Site icon InMarathi

अभिनेत्रींच्या अशा ७ जोड्या ज्यांना ओळखण्यात भलेभले रसिकही गल्लत करतात

parveen babi im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात की एकाच चेहर्‍याच्या, सारख्या दिसणार्‍या सात व्यक्ती असतात. बॉलिवुडमधल्या लोकप्रिय चेहर्‍यांचे सेम टू सेम चेहरे पाहू

दीपशिखा- परवीनबाबी-

 

नव्वदीच्या दशकात देवानंदच्या चित्रपटातून पदार्पण केलेली आणि बिगबॉसमधे सहभागी झालेली दीपशिखा पदार्पणापासूनच चर्चेत होती, मात्र ती तिच्या अभिनयासाठी नाही तर तिच्या दिसण्यामुळे चर्चेत आली. याचं कारण म्हणजे परवविनबाबीची डुप्लिकेट वाटावी इतकं साम्य दोघीत होतं.

अर्थात ऐंशीचं दशक परविननं गाजवलं, मात्र दीपशिखाच्या नशिबात हे यश नव्हतं. केवळ काही मालिका, काही चित्रपट आणि थोडीफ़ार चर्चा इतकाच तिच्या कारकीर्दीचा जीव राहिला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऐश्वर्या राय बच्चन आणि स्नेहा उल्लाल-

 

 

विश्वसुंदरी ऐश्वर्याचं सौंदर्य स्वर्गीय असल्याचं तिच्या चाहत्यांचं मत आहे. तिच्यासारखी सुंदरी दुसरी कोणी असूच शकत नाही असा त्यांचा दावा असला तरीही मराठीतली रिक्षावाला फ़ेम मानसी नाईक आणि सलमानखानचं फ़ाईंड असणारी स्नेहा उल्लाल या बर्‍याचशा ऐश्वर्यासारख्या दिसतात.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं प्रेमप्रकरण तर जगजाहिरच आहे. दोघं लग्न करतील अशी अटकळ असतानाच सलमानची व्हायलंट बाजू समोर आली आणि ऐश्वर्यानं या टॉक्सिक नात्यातून माघार घेतली. सलमान खूप दुखावला गेला. ऐश्वर्याशिवाय तो सैरभैर झाला.

आगामी चित्रपटात त्याला ऐश्वर्याच हवी होती, मात्र आता तिनं त्याच्याकडे कायमची पाठ फ़िरवलेली असल्यानं आणि तिचा नकार ठाम असल्यानं काय करावं सुचत नसलेल्या सलमानला त्याच्या बहिणीची, अर्पिताची एक मैत्रीण दिसली. योगायोग असा की ही मैत्रीण हुबेहूब ऐश्वर्या दिसत होती.

अभिनयाचा गंध नसलेली स्नेहा उल्लाल अशा रितिनं सलमानच्या ब्रेकअपवरची फ़ुंकर म्हणून चित्रपटांत आली आणि दोन चार चित्रपट करून गायब झाली.

करिष्मा तन्ना-दीपिका-

 

 

बालाजीच्या ‘सास भी कभी बहू थी’ मधून पदार्पण केलेल्या करिष्माचं करियर फ़ार झेप घेईल असं वाटलं नव्हतं, मात्र नंतर तिचं आणि बालाजी टेलिफ़िल्मसचं मेतकूट जमून आलं आणि तिला एकामागोमाग एक मालिका मिळाल्या.

लहान पडद्यावर करिष्मा आल्यानंतर बर्‍याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर एक चेहरा आला. या चेहर्‍याचं नाव, दीपिका पदुकोण. ओम शांती ओम मधून पदार्पण करणार्‍या दीपिकाला बघून लोक चकीत होत होते कारण ही हुबेहूब छोट्या पडद्यावरील लोकप्रिय करिष्मासारखी दिसत होती.

आपापल्या परिघात दोघींनी भरपूर यश मिळविलं. एकसारख्या दिसत असूनही त्यांच्या कारकीर्दीवर याचा फरक पडला नाही.

गुंजन बक्षी-प्रियंका चोप्रा-

 

 

जाहिरतींमधून पदार्पण केलेआ गुंजन बक्शी आणि प्रियंका चोप्रात बरचसं साम्य आहे. गुंजनमधे प्रियांकाचा बराच भास आहे. इतरांसारख्या त्या अगदी हुबेहूब दिसत नसल्या, तरीही दोघींना बघून एकमेकींची आठवण नक्कीच येते.

पूजा गौर- जॅकलिन फ़र्नांडीस-

स्टार प्लस वरील प्रतिज्ञा मालिकेतून तुफ़ान लोकप्रिय झालेली पूजा गौर. कालांतरानं मोठ्या पडद्यावर अवतरलेली जॅकलिन या दोघीतही बरंच साम्य आहे. अगदी एकसारख्या दिसत नसल्या, तरीही दोघींच्या चेहरेपट्टीत बरंच साम्य आहे.

शब्बीर- राणा-

बालाजीच्या मालिकांमधून झळकलेला आणि बिगबॉसमधील सहभागी शब्बीर आणि दाक्षिणात्य चित्रपटांतून लोकप्रिय झालेला राणा यांच्यातही अनेकांना साम्य आढळतं. दोघांना प्रत्यक्षात भेटलेल्यांचं मत आहे, की दोघांची बोलायची डबही सारखीच आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमावून आहेत.

डिंपी गांगुली-शर्मिला-

 

 

राहुल महाजन का स्वयंवर अशा अनोख्या शो मधून समोर आलेली डिंपी गांगुली ही बंगाली तरूणी पहिल्यापासूनच तिच्या दिसण्यामुळे चर्चेत होती.

डिंपी हुबेहूब तरूनपणीची शर्मिला टागोरसारखी दिसत होती. गालावरच्या खळीपासून हे साम्य होतं. हा शो डिंपी जिंकली आणि मिसेस महाजन बनून बातम्यांचा विषय बनली. काही काळ दोघांनी एकत्र संसार केलाही नंतर मात्र राहूलच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळून डिंपीनं घटस्फ़ोट घेतला.

आज दोघेही आपापल्या नव्या जोडीदांरासोबत संसारात रमले आहेत. डिंपीच्या नशिबात औट घटकेचं ग्लॅमर या शो मुळे आलं. या शो मुळे आणि माजी मिसेस महाजन असल्यामुळेच तिला बिगबॉसमधे सहभागी होण्याची संधीही मिळाली पणं तितकंच. उलट शर्मिला टागोरनी मात्र एक काळ गाजविला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version