतिशय विचित्र गोष्ट केली जाते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या भागातील उंट पाळणाऱ्यांचे म्हणणे आहे की काही वेळा उंटांना एक विशेष आजार होतो आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उंटांना विषारी जीवंत साप खायला दिले जातो.
सामान्यतः या आजारामध्ये उंट पाणी पिणं आणि अन्न खाणं बंद करतो. त्याचबरोबर या आजारामुळे उंटाचे शरीरही कमकुवत होण्यास सुरुवात होते.
हा भयानक आजार बरा करण्यासाठी उंटांना विषारी साप दिला जातो. परंतु उंट हे साप खात नाही, त्यांना हे जबरदस्तीने खाऊ घातले जाते.
विषारी साप उंटाच्या तोंडात जबरदस्तीने टाकला जातो आणि त्याच वेळी त्याच्या तोंडात पाणी देखील टाकले जाते जेणेकरून साप उंटाच्या पोटात जातो.
हे असे जीवंत सांप उंटाला दिल्याने सापाचे विष उंटाच्या शरीरात पसरते असे म्हणतात आणि काही दिवसांनी तसेच यानंतर जसे-जसे विषाचा प्रभाव कमी होतो तसे उंटाला बरं वाटायला लागते.
–
- का असतात बिस्किटांवर छिद्र? कधी विचार केलाय का?
- साप चावल्यानंतर तिने जे काही केलं ते पाहून डॉक्टरांचीसुद्धा बोबडी वळली..!
–
विषाचा प्रभाव संपताच उंट पुन्हा खाऊ- पिऊ लागतो. तथापि, हे वैज्ञानिकदृष्ट्या कितपत बरोबर आहे याचे कोणतेही अचूक पुरावे उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे, हे खरोखरच रोगाच्या उपचारांसाठी केले जाते की नाही याची पण काही शाश्वती नाही.
परंतु, काही वेबसाइट्सनुसार, उंटाच्या आजारावर केली जाणारी ही उपचार पद्धती एक पारंपारिक पद्धत आहे.
एका वेबसाईटने या आजाराला अल-हीन असे नाव दिले आहे, तर एका वेबसाईटने उंटातील रक्तस्रावी रोगाच्या उपचारासाठी ही प्रक्रिया अवलंबल्याचे म्हटले आहे. परंतु अचूक पुराव्याअभावी याबाबत नेमकेपणाने काहीही सांगता येत नाही.
● उंटाचे सरासरी आयुष्य किती असते?
उंटाचे सरासरी आयुष्य चाळीस ते पन्नास वर्षे असते. पूर्ण वाढ झालेल्या उंटाची उंची खांद्यावर १.८५ मीटर आणि कुबड्यावर २.१५ मीटर असते. कुबड शरीराच्या सुमारे तीस इंच वर वाढते.
उंटाचा जास्तीत जास्त धावण्याचा वेग सुमारे ६५ किमी/तास असतो आणि लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान तो ४० किमी/तास वेग राखू शकतो. उंटाचा गर्भधारणा कालावधी सुमारे ४०० दिवसांचा असतो.
● उंटांबद्दल मनोरंजक तथ्ये –
जेव्हा उंटांना पाणी मिळते तेव्हा ते एकाच वेळी सुमारे १५१ लिटर पाणी पिऊन घेतात. यांच्या शरीराचे तापमान रात्री सुमारे ३४ डिग्री सेल्सिअस, तर दिवसा ४१ डिग्री सेल्सियस असते.
उंटाच्या दुधात भरपूर लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते लाथ मारण्यासाठी त्यांचे चारही पाय वापरु शकतात. युद्धात, विशेषतः वाळवंटात लढलेल्या युद्धांमध्ये राजे- महाराजे उंटांचा वापर करत होते.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.