' जेव्हा शिवाजी गणेशन यांनी लतादीदींसाठी चेन्नईमध्ये चक्क बंगला बांधला… – InMarathi

जेव्हा शिवाजी गणेशन यांनी लतादीदींसाठी चेन्नईमध्ये चक्क बंगला बांधला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लता दीदी आपल्यातून निघून गेल्या, मात्र त्यांच्या आठवणी आजही कायम आहेत. त्यांचा स्वर्गीय आवाज आणि अप्रतिम गाण्यांप्रमाणेच या आठवणीसुद्धा रसिकांच्या मनात घर करून आहेत.

मनामनात कोरल्या गेल्यामुळे या आठवणी सुद्धा त्यांच्या नावाप्रमाणेच अजरामर झाल्या आहेत. या आठवणींमध्ये अनेक माणसं आहेत, अनेक नाती आहेत. काही नाती अगदी सख्खी, अगदी रक्ताची असली, तरी काही नाती मात्र या रक्ताच्या नात्यांपलीकडची आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लता दीदींचं असंच एक नातं, दीदींचा एक लाडका भाऊ, म्हणजे शिवाजी गणेशन! या दोघांमधील भावा बहिणीचं नातं, त्यातलं प्रेम, जिव्हाळा, गोडवा याची तुलना इतर कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

 

lata mangeshkar and sivaji ganeshan IM

 

हे नातं नेमकं कसं होतं आणि या नात्यासाठीच शिवाजी गणेशन या लता दीदींच्या भावाने नेमकं काय केलं होतं, ते जाणून घेऊयात.

शिवाजी गणेशन आणि दीदींचं नातं

लता दीदी शिवाजी गणेशन यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. त्यांच्या कामाचं लताजींना फार कौतुक वाटत असे. हे कौतुक त्यांच्या वागण्या बोलण्यातून नेहमीच पाहायला मिळायचं. अर्थात हे कौतुक फक्त त्यांच्या कलेपुरतं मर्यादित नव्हतं; दीदी आणि गणेशन यांच्यात एक घट्ट नात्याची वीण होती.

लता दीदी त्यांना अण्णा म्हणजेच मोठा भाऊ अशी हाक मारत असत. केवळ लताजी नव्हे, तर साऱ्याच मंगेशकर बहिणी शिवाजी गणेशन यांना भाऊ मनात असत.

 

sivaji ganesan IM

भावा-बहिणीचं नातं म्हणता येईल, अशी ही घनिष्ट मैत्री सुरु झाली होती ती फार पूर्वीपासून, म्हणजेच थेट साठच्या दशकात! शिवाजी गणेशन यांचा एक चित्रपट पाहून दीदी भारावून गेल्या. त्या इतक्या प्रभावित झाल्या, की त्यांना गणेशन यांना भेटायची इच्छा झाली.

गणेशन आणि दीदी यांची ही भेट बहीण भावाच्या या नात्याची सुरुवात होती. हे नातं इतकं घट्ट होत गेलं, की गणेशन यांच्या म्हणण्याखातर कुठलंही मानधन न घेता, चित्रपटाचं गाणं सुद्धा दीदी गात असत.

आनंद चित्रपटातील एका गाण्याविषयीची एक आठवण अशीच सांगितली जाते. त्या आल्या, त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं आणि त्या कुठलंही मानधन न घेता निघून गेल्या. “मी हे गाणं माझ्या भावासाठी गायलं आहे.” असंही त्या यावेळी म्हणाल्या होत्या.

 

lata mangeshkar 4 IM

भावाची माया…

शिवाजी गणेशन यांच्यासाठीसुद्धा लता दीदी ही फार जवळच्या आणि लाडक्या बहिणीप्रमाणे होती. या बहिणीवरील त्यांचं प्रेम वेळोवेळी त्यांच्या वागण्यातून दिसून यायचं. अशीच एक आठवण, आजही सगळ्यांच्याच मनात घर करून आहे.

चेन्नईमधील गणेशन यांचं वास्तव्याचं ठिकाण असलेला अन्नाई इल्लम या घरातच लता दीदींसाठी एक खास बंगला बांधण्यात आला होता. गणेशन यांनी त्यांच्या आवडत्या बहिणीसाठी हे केलं असल्याचं त्यांची मुलं सुद्धा आवर्जून सांगतात.

जेव्हा केव्हा दीदी चेन्नईला जात असत, त्यावेळी त्याच बंगल्यात राहत असत. बाहेरचं, हॉटेलमधील खाणं दीदींना आवडत नसे. घरचं खाणंच त्या नेहमी आवडीने खात.

 

lata mangeshkar sivaji IM

 

त्यांना बाहेरील अन्नपदार्थ खावे लागू नयेत, म्हणून गणेशन यांच्या पत्नी त्यांच्यासाठी स्वतः जेवण बनवत असत. चेन्नईला गणेशन यांच्या घरी राहायला गेल्यावर, त्यांची अगदी घरच्यासारखीच उठबस केली जात असे.

शिवाजी गणेशन आणि लता मंगेशकर यांच्यातील बहीण भावाच्या या नात्याचं बंधन किती अप्रतिम होतं याचा उत्तम पुरावा म्हणजे दीदींसाठी गणेशन यांनी बांधलेला हा चेन्नईमधील बंगला!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?