Site icon InMarathi

२८ बँकांना तब्बल २२,८४२ करोडोंचा चुना लावणारी गुजरातमधील कंपनी

scam im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताचं पूर्ण शेअर मार्केट हलवून सोडणारा हर्षद मेहता आठवतोय? मध्यंतरी ज्याच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम १९९२’ नावाची वेब सिरीज सुद्धा आली होती. हर्षद मेहताने केलेला अवघ्या देशाला हादरवून सोडणारा स्कॅम यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला होता.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अर्थात या स्कॅमच्या बरोबरीनेच, निरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या अशी नावं सुद्धा घोटाळा महगतलं की अगदी हमखास आठवतात. पण या मंडळींनी केलेला घोटाळा म्हणजे काहीच नाही, असं म्हणायची वेळ यावी असा एक मोठा घोटाळा सध्या चर्चेत आहे. या फ्रॉडमध्ये समाविष्ट असलेली रक्कम थोडीथोडकी नसून, तब्बल २२,८४२ करोड इतकी आहे.

एका कंपनीने बँकांना तब्बल बावीस हजार कोटींहून अधिक किंमतीचा गंडा घातला आहे. थोड्याथोडक्या नाही, तर चक्क २८ बँकांचा यामध्ये समावेश आहे. अशा या मोठ्या स्कॅमचा तपास सीबीआयकडे गेला नसता, तरच नवल!

 

 

सध्या सीबीआय या केसवर काम करत असून, हा आजवरचा भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळा मानला जात आहे. नेमका काय आहे हा घोटाळा आणि पुढे नेमकं काय घडू शकतं, ते आज या लेखामधून जाणून घेऊयात.

कंपनीविषयी थोडंसं…

गुजरातमधील या कंपनीचं नाव एबीजी शिपयार्ड लिमिटेड असं असून, या कंपनीसह तिच्या डायरेक्टरवर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एबीजी ग्रुप हा भारतातील एक प्रसिद्ध ग्रुप असून त्यांचं नाव जहाजबांधणी क्षेत्रात अग्रेसर आहे. याच ग्रुपमधील सर्वात मोठी कंपनी असणारी एबीजी शिपयार्ड ही कंपनी जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षेत्रातील भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे.

 

 

गुजरातमध्ये स्थित या कंपनीचे तब्बल ४६ क्लायंट भारताबाहेर असून, मागील १६ वर्षांत जवळपास १६५ मोठ्या जहाजांची निर्मिती या कंपनीकडून करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता, एबीजी शिपयार्ड हे नाव किती मोठं आहे, हे अगदी सहज लक्षात येतं.

थोडीथोडकी नाही, तर तब्बल १८,००० dead weight tonnage (DWT) क्षमता असणाऱ्या जहाजांची निर्मिती करणं दहेजमधील युनिटमधून सहजशक्य आहे. भारतीय जहाज व्यवसायातील एक अग्रगण्य नाव असणारी ही कंपनी सध्या मात्र मोठ्या संकटात सापडली आहे.

हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेडसह त्यांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यात कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असणारे रिषी कमलेश अग्रवाल यांचादेखील समावेश आहे.

एसबीआयसह इतर बँकांना एबीजीने २२,८४२ करोड रुपयांचा चुना लावला असल्याचा गुन्हा त्यांच्य्याविरोधात नोंदवला गेला आहे. आयसीआयसीआयकडे ७०८९ करोड,आयडीबीआयकडे ३६३९ करोड, स्टेट बँककडे २९२५ करोड, बँक ऑफ बडोदाकडे १६१४ करोड, आणि पंजाब नॅशनल बँकेकडे १२४४ करोड इतकी रक्कम थकीत असल्याचं या एफआयआरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे.

निरव मोदी आणि मेहूल चोकसी यांच्या केसहुन सुद्धा मोठा असणारा हा फ्रॉड बँकिंग व्यवसायातील देशातला सगळ्यात मोठा फ्रॉड मानला जातोय.

 

एलआयसीला ‘चुना’ लावणारा, हर्षद मेहताच्याही आधीचा ‘बिगबूल’

शेअरमार्केट मधून श्रीमंतीची स्वप्ने दाखवून करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे!

२०१९ पासून सुरु असलेला हा वाद, २०२० च्या मार्च महिन्यात अधिक जोर धरू लागला. अखेर त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात एबीजी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर दीड वर्षांच्या कालावधीत हे प्रकरण अभयासण्यात आलं असून, याचाच परिपाक म्हणून सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेडच्या विरोधात एफआयआर नोंदवत गुन्हा दाखल केला आहे.

 

 

या गंभीर आरोपामुळे, भारतातील एबीजी ग्रुपच्या नावाला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जहाजबांधणी क्षेत्रातील त्यांच्या साम्राज्याला थेट धक्का लागणार नसला, तरी या अग्रगण्य कंपनीच्या नावावरील हा फार मोठा धब्बा ठरेल, हे मात्र नक्की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :/

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version